Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! निलंबित PSI रणजीत कासलेला दणका; कोर्टाने सुनावली ‘इतक्या’ दिवसांची कोठडी

निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याला आज पहाटे अटक करण्यात आली.बीड पोलिसांनी ही कारवाई करत कासले याला पुण्यातील स्वारगेट भागातून ताब्यात घेतले.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 18, 2025 | 08:28 PM
मोठी बातमी! निलंबित PSI रणजीत कासलेला दणका; कोर्टाने सुनावली ‘इतक्या’ दिवसांची कोठडी
Follow Us
Follow Us:

बीड: निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याला आज पहाटे अटक करण्यात आली.बीड पोलिसांनी ही कारवाई करत कासले याला पुण्यातील स्वारगेट भागातून ताब्यात घेतले. दरम्यान त्यानंतर पोलिसांनी रणजीत कासले याला कोर्टात हजर केले. पोलिसांनी त्याच्या ११ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. कोर्टाने कासलेला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

रणजीत कासले यांच्या विरुद्ध ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल रणजीत कासले पुण्यात दाखल झाले होते. त्यांनी यावेळेस अनेक द्यावे व गौप्यस्फोट केले आहेत. याआधी देखील त्यांनी अशाच प्रकारची वक्तव्ये केली आहेत. दरम्यान बीड पोलिसांनी त्यांना पुण्यातून अटक केली. त्यानंतर आज त्यांना बीडमध्ये कोर्टात हजर करण्यात आले. दरम्यान दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यावर कोर्टाने रणजीत कासलेला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

रणजित कासले याने काही दिवसांपूर्वी राज्यातील वरिष्ठ नेते धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. त्यानुसार, संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याचे एन्काऊंटर करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्याची ऑफर त्याला देण्यात आली होती, असा धक्कादायक खुलासा कासले याने केला होता. या आरोपांमुळे राजकीय आणि पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार,  कालच तो दिल्लीहून पुण्यात दाखल आला होता. त्यानंतर स्वारगेट परिसरातील एका हॉटेलमध्ये त्याचा मुक्काम असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली. आज पहाटे अंदाजे चारच्या सुमारास बीड पोलिसांनी कारवाई करत कासलेला ताब्यात घेतलं.या कारवाईपूर्वी रणजित कासलेने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आपण लवकरच पोलिसांसमोर शरण जाणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात तो पोलिसांसमोर हजर होण्यापूर्वीच बीड पोलिसांनी पुण्यातून त्याला अटक केली.

Pune News: पुण्यात रणजित कासलेला बीड पोलिसांकडून अटक

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर रणजित कासलेने काही धक्कादायक आणि खळबळजनक दावे केले होते. विशेष म्हणजे, या प्रकरणाशी संबंधित आरोपी वाल्मिक कराड याचे एन्काऊंटर करण्याची ऑफर आपल्याला दिली गेली होती, असा गंभीर आरोप कासलेने केला होता. या खुलाशामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.

मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर? 

“अक्षय शिंदे प्रकरणात पाच पोलिसांवर गुन्हे दाखल करावेत आणि एसआयटीची स्थापना करावी,” अशा बातम्या मी टीव्हीवर पाहिल्या. मात्र, माझ्या मते फक्त एसआयटी स्थापन करून काहीही निष्पन्न होणार नाही. जर खरोखरच सत्य बाहेर आणायचं असेल, तर केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील एसआयटी नेमली गेली पाहिजे.

Web Title: Beed court issued three days police custody to suspended psi ranjit kasale walmik karad case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2025 | 08:19 PM

Topics:  

  • Beed
  • Pune
  • Ranjit Kasale
  • Walmik Karad

संबंधित बातम्या

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?
1

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?

Beed Crime: लग्नात मानपान कमी, ‘स्कॉर्पिओ’साठी 10 लाखांची मागणी; विवाहितेचा अमानुष छळ
2

Beed Crime: लग्नात मानपान कमी, ‘स्कॉर्पिओ’साठी 10 लाखांची मागणी; विवाहितेचा अमानुष छळ

Ketan Agrawal Muder Case: दरीत ढकलण्यापूर्वी केतनचा मोबाईल सियाकडे; पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा
3

Ketan Agrawal Muder Case: दरीत ढकलण्यापूर्वी केतनचा मोबाईल सियाकडे; पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा

Beed Crime News : विलास घुले हत्या प्रकरणात कुटुंबीयांचे पाण्याच्या टाकीवर आंदोलन; पोलिसांचे कारवाईचे आश्वासन
4

Beed Crime News : विलास घुले हत्या प्रकरणात कुटुंबीयांचे पाण्याच्या टाकीवर आंदोलन; पोलिसांचे कारवाईचे आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.