
BJP alliance preparations for Jalgaon Municipal Corporation elections 2025 Political News
Local Body Elections 2025: जळगाव : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. राजकीय नेत्यांनी मोट बांधण्यास सुरुवात केली असून पक्षांनी देखील याबाबत विचारमंथन करण्यास सुरुवात केली आहे. राजकीय पक्ष हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वबळावर लढणार की युतीमध्ये याबाबत अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही. मात्र निवडणूकांसाठी भाजप पक्ष हा सावधगिरीची भूमिका घेताना दिसून येत आहे. युतीसाठी घाई न करता ताकदीची आणि उमेदवारांची चाचपणी भाजपकडून सुरु आहे.
महापालिका निवडणूकांचे पडघम वाजू लागले आहे. राज्य निवडणूक आयोगातर्फे लवकरच तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षही आता तयारीला लागले आहे. निवडणूका महायुतीच्या माध्यमातून लढव्यावात असा आदेश भाजपला प्रदेशस्तरावरून असल्याने मित्र पक्षांना सामाविण्यााठी एक पाऊल मागे घेण्याची तयारी दाखविणार असल्याची चर्चा सुरु आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका महायुतीच्या माध्यमातूनचा लढवाव्यात असा आता भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचा आग्रह असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या दृष्टीने स्थानिक पातळीवरही तसेच निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मित्र पक्षांचा कमी जागावर नकार
ज्या ठिकाणी भाजप स्वबळावर लढण्यास मजबूत आहे, त्या ठिकाणी मित्र पक्षांना सामावून त्यांना जागा देण्यात याव्यात असे कळविण्यात आले आहे. त्या दृष्टीने आता स्थानिक पातळीवरही हालचाल सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. महायुतीतील भाजपचे मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटाने मात्र कमी जागा घेण्यास नकार दिला आहे. शिंदे गटाने तर आम्हाला २० पेक्षा अधिक जागां मिळाव्या असा दावा केला आहे. त्यामुळे महापालिकेत महायुती होण्याची शक्यता कमी वाटत होती.
भाजपाची जागा कमी करण्याची तयारी
राज्यात शक्यतो महायुती करावी असा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा आग्रह असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे जळगाव महापालिकेतही महायुती कायम रहावी यासाठी भाजपची मित्र पक्षासाठी जागा कमी असण्याची तयारी असल्याचे सांगितले जात आहे. महापालिकेतील ७५ जागापैकी भाजप साधरणतः ५० जागा लढविण्याची शक्यता असून उर्वरीत २५ जागा दोन्ही मित्र पक्षांना देण्याचे संकेत आहे. २५ जागामध्ये शिवसेना शिंदे गट जास्त जागा घेण्याची शक्यता असून अजित पवार पक्षाला तिसऱ्या क्रमांकाच्या जागा जाण्याची शक्यता आहे. महापालिकेत महायुती राहिल्यास मोठा फायदा होईल असा अंदाज आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मनपात भाजपची ताकद माेठी
जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षाची मोठी ताकद आहे. ७५ नगरसेवकांपैकी तब्बल ५७ नगरसेवक भाजपचे निवडून आले होते. मात्र अवघ्या अडीच वर्षात त्यातीही २७जणांनी बाहेर पडून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश घेतला आहे. त्यामुळे भाजपच नगरसेवक संख्या अवघ्या २६ नगरसेवकांवर आली होती. मात्र तरी भाजप महायुतीत या निवडणूकीत ५७ जागाच लढविणार असल्याच्या दाव्याव कायम आहे.