USAID Funding Against India: PM मोदींविरुद्धही अमेरिकेने रचले होते कट, 'या' अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेने वेगवेगळ्या देशांच्या राजकारणात ढवळाढवळ करण्यासाठी अनेक डावपेचांचा अवलंब केल्याचा आरोप अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे माजी अधिकारी माईक बेन्झ यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीच्या अहवालानुसार, बेंझ यांनी दावा केला आहे की अमेरिकेने भारत, बांगलादेश आणि इतर देशांच्या राजकारणावर मीडियाचा प्रभाव, सोशल मीडिया सेन्सॉरशिप आणि विरोधी आंदोलनांना आर्थिक पाठबळ याद्वारे प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते, यूएस समर्थित एजन्सींनी निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा आणि सरकारांना अस्थिर करण्याचा प्रयत्न केला.
भारत आणि बांगलादेशसह अनेक देशांच्या अंतर्गत राजकारणात अमेरिकन सरकारशी संबंधित संस्थांनी हस्तक्षेप केल्याचा दावा माईक बेंझ यांनी केला. मीडियाचा प्रभाव, सोशल मीडिया सेन्सॉरशिप आणि विरोधी चळवळींना मिळणारा निधी यातून या देशांच्या निवडणुका प्रभावित झाल्याचं ते सांगतात. बेंझच्या म्हणण्यानुसार, २०१९ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीतही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : आता ‘या’ देशानेही केली अमेरिकेसोबत युद्धाची तयारी; ट्रम्प यांच्या विरुद्ध बोलावली अरब देशांची आणीबाणी शिखर परिषद
मोदी समर्थक सामग्रीवर दबाव
फेसबुक, व्हॉट्सॲप, यूट्यूब आणि ट्विटर यांसारख्या तंत्रज्ञान कंपन्यांवर मोदी समर्थक मजकूर थांबवण्यासाठी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याकडून दबाव आणल्याचा आरोप बेंझ यांनी केला आहे. जानेवारी 2019 मध्ये व्हॉट्सॲपची मेसेज फॉरवर्डिंग मर्यादा कमी करणे हा देखील या धोरणाचा एक भाग असल्याचे सांगण्यात आले.
I foretold all of this in a prophecy to India long ago 🔮 https://t.co/oi8dqrZQma pic.twitter.com/9bJx2t7BGK
— Mike Benz (@MikeBenzCyber) February 11, 2025
credit : social media
बांगलादेशात अमेरिकन हस्तक्षेप
बेंझ यांच्या मते, अमेरिकेने बांगलादेशच्या राजकारणातही हस्तक्षेप केला, विशेषत: पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार कमकुवत करण्यासाठी. सांस्कृतिक तणावाचा वापर फूट पाडण्यासाठी करण्यात आला आणि रॅप संगीताच्या माध्यमातून सरकारविरोधी भावना भडकावण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे.
USAID: अमेरिकेची वादग्रस्त संस्था
USAID ही अमेरिकन सरकारची एक स्वतंत्र एजन्सी आहे, जी विकसनशील देशांना आर्थिक आणि मानवतावादी सहाय्य पुरवते. मात्र, त्यावर राजकीय हस्तक्षेप आणि अमेरिकन परराष्ट्र धोरणाची अंमलबजावणी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इस्रायलचा शत्रू लवकरच दाखवणार विनाशकारी मिसाइलची झलक; इराणच्या IRGC नेव्ही चीफच्या घोषणेने अमेरिका खवळली
भाजप खासदार निशिकांत दुबे यांचे वक्तव्य
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी सोमवारी (10 फेब्रुवारी) संसदेत उपस्थित केलेल्या आरोपांना अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे माजी अधिकारी माईक बेन्झ यांच्या खुलाशामुळे नवे बळ मिळाले आहे. भारताचे विभाजन करण्यासाठी USAID या अमेरिकन संस्थेने अनेक संस्थांना निधी पुरवल्याचा आरोप दुबे यांनी केला होता.