मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या (Ajay Devgan) ‘रुद्रा’ (Rudra) या वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या वेबसीरिजच्या माध्यमातून अजय ओटीटी विश्वात पदार्पण करत आहे. तसेच या वेबसीरिजमध्ये अजय मुख्य भूमिकेत आहे. सीरिजमध्ये अजय एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
अजय देवगणने या वेबसीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावरदेखील शेअर केला आहे. ट्रेलर शेअर करत त्याने लिहिले आहे,”अंधार आणि प्रकाश यांच्यातील रेषा…मी तिथेच राहतो. रुद्रा लवकरच येत आहे”. ही वेबसीरिज डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. बीबीसी स्टुडिओ आणि अप्लाइड एंटरटेनमेंटने या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. काही दिवसांपूर्वी अजयचा भुज हा चित्रपटदेखील ओटीटीवर प्रदर्शित झाला होता.