Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बदलत्या हवामानामुळे जनावरांमध्ये आजार वाढले, दूध उत्पादनात घट; शेतकऱ्यांवर उपचार खर्चाचा भार

सध्या वातावरणातील अनिश्चित बदलांमुळे शेतकऱ्यांच्या जनावरांमध्ये आजारपणाचे प्रमाण वाढल्याची स्थिती ग्रामीण भागात दिसून येत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 15, 2026 | 12:43 PM
बदलत्या हवामानामुळे जनावरांमध्ये आजार वाढले, दूध उत्पादनात घट; शेतकऱ्यांवर उपचार खर्चाचा भार

बदलत्या हवामानामुळे जनावरांमध्ये आजार वाढले, दूध उत्पादनात घट; शेतकऱ्यांवर उपचार खर्चाचा भार

Follow Us
Follow Us:
  • बदलत्या हवामानामुळे जनावरांमध्ये आजार वाढले
  • दूध उत्पादनात घट
  • शेतकऱ्यांवर उपचार खर्चाचा भार
पेठ : सध्या वातावरणातील अनिश्चित बदलांमुळे शेतकऱ्यांच्या जनावरांमध्ये आजारपणाचे प्रमाण वाढल्याची स्थिती ग्रामीण भागात दिसून येत आहे. दिवसा वाढणारी उष्णता आणि रात्री-पहाटे जाणवणारी थंडी यामुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होत असून सर्दी, ताप, खोकला, पोटाचे विकार आणि दूध उत्पादनात घट अशा समस्या वाढल्या आहेत, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

 

हवामानातील अचानक बदलांमुळे जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याने अनेकांना पशुवैद्यकीय उपचार घ्यावे लागत आहेत. परिणामी औषधोपचार, इंजेक्शन आणि पशुवैद्यकीय तपासणीसाठी शेतकऱ्यांचा खर्च वाढला असून, आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर अतिरिक्त भार पडत आहे.

सध्याच्या बदलत्या हवामानामुळे जनावरांमध्ये ताप, सर्दी व पचनाचे विकार वाढत आहेत. शेतकऱ्यांनी गोठे कोरडे ठेवून स्वच्छता राखावी, नियमित लसीकरण करावे आणि लक्षणे दिसताच तात्काळ पशुवैद्यकीय सल्ला घ्यावा. -डॉ. विजय साळुंखे, आळंदी

ग्रामीण भागात काही ठिकाणी गोठ्यांची योग्य व्यवस्था नसल्याने आणि तापमानातील तीव्र चढउतारामुळे जनावरांना त्रास होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गोठ्यात स्वच्छता ठेवणे, कोरडी जागा उपलब्ध करून देणे, वेळेवर लसीकरण करणे आणि जनावरांना सकस आहार देणे आवश्यक असल्याचे पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे. हवामानातील बदल लक्षात घेऊन पशुवैद्यकीय विभागाने गावपातळीवर जनजागृती आणि आरोग्य शिबिरे आयोजित करावीत, अशी मागणी शेतकरी व्यक्त करत आहेत.

दिवसा उष्णता आणि रात्री थंडीमुळे जनावरांवर ताण येतो. संतुलित आहार, स्वच्छ पाणी आणि योग्य निवारा आणि दूध कांडी पावडर शरीर बळकटीसाठी दिल्यास आजारांचे प्रमाण कमी होते. शेतकऱ्यांनी स्वतः उपचार न करता तज्ज्ञांकडून उपचार घ्यावेत. -डॉ. अनिल डांगे, राजगुरुनगर

हे सुद्धा वाचा : दुःखावर मात करून सुनेत्रा पवारांचा निर्णायक पुढाकार; बारामतीत जनता दरबारातून विकासाला नवी गती

Web Title: Changing climate has increased the incidence of disease in animals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 12:43 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • Rajgurunagar

संबंधित बातम्या

लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची राखरांगोळी, मोदी सरकारला देश कदापी माफ करणार नाही; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा
1

लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची राखरांगोळी, मोदी सरकारला देश कदापी माफ करणार नाही; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

संतापजनक! विवाहित महिलेला दोघांनी दुचाकीवर बसवले, नंतर घरात नेऊन दारु पाजली अन्…
2

संतापजनक! विवाहित महिलेला दोघांनी दुचाकीवर बसवले, नंतर घरात नेऊन दारु पाजली अन्…

Farmers News : शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; मका-तुरीची विक्रमी पेरणी, मात्र पावसाची दांडी ठरतेय चिंतेचे कारण!
3

Farmers News : शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; मका-तुरीची विक्रमी पेरणी, मात्र पावसाची दांडी ठरतेय चिंतेचे कारण!

Farmers News: 15 दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही; शेवगावच्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ
4

Farmers News: 15 दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही; शेवगावच्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.