इंदिरा गांधी यांच्या काळानंतरचे सर्वांत शक्तिशाली पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींचे नेतृत्व उदयास आले आहे; परंतु कोरोना महामारीच्या दुसर्या साथीने त्यांची प्रतिमा धूसर करून टाकली. अर्थात, तरीही अद्याप ते लोकप्रिय नेते आहेत. लसीकरणाचे धोरण, रुग्णालयांत खाटांची कमतरता तसेच ऑक्सिजनची टंचाई यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
काही राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोदींची जादू चालल्याचे दिसले नाही. पहिली समस्या अशी की, काही राज्यांमध्ये भाजपाने अनेक पक्षबदलू लोकांना सामील करून घेतले आहे. त्यामुळे भाजपमध्ये मूळ कार्यकर्त्यांत नाराजी आहे.
आपण अनेक वर्षांपासून पक्षाचे काम करीत असताना पक्षात काल-परवा दाखल झालेल्या लोकांना सन्मानाची बागणूक दिली जाते, अशी त्यांची भावना झाली आहे. उत्तरप्रदेश, कर्नाटक, आसाम आणि उत्तराखंडमध्ये काहीशी अशीच परिस्थिती आहे. उत्तरप्रदेश हे एक मोठे राज्य असल्यामुळे भाजपाला तेथे आशा अधिक आहेत. २०१७ मध्ये भाजपाने या राज्यात मोठे यश संपादन केले होते. मतभेद व्यक्त करणाऱ्यांकडे अनेक मुद्दे आहेत.
[read_also content=”भारतीय अधिकाऱ्यांची तालिबान्यांशी चर्चा; फलदायी ठरेल का? https://www.navarashtra.com/latest-news/indian-officials-discuss-with-taliban-will-it-be-fruitful-nrvb-146946.html”]
गुजरात कॅडरचे सेवानिवृत्त अधिकारी ए. के. शर्मा यांनी पंतप्रधान कार्यालयातही सेवा बजावली आहे. या शिस्त आणि संघटनात्मक एकीसाठी प्रसिद्ध असलेल्या भाजपामध्ये अंतर्गत कलह वाढत चालला आहे. अन्य राजकीय पक्ष आपापल्या नेत्यांवर अशा प्रकारच्या संघर्षात गुंतण्याची वेळ आणत नाहीत असे नाही; परंतु हीच गोष्ट भाजपामध्ये घडल्यावर निश्चितपणे चर्चा होणारच.
वर्षाच्या सुरुवातीला त्यांना उत्तरप्रदेशात विधानपरिषद सदस्य बनविण्यात आले. त्यांना पक्षातही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे जुने-जाणते नेते शर्मा यांच्याकडे एक नवे आव्हान म्हणून पाहतात, कारण शर्मा यांना पंतप्रधानांचा पाठिंबा आहे. काही विरोधक तर मुख्यमंत्री बदलण्याचीही मागणी करीत आहेत. त्याचप्रमाणे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नात्यांमध्ये कटुता आल्याचीही चर्चा आहे.
पश्चिम बंगालचा विचार करायचा झाल्यास पक्षबदलू नेते तृणमूल काँग्रेसमध्ये ‘घरवापसी’ करू लागले आहेत. मुकुल रॉय हे ‘घरवापसी’ करणारे बडे नेते आहेत. पूर्वी मुकुल रॉय हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय होते. भाजपाच्या स्थानिक शाखेत अशीही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे की, हे सर्व काही निवडणुकीची रणनीती म्हणून घडवून आणण्यात आले.
[read_also content=”राजकीय पर्यायांची शोधमोहीम; हा चमत्कार प्रत्यक्षात होईल का? https://www.navarashtra.com/latest-news/exploring-political-alternatives-will-this-miracle-actually-happen-nrvb-146559.html”]
कर्नाटकमध्येही सरकार अंतर्गत भांडणांनी ग्रस्त आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना बदलण्याची मागणीही होऊ लागली आहे. त्रिपुरामध्ये विरोधक पुन्हा एकदा डोके वर काढू लागले आहेत. काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेले काही आमदार मुख्यमंत्री बिप्लव कुमार देव यांना पदावरून दूर करण्याची मागणी करीत आहेत. राजस्थानात माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे राज्याच्या नव्या नेतृत्वाला मानण्यास नकार देत आहेत. त्या आपले स्वतंत्र कार्यक्रम जाहीर करीत आहेत.
भाजपमध्ये स्थानिक पातळीवर सर्वकाही आलबेल नाही, असेच दाखवून देणाऱ्या या घटना आहेत. अर्थात, अद्याप परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली नाही.काँग्रेससुद्धा सध्या अंतर्गत मतभेदांचा सामना करीत आहे. केंद्रीय नेतृत्व कमकुवत असल्यावर राज्यांमधील शाखांचा आवाज वाढणे स्वाभाविक आहे.
BJP is big political party complaints is also big But Corona came got hurt and discussions is going on