Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विरळ केस अन् डोक्यावर टक्कल… पुष्कर जोगच्या नव्या लूकची सर्वत्र चर्चा…

‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 17, 2025 | 02:45 PM
विरळ केस अन् डोक्यावर टक्कल... पुष्कर जोगच्या नव्या लूकची सर्वत्र चर्चा...

विरळ केस अन् डोक्यावर टक्कल... पुष्कर जोगच्या नव्या लूकची सर्वत्र चर्चा...

Follow Us
Follow Us:

समाजात अद्यापही फारसा खुलेपणाने न बोलला जाणारा विषय म्हणजे लैंगिक सुसंगती. याच नाजूक विषयावर भाष्य करणारा आणि प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा ‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय. विशेष म्हणजे यात पुष्कर जोग एका वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. पुष्करचा असा लूक यापूर्वी कधीच त्याच्या चाहत्यांनी पाहिलेला नाही. त्याचा हा नवा लूक आणि व्यक्तिरेखेतील सच्चेपणा यामुळे प्रेक्षकांना त्याची नेमकी भूमिका काय आहे, हे जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

Taapsee Pannu: ‘गांधारी’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण; अभिनेत्रीने शेअर केला अनुभव!

चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दल पुष्कर जोग म्हणतो, “आजवर मी अनेक वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट केले, परंतु ‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ हा माझ्यासाठी एक वेगळाच अनुभव होता. माझ्या चित्रपटातील प्रत्येक पात्र मी सामान्य माणसाच्या जीवनाशी जोडलेले असते. मी नेहमीच पात्रांसोबत वेगवेगळे प्रयोग करत असतो. असाच एक प्रयोग यातही केला आहे. या भूमिकेसाठी मला माझ्या लूकवर विशेष मेहनत घ्यावी लागली. केस कमी दाखवण्यासाठी दररोज सेटवर सगळ्यात आधी येऊन मेकअप आणि हेअर स्टायलिंग करावे लागत होते. या लूकला शूटिंग संपेपर्यंत सांभाळून ठेवणे देखील एक चांगलीच कसरत होती! मात्र, हे पात्र साकारताना खूप समाधान मिळालं, कारण हे पात्र आजच्या काळातील अनेक लोकांच्या आयुष्यातील वास्तव सांगणारे आहे. प्रेक्षकांशी भावनिक संवाद साधणे हे मला महत्वाचे वाटते. चित्रपटाच्या कथानकात दोन व्यक्तींमधील भावनिक सुसंवाद किती महत्वाचा आहे हे यामध्ये अधोरेखित करण्यात आले आहे.”

 

‘स्वीट होम’ फेम अभिनेत्री लग्नाच्या 8 वर्षानंतर पतीपासून होणार विभक्त, एकमेकांच्या सहमतीने घेणार घटस्फोट

‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ हा चित्रपट २१ मार्चला चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात पुष्कर जोग, हेमल इंगळे, पूर्वी मुंदडा, विशाखा सुभेदार, अभिजीत चव्हाण, अनुष्का सरकटे, पृथ्विक प्रताप, विजय पाटकर, भरत सावळे आणि किशोरी अंबिये या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. आनंद पंडित मोशन पिक्चर्स प्रस्तुत, गुझबम्प्स एंटरटेनमेंट यांच्या ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ या चित्रपटाचे दिग्दर्शन व लेखन पुष्कर जोग यांनी केले असून आनंद पंडित, रुपा पंडित आणि पुष्कर जोग निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे सहलेखन नमिष चापेकर यांनी केले आहे. पॅनोरमा स्टुडिओजने या चित्रपटाच्या वितरणाची धुरा सांभाळली आहे.

Web Title: Actor pushkar jog semi bald look in hardik shubhechha movie get viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2025 | 02:45 PM

Topics:  

  • marathi actor
  • marathi film
  • pushkar jog

संबंधित बातम्या

Onkar Bhojane: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अचानक का सोडली? ओंकार भोजनेने केला मोठा खुलासा, म्हणाला- ‘माझ्यामुळे त्यांना…’
1

Onkar Bhojane: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अचानक का सोडली? ओंकार भोजनेने केला मोठा खुलासा, म्हणाला- ‘माझ्यामुळे त्यांना…’

Sumeet Raghavans Luxurious Home: अभिनयासोबत घराचीही भन्नाट पसंती! सुमीत राघवनच्या घरात संविधानासाठी खास जागा
2

Sumeet Raghavans Luxurious Home: अभिनयासोबत घराचीही भन्नाट पसंती! सुमीत राघवनच्या घरात संविधानासाठी खास जागा

Prithvik Pratap: समोर आगीच्या ज्वाळा, रात्रीचा काळोख अन् मित्रांसोबत रोड ट्रिप; पृथ्वीक प्रतापने सांगितला थरारक अनुभव
3

Prithvik Pratap: समोर आगीच्या ज्वाळा, रात्रीचा काळोख अन् मित्रांसोबत रोड ट्रिप; पृथ्वीक प्रतापने सांगितला थरारक अनुभव

Vikas Patil New Car: बर्थडेच्या दिवशी स्वतःलाच दिलं महागडं गिफ्ट; विकास पाटीलने घेतली नवी Vitara कार, किंमत आहे ‘इतकी’
4

Vikas Patil New Car: बर्थडेच्या दिवशी स्वतःलाच दिलं महागडं गिफ्ट; विकास पाटीलने घेतली नवी Vitara कार, किंमत आहे ‘इतकी’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.