Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोक्यात पाणी साठण्याची कारणे आणि त्यावरील उपचार काय करावे; जाणून घ्या

  • By Rashmi Dongre
Updated On: Aug 03, 2024 | 01:22 PM
डोक्यात पाणी साठण्याची कारणे आणि त्यावरील उपचार काय करावे; जाणून घ्या
Follow Us
Follow Us:

डोक्यात पाणी होणे ही समस्या सर्वच वयोगटातील व्यक्तींना होऊ शकते. त्यातही प्रामुख्याने लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींमध्ये याचे प्रमाण अधिक आढळते. डोक्यात जास्त पाणी साठण्यामुळे डोक्यातील दाब वाढतो. यामुळे मेंदूला सूज येऊ शकते.

डोक्यात पाणी साठणे या आजाराला English मध्ये Hydrocephalus असे म्हणतात. हायड्रोसेफलस ही एक धोकादायक स्थिती असून यावर वेळीच उपचार होणे आवश्यक असते. कारण यामुळे मेंदूचे नुकसान होऊ शकते. डोक्यात पाणी होणे याची कारणे, लक्षणे आणि उपचार याविषयी माहिती डॉ. सतीश उपळकर यांनी येथे दिली आहे. सेरेब्रोस्पाइनल फ्लुइडच्या असंतुलनामुळे हा आजार होतो. आपल्या शरीरात मेंदू आणि मणक्याच्या भोवती सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड (CSF) नावाचा द्रवपदार्थ वाहत असतो. सामान्य स्थितीमध्ये रक्तवाहिन्या ह्या CSF द्रवपदार्थ शोषून घेत असतात. मात्र काही कारणामुळे ह्या CSF द्रव्याचे प्रमाण अधिक वाढल्यास डोक्यात पाणी होण्याची स्थिती निर्माण होते.

खालील तीन कारणांमुळे CSF द्रव्याचे प्रमाण अधिक वाढू लागते.
१) सेरेब्रोस्पाइनल फ्लुइडच्या प्रवाहात अडथळा आल्याने जास्त प्रमाणात CSF जमा होऊ लागतो.
२) रक्तवाहिन्यांद्वारे CSF द्रव शोषून घेण्याची क्षमता कमी झाल्यामुळे हा द्रवपदार्थ अधिक जमा होतो.
३) जर मेंदू अधिक प्रमाणात CSF द्रव्य तयार करीत असल्यास याचे प्रमाण अधिक वाढते.

याशिवाय जन्मजात मणक्यातील दोष, आनुवंशिकता, गर्भावस्थेत रूबेलाचे इन्फेक्शन झाल्यानेही डोक्यात पाणी होण्याची समस्या होऊ शकते. लहान मुलांमध्ये डोक्यात पाणी साठणे ही समस्या अधिक आढळते. मुलांमध्ये प्रामुख्याने Meningitis, मेंदूत रक्तस्त्राव होणे, डिलिवरीवेळी बाळाच्या डोक्याला दुखापत होणे, ट्यूमर अशा अनेक कारणांमुळे लहान मुलांना डोक्यात पाणी होण्याची समस्या होऊ शकते.

डोक्यात पाणी साठणे याची लक्षणे
१) बऱ्याच दिवसांपासून डोके दुखणे,
२) मळमळ व उलट्या होणे,
३) अंधुक दिसणे,
४) नजर स्थिर ठेवता न येणे,
५) शरीराचा तोल सांभाळता न येणे,
६) अचानक तोल जाऊन पडणे,
७) चालण्यास त्रास होणे,
८) वारंवार लघवीला होणे,
९) अधिक झोप येणे यासारखी लक्षणे यामध्ये असू शकतात.

लहान मुलांमध्ये आढळणारी लक्षणे
१) मुलाला उलट्या होणे,
२) डोळे खालच्या बाजूस होतात,
३) अधिक झोप येणे,
४) चिडचिड करणे,
५) भूक कमी होणे,
६) झटके येणे,
७) डोके मोठे झाल्यासारखे वाटणे
अशी लक्षणे लहान मुलांमध्ये डोक्यात पाणी साठणे या आजारात दिसू शकतात.

[read_also content=”रात्री झोपण्‍यापूर्वी खा फक्‍त दोन विलायची; सकाळी उठल्यावर कमाल पाहा https://www.navarashtra.com/lifestyle/at-night-before-going-to-bed-eat-only-two-molasses-when-you-wake-up-in-the-morning-see-makam-nrrd-340883″]

हायड्रोसेफलसचे निदान
डोक्यात पाणी साठले आहे की नाही याचे निदान करण्यासाठी आपले डॉक्टर अल्ट्रासाऊंड तपासणी, सीटी स्कॅन, MRI स्कॅन, एक्स-रे यासारख्या तपासण्या करू शकतात.

डोक्यात पाणी साठणे यावर उपचार
डोक्यात पाणी साठणे ही एक धोकादायक स्थिती असून यावर वेळीच उपचार होणे आवश्यक आहे. उपचार न केल्यास ब्रेन डॅमेज होण्याचा धोका असतो. उपचारामध्ये Shunt insertion, वेंट्रिक्युलोस्टोमी यासारख्या शस्त्रक्रिया करतात. ऑपरेशनमध्ये एक पातळ ट्युब जोडून अतिरिक्त सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड या ट्युबमधून दुसरीकडे जाईल याची व्यवस्था केली जाते.

डोक्यात पाणी साठू नये यासाठी घ्यायची काळजी
१) लहान मुलांच्या डोक्याला दुखापत होणार नाही याची काळजी घ्यावी.
२) बालकांना Meningitis या आजारासंबंधित लस द्यावी.
३) मोठ्या व्यक्तींनी डोक्याला मार लागणार नाही याची काळजी घ्यावी. वाहन चालवताना हॅल्मेट आणि सीटबेल्टचा वापर करावा.
४) बऱ्याच दिवसांपासून डोके दुखणे, उलट्या होणे, झोप अधिक येणे अशी लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांकडे जाऊन योग्य निदान व उपचार घ्यावेत.

Web Title: Causes of water retention in the head and what to do about it find out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2022 | 01:46 PM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

Lifestyle Tips : लहान बर्फाचा तुकडा शरीराच्या अनेक आजारांना दूर पळवून लावू शकतो, वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
1

Lifestyle Tips : लहान बर्फाचा तुकडा शरीराच्या अनेक आजारांना दूर पळवून लावू शकतो, वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

रोज वापरली जाणारी टॅल्कम पावडर वाढवेल गंभीर आजाराला धोका, वेळीच व्हा सावध; डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला
2

रोज वापरली जाणारी टॅल्कम पावडर वाढवेल गंभीर आजाराला धोका, वेळीच व्हा सावध; डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

मनात घाणेरडे विचार येतात म्हणून अपराधी वाटतंय? दूर राहण्यासाठी करा या ७ गोष्टी
3

मनात घाणेरडे विचार येतात म्हणून अपराधी वाटतंय? दूर राहण्यासाठी करा या ७ गोष्टी

Brain Tumor: मेंदूचे आरोग्य आणि जीवनशैलीचा काय संबंध? काय आहे जोखीम
4

Brain Tumor: मेंदूचे आरोग्य आणि जीवनशैलीचा काय संबंध? काय आहे जोखीम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.