Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रक्ताने माखलेली जर्सी आणि जबड्याला 6 टाके असताना गाजवले मैदान; जिमी उर्फ मोहिंदर अमरनाथ यांचा BCCI ने केला वाढदिवस साजरा

Mohinder Amarnath's Birthday : 1983 च्या विश्वचषक विजयाचा नायक 'जिमी'चा आज वाढदिवस आहे. 24 सप्टेंबर 1950 रोजी पंजाबमधील पटियाला येथे जन्मलेले मोहिंदर अमरनाथ आज 74 वर्षांचे झाले. या अष्टपैलू फलंदाजाने भारताच्या पहिल्या जागतिक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आज या महान खेळाडूचा बीसीसीआयने वाढदिवस साजरा केला आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Sep 24, 2024 | 02:59 PM
BCCI celebrated Mohinder Amarnath's birthday

BCCI celebrated Mohinder Amarnath's birthday

Follow Us
Close
Follow Us:

BCCI celebrated Mohinder Amarnath’s birthday : 1983 चा विश्वचषक जिंकल्यानंतर कपिल देव यांनी ट्रॉफी हातात घेतल्याचे ते ऐतिहासिक चित्र त्या काळातील क्रिकेटप्रेमी अजूनही विसरू शकत नाहीत. कर्णधार कपिल देवच्या शेजारी शॅम्पेन धरून उभा असलेला खेळाडू सर्वांना आठवत असेल. तो दुसरा-तिसरा कोणी नसून हेच त्या काळातले जिमी उर्फ मोहिंदर अमरनाथ होय. आज त्यांचा 74 वा वाढदिवस आहे. 1983 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आणि अंतिम फेरीत सामनावीर ठरलेला मोहिंदर अमरनाथ हा लढाऊ खेळाडू होता. वडिलांकडून मिळालेला क्रिकेटचा वारसा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे नेला. आज बीसीसीआयने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

बीसीसीआयकडून मोहिंदर अमरनाथला वाढदिवसाच्या शुभेच्छा

154 intl. matches
6,302 intl. runs & 78 intl. wickets 👌
1983 World Cup-winner 🏆
Here's wishing Mohinder Amarnath ji a very Happy Birthday 🎂👏#TeamIndia pic.twitter.com/LcQBrjbrGZ — BCCI (@BCCI) September 24, 2024

जबड्याला सहा टाके पडूनही केली फलंदाजी
1983 च्या विश्वचषकापूर्वी भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा दौरा केला होता. माल्कम मार्शल, मायकेल होल्डिंग आणि अँडी रॉबर्ट्स या त्रिकुटाने भारतीय फलंदाजी लाटून टाकली होती. दुसऱ्या कसोटीत शतक झळकावणाऱ्या अमरनाथला चौथ्या कसोटीत मोठा अपघात झाला. त्याने पहिल्या डावात 91 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात मायकल होल्डिंगचा एक शाॅट पिच चेंडू थेट अमरनाथ यांच्या हनुवटीवर आदळला आणि तो जमिनीवर पडला. रक्तस्त्राव झाल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. त्याच्या जबड्याला सहा टाके पडले आणि काही वेळाने तो फलंदाजीसाठी खेळपट्टीवर पोहोचला. 18 धावांच्या पुढे खेळायला सुरुवात केली आणि 80 धावा करूनच माघारी परतला.
वडील आणि भाऊही भारताकडून खेळले
‘जिमी’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या मोहिंदरच्या रक्तात क्रिकेट होते. त्यांचे वडील लाला अमरनाथ आणि भाऊ सुरिंदर अमरनाथ हे देखील क्रिकेटपटू होते. विशेषत: लाला अमरनाथ यांना भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही ओळखीची गरज नाही. तर मोहिंदर हा एक अप्रतिम आणि लढाऊ खेळाडू होता, ज्याच्यावर संपूर्ण संघाचा विश्वास होता. 1970 आणि 1980 च्या दशकात तो भारतीय बॅटिंग लाइनअपची ताकद होता. फलंदाजीसोबतच तो गोलंदाजीतही निष्णात होता.

भारतासाठी हा विक्रम ठरला
मोहिंदरने 1969 मध्ये वेगवान गोलंदाजी अष्टपैलू म्हणून पदार्पण केले, परंतु त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर तो नेहमीच उच्च फळीतील फलंदाज म्हणून ओळखला गेला. तथापि, तो गोलंदाजी करण्यातही निपुण होता आणि त्याच्याकडे मोठ्या कौशल्याने आणि नियंत्रणासह चेंडू स्विंग आणि कट करण्याची क्षमता होती. त्याच्या नावावर 69 कसोटी सामन्यांमध्ये 4,378 धावा आहेत ज्यात 11 शतके आणि 24 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने 55.68 च्या सरासरीने 32 विकेट्स घेतल्या आहेत. 85 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 30.53 च्या सरासरीने 1924 धावा केल्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या (नाबाद 102 धावा) आहे. त्याने 42.84 धावांच्या सरासरीने 46 विकेट्सही घेतल्या.

Web Title: Bcci celebrated hero of 1983 world cup mohinder amarnaths birthday and gave best wishes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2024 | 02:59 PM

Topics:  

  • 1983 World Cup
  • bcci
  • cricket
  • ICC
  • india

संबंधित बातम्या

IND vs PAK सामन्यांतील वादावर ICC चा मोठा निर्णय; Haris Rauf दोन सामन्यांसाठी निलंबित, सूर्यकुमारलाही दंड
1

IND vs PAK सामन्यांतील वादावर ICC चा मोठा निर्णय; Haris Rauf दोन सामन्यांसाठी निलंबित, सूर्यकुमारलाही दंड

MakeMyTrip ‘Travel Ka Muhurat’ चा रेकॉर्ड! ६ दिवसांत १०९ देशांत बुकिंग; भारतीय पर्यटकांचा ‘प्रिमियम’ निवडीकडे कल
2

MakeMyTrip ‘Travel Ka Muhurat’ चा रेकॉर्ड! ६ दिवसांत १०९ देशांत बुकिंग; भारतीय पर्यटकांचा ‘प्रिमियम’ निवडीकडे कल

हे विधवांचे गाव आहे! पुरुषांच्या अकाली मृत्यूचं कारण काय? शापामुळे नाही तर ‘या’ कारणामुळे मृत्यू…
3

हे विधवांचे गाव आहे! पुरुषांच्या अकाली मृत्यूचं कारण काय? शापामुळे नाही तर ‘या’ कारणामुळे मृत्यू…

IND W vs SA W Final Match : ‘१९८३ सारखा बदल घडविण्याची…’ भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक मजुमदार यांचे विधान चर्चेत 
4

IND W vs SA W Final Match : ‘१९८३ सारखा बदल घडविण्याची…’ भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक मजुमदार यांचे विधान चर्चेत 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.