Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Water News: राज्यातील ‘या’ 4 धरणांत 23 टक्के पाणीसाठा शिल्लक; शेतकऱ्यांना उन्हाळ्यातही शेतीला मिळणार पाणी

वीर धरणातून सासवड नगरपालिकेला पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच, नीरा नदीवरील मांडकी डोहातून जेजुरी नगरपालिका व औद्योगिक वसाहतीला देखील उन्हाळ्यात पाणीपुरवठा केला जातो.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 26, 2025 | 09:03 PM
Water News: राज्यातील ‘या’ 4 धरणांत 23 टक्के पाणीसाठा शिल्लक; शेतकऱ्यांना उन्हाळ्यातही शेतीला मिळणार पाणी
Follow Us
Close
Follow Us:

नीरा/ लोणंद : नीरा धरणसाखळीत आजअखेरीस सरासरी ५० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ४९ टीएमसी क्षमता असलेल्या भाटघर, नीरा देवघर, वीर आणि गुंजवणी या चार धरणांत सध्या २३  टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे यावर्षी निरा खोर्‍यातील शेतकर्‍यांना उन्हाळ्यातही शेतीला पाणी मिळणार आहे.  तसेच,  पिण्याच्या  पाण्याची टंचाई जाणवणार नाही.  या वर्षी पावसाळ्यात भाटघर, निरा देवघर, वीर ही तीनही धरणे शंभर टक्के भरली होती. आज रोजी भाटघरमध्ये १२.५०, नीरा देवघरमध्ये ४.७५, तर वीर धरणात ५ टीएमसी पाणीसाठा आहे. गुंजवणी धरणात २ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी पाणीसाठ्याची स्थिती चांगली आहे.  

शेतकऱ्यांना वेळेवर मिळणार पाणी

धरणसाखळीत मुबलक पाणीसाठा असल्याने निरा खोर्‍यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळणार आहे. थोड्याच दिवसांत गहू, हरभरा, टोमॅटो, तसेच मागास कांदा पिकांची काढणी सुरू होईल. काढणी झालेल्या शेतात चारा पिकांचे उत्पादन घेता येणे पाण्याच्या उपलब्धतेमुळे शक्य होणार आहे. त्यामुळे जनावरांच्या हिरव्या चार्‍याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

पिण्याच्या पाण्याचा मिटणार

वीर धरणातून सासवड नगरपालिकेला पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच, नीरा नदीवरील मांडकी डोहातून जेजुरी नगरपालिका व औद्योगिक वसाहतीला देखील उन्हाळ्यात पाणीपुरवठा केला जातो. नीरा नदी व डाव्या कालव्यावरून पुरंदरमधील लपतळवाडी, मांडकी, जेऊर, पिंपरे (खुर्द), पिसुर्डी, गुळुंचे, कर्नलवाडी, राख आदी गावांतील शेतकर्‍यांनी सहकारी उपसा सिंचन योजना राबवून शेतीसाठी पाणी नेले आहे. या शेतकर्‍यांना पाण्याची चिंता सतावणार नाही. वीर धरणामध्ये मुबलक पाणीसाठा असल्याने शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या वर्षी निर्माण होणार नाही.

जून महिन्यापर्यंत जरी पुरेसा पाऊस झाला नाही, तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवू शकणार नाही. निरा नदीवरील बहुतांश बंधार्‍यांत समाधानकारक पाणीसाठा आहे. वीर धरणातून नीरा डावा कालव्यात ८२७ क्युसेकने, तर नीरा उजवा कालव्यात १ हजार ५५० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठचा व कालव्यावर शेती अवलंबून असलेल्या शेतकर्‍यांना पुरेसे पाणी उपलब्ध होणार आहे.

Web Title: Bhatghar nira devghar veer and gunjvani 23 percent water leval farmers will get water for farming even in summer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2025 | 09:03 PM

Topics:  

  • Farmers
  • Maharashtra Weather
  • Water storage

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Alert:  महाराष्ट्रात पावसाचा कहर! धोका वाढला; काळाकुट्ट अंधार अन्…. , काही तास अत्यंत महत्वाचे
1

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पावसाचा कहर! धोका वाढला; काळाकुट्ट अंधार अन्…. , काही तास अत्यंत महत्वाचे

Maharashtra Rain: काही तास कोकणासाठी महत्वाचे! पाऊस असा कोसळणार की…; IMD चा ‘या’ जिल्ह्यांना हायअलर्ट
2

Maharashtra Rain: काही तास कोकणासाठी महत्वाचे! पाऊस असा कोसळणार की…; IMD चा ‘या’ जिल्ह्यांना हायअलर्ट

राज्यातील अनेक भागांत पावसाची अद्याप प्रतीक्षाच; खरीप हंगाम वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत
3

राज्यातील अनेक भागांत पावसाची अद्याप प्रतीक्षाच; खरीप हंगाम वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत

शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास…; शेतकरी हक्क परिषदेतून बच्चू कडू यांचा इशारा
4

शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास…; शेतकरी हक्क परिषदेतून बच्चू कडू यांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.