Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: दोन महिन्यात राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप; दमानियांच्या दाव्याने खळबळ

राज्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुरुवातीला वगळण्यात आले होते. राज्याचा मुख्यमंत्री या समितीचा अध्यक्ष असतो, त्यामुळे या समितीची संपूर्ण सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आली होती.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 12, 2025 | 10:48 AM
Maharashtra Politics:  दोन महिन्यात राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप; दमानियांच्या दाव्याने खळबळ
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: Mahayuti Politics:  गेल्या काही दिवसांंपासून राज्याच्या राजकारणात अंतर्गत मोठ्या घडामोडी सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वाढती जवळीक चर्चेचा विषय बनली आहे. देवेंद्र फडणवीस आता अजित पवारांना आपल्याकडे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दूर करण्यासाठी करत असल्याचे दिसत आहे, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर, यांनी आगामी दोन महिन्यांत महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी मोठी घडामोडही होऊ शकते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याने राज्याच्या सत्तासमीकरणात मोठे बदल होण्याची शक्यताही अंजली दमानिया यांनी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या काही योजना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे एक-एक करून बंद केल्या जात आहेत. हा शिंदे यांना राजकीयदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप  अंजली दमानिया यांनी केला आहे.
USAID Funding Against India: PM मोदींविरुद्धही अमेरिकेने रचले होते कट

त्याचबरोबर, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आरोपी असतानाही पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे दमानिया यांनी नमूद केले. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याविरोधात पुरावे दिल्याचेही त्यांनी सांगितले. “संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मागे मोठा नेता कोण आहे, हे मुख्यमंत्र्यांना कळलेले नाही का? धनंजय मुंडे मंत्रिपदी असताना तपासावर त्यांचा दबाव राहील. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस त्यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय कधी घेणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

एकनाथ शिंदेंना आधी समितीतून वगळले, नंतर घेतले सामावून

राज्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुरुवातीला वगळण्यात आले होते. राज्याचा मुख्यमंत्री या समितीचा अध्यक्ष असतो, त्यामुळे या समितीची संपूर्ण सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आली होती. त्यांनी अजित पवार यांना यात समाविष्ट केले, मात्र शिंदे यांना स्थान दिले नव्हते. त्यामुळे शिंदे गटात नाराजी पसरली होती. अखेर मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नियमांमध्ये बदल करून एकनाथ शिंदे यांना या समितीत स्थान देण्यात आले.

Darwin Day : चार्ल्स डार्विन उत्क्रांतीचा जनक आणि विज्ञानाच्या गौरवशाली परंपरेचा आधारस्तंभ

दरम्यान,  मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या काही महत्त्वाच्या योजनांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आळा घालण्यास सुरुवात केली आहे. हेच शिंदे यांच्या राजकीय स्थितीतील संभाव्य बदलांचे संकेत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. शिंदे सरकारच्या ‘तीर्थदर्शन योजना’, ‘आनंदाचा शिधा’ आणि ‘शिवभोजन थाळी’ या लोककल्याणकारी योजनांना बंद करण्याचा सरकारचा विचार सुरू असल्याने शिंदे समर्थकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. या घडामोडींमुळे शिंदे गट आणि भाजप यांच्यातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Anjali damania has claimed that there will be a big change in state politics in two months nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2025 | 10:17 AM

Topics:  

  • Mahayuti Government

संबंधित बातम्या

Ladki Soon Abhiyan : महायुती सरकारचा निवडणूकीसाठी नवा डाव? बहिणीनंतर आता “लाडकी सून अभियान’ सुरु
1

Ladki Soon Abhiyan : महायुती सरकारचा निवडणूकीसाठी नवा डाव? बहिणीनंतर आता “लाडकी सून अभियान’ सुरु

Ladki Bahin Yojana july installment : लाडक्या बहिणींना कधी मिळणार जुलैचा हप्ता; रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर तरी होणार का धनलाभ?
2

Ladki Bahin Yojana july installment : लाडक्या बहिणींना कधी मिळणार जुलैचा हप्ता; रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर तरी होणार का धनलाभ?

महिला बचत गटांसाठी उमेद मॉल, विशेष न्यायालये अन्…; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय
3

महिला बचत गटांसाठी उमेद मॉल, विशेष न्यायालये अन्…; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय

Sanjay Raut News: अमित शाहांच्या हाती महायुतीचा रिमोट कंट्रोल…; राऊतांनी फडणवीसांच्या जखमेवर मीठ चोळलं
4

Sanjay Raut News: अमित शाहांच्या हाती महायुतीचा रिमोट कंट्रोल…; राऊतांनी फडणवीसांच्या जखमेवर मीठ चोळलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.