Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरकारने 49 वर्षाच्या कराराचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा…; सदाभाऊ खोत यांचा इशारा

शेतकऱ्यांच्या कष्टाने सिंचित झालेली जमीन भांडवलदारांच्या घशात घालू देणार नाही, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 17, 2026 | 05:04 PM
सरकारने 49 वर्षाच्या कराराचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा...; सदाभाऊ खोत यांचा इशारा

सरकारने 49 वर्षाच्या कराराचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा...; सदाभाऊ खोत यांचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • धरणग्रस्तांच्या लढ्याला रयत क्रांतीचा पाठिंबा
  • ४९ वर्षांच्या कराराविरोधात संताप
  • सदाभाऊ खोत यांनी दिला सरकारला इशारा
इंदापूर : उजनी धरण परिसरातील अतिरिक्त जमिनी सार्वजनिक-खासगी भागीदारी धोरणाच्या नावाखाली तब्बल ४९ वर्षांच्या करारावर खासगी कंपन्या व उद्योजकांच्या ताब्यात देण्याचा शासनाचा निर्णय अन्यायकारक असल्याची तीव्र टीका रयत क्रांती संघटनेचे संस्थापक व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. “शेतकऱ्यांच्या कष्टाने सिंचित झालेली जमीन भांडवलदारांच्या घशात घालू देणार नाही. गरज पडल्यास रस्त्यावर उतरून राज्यव्यापी आंदोलन उभे करू,” असा ठाम इशारा त्यांनी दिला आहे.

 

इंदापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष निलेश देवकर, अंकुश पाडळे, प्रा. सुहास पाटील, दीपक भोसले, यशवंत शितोळे, महेंद्र बाबर पाटील, बंडू ननवरे, कैलास देवकर, दत्तात्रय सरडे, दादा देवकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

खोत म्हणाले, उजनी धरण उभारणीसाठी संपादित झालेल्या जमिनींपैकी अनेक जमिनी प्रत्यक्षात पाण्याखाली गेल्या नाहीत. गेली ५० वर्षे धरणग्रस्त शेतकरी या जमिनी कसत असून, देशाच्या अन्नसुरक्षेला हातभार लावत आहेत. अशा परिस्थितीत या जमिनी ४९ वर्षांच्या दीर्घ मुदतीच्या कराराने खासगी कंपन्यांच्या ताब्यात देण्याचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांवर अन्यायाचा घाला आहे. “विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणू नका. कृषी पर्यटन, प्रक्रिया उद्योग, मूल्यवर्धन प्रकल्प उभारायचे असतील तर स्थानिक शेतकऱ्यांनाच प्राधान्य द्या. कंपन्यांना करार देऊन शेतकऱ्यांना बेदखल करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

हे सुद्धा वाचा : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी ‘शब्द’ मिळालेल्यांचाच पराभव; ‘या’ उमेदवारांना मतदारांनी नाकारलं

उजनी पट्ट्यातील शेतकरी आता संघटित होत असून हा प्रश्न केवळ स्थानिक राहणार नाही. सरकारने ४९ वर्षांच्या कराराचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा देत खोत यांनी शासनाला पुनर्विचार करण्याचे आवाहन केले. उजनीच्या जमिनींचा प्रश्न हा केवळ मालकीचा नसून शेतकऱ्यांच्या अस्तित्वाशी निगडित आहे. या लढ्याला व्यापक स्वरूप देण्याची तयारी सुरू असून, येत्या काळात राजकीय व सामाजिक पातळीवर त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा : बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी

Web Title: Sadabhau khot head of the rayat kranti sanghatana has supported the struggle of the dam victims

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 05:04 PM

Topics:  

  • Farmers
  • sadabhau khot news
  • Ujni

संबंधित बातम्या

सहकारी शेती, सिंचन अन् कृषी भांडवलावर मंथन; मुंबई विद्यापीठातील राष्ट्रीय चर्चासत्रात आंबेडकरी कृषी विचारांची उजळणी
1

सहकारी शेती, सिंचन अन् कृषी भांडवलावर मंथन; मुंबई विद्यापीठातील राष्ट्रीय चर्चासत्रात आंबेडकरी कृषी विचारांची उजळणी

Raigad Farmer News :- १,८५९ शेतकऱ्यांना १० कोटी ९५ लाखांची शासनाकडून कर्जमाफी
2

Raigad Farmer News :- १,८५९ शेतकऱ्यांना १० कोटी ९५ लाखांची शासनाकडून कर्जमाफी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.