Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोज वापरली जाणारी टॅल्कम पावडर वाढवेल गंभीर आजाराला धोका, वेळीच व्हा सावध; डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Talcum Powder : दररोज त्वचेवर वापरली जाणारी टाल्कम पावडर अनेक आजारांचा धोका वाढवू शकते. डाॅक्टर लहान मुलांवर या पावडरचा वापर न करण्याचा सल्ला देतता. टाल्कम पावडरमुळे कोणते आजार वाढू शकतात ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 11, 2026 | 08:15 PM
रोज वापरली जाणारी टॅल्कम पावडर वाढवेल गंभीर आजाराला धोका, वेळीच व्हा सावध; डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

रोज वापरली जाणारी टॅल्कम पावडर वाढवेल गंभीर आजाराला धोका, वेळीच व्हा सावध; डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Follow Us
Follow Us:
  • रोजच्या वापरातील एका लोकप्रिय उत्पादनाबाबत तज्ज्ञांनी आरोग्यविषयक चिंता व्यक्त केली आहे.
  • काही सौंदर्यप्रसाधने आणि वैयक्तिक निगा उत्पादनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांवर सध्या चर्चा सुरू आहे.
  • विशेषतः लहान मुले आणि संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींनी काही गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
रोजच्या वापरात अनेकजण टॅल्कम पावडरचा वापर करतात पण तुम्हाला माहितीये का? हिच टाल्कम पावडर तुमच्या जीवावरही उठू शकते. समोर आलेल्या माहितीनुसार. टॅल्कम पावडरमध्ये असे काही घटक वापरले जातात ज्यामुळे कॅन्सरचा धोका अनेक पटींनी वाढतो. याचा वापर फुफ्फुसे आणि त्वचेच्या रोगाचाही धोका वाढवू शकतात. विशेषत: लहान मुलांसाठी या पावडरने चुकूनही वापर करु नये. फक्त सामान्य पावडर नाही तर अनेक ब्यूटी प्रोडक्टसमध्येही टाल्कम पावडरचा वापर केला जातो ज्यामुळे असे प्रोडक्ट्स रोजच्या जीवनात वापरु नये. त्यांचा अतिवापर कमी करावा. टाल्कम पावडरचा सतत वापर शरीरातील नैसर्गिक तेल पटकन शोषून घेतो ज्यामुळे चेहरा ड्राय पडू लागतो.

वीजेचे बिल शून्याच्या जवळ आणायचंय? मग Solar Panel बसवताना या 4 चूका अजिबात करु नका

टॅल्क म्हणजे काय?

टॅल्क ही साधारणपणे नैसर्गिकरित्या आढळणारी चिकणमाती आहे जी मॅग्नेशियम सिलिकेटपासून बनवली जाते. यात मॅग्नेशीयम, ऑक्सीजन आणि सिलिकाॅनसारखे घटक मसळलेले असतात. पृथ्वीवरील सर्वात मऊ खनिज मानले जाते जे बारीक करुन त्याच्यापासून टॅल्कम पावडर तयार केली जाते. टॅल्क हा सामान्यपणे धोकादायक नसतो. ब्यूटी प्रोडक्ट्समध्येही याचा वापर सुरक्षित मानला जातो परंतु टॅल्कमध्ये एस्बेस्टॉस देखील असतो जो कर्करोगाचे एक प्रमुख कारण आहे. तो टॅल्कच्या जवळच्या परिसरात आढळतो. टॅल्कसोबतच त्याचेही उत्खनन केले जाते.

टॅल्कम पावडर आणि टॅल्कयुक्त मेकअप उत्पादने काही तज्ज्ञांच्या मते संभाव्यतः असुरक्षित मानली जातात, कारण टॅल्क पूर्णपणे ॲस्बेस्टॉस-मुक्त आहे की नाही किंवा त्यापासून तयार केलेले उत्पादन वापरण्यास सुरक्षित आहे की नाही, हे निश्चितपणे ठरवण्यासाठी एकसमान आणि सार्वत्रिक मानके उपलब्ध नाहीत.

कोणत्या ब्यूटी प्रोडक्समध्ये टॅल्कचा वापर होतो?

ब्लश, आय शॅडो, कॉम्पॅक्ट पावडर आणि इतर मॅटिफायिंग मेकअप प्रोडक्ट्स. याशिवाय बेबी प्रोडक्ट्समध्येही याचा वापर होतो. प्लास्टिक आणि रबरी वस्तूंची टिकाऊपणा वाढवण्यासाठी, पेंट, सिरॅमिक आणि कागद बनवण्यासाठीही याचा वापर केला जातो.

शरीराला काय धोका होतो?

टॅल्कम पावडरचे नुकसान लगेच दिसून येत नाही. पण जर तुम्ही अधिक काळापासून या पावडरचा वापर करत असाल तर काळासोबत तुमच्या त्वचेच तुम्हाला काही बदल झालेले दिसून येतील.

त्वचेची छिद्रे बंद होणे आणि मुरुमे

जेव्हा सतत किंवा दररोज टॅल्कम पावडरचा वापर केला जातो तेव्हा याचे कण त्वचेवर साचून हळूहळू त्वचेची छिद्रे बंद करतात. यामुळे त्वचेवरील घाण आणि तेल दूर करता येत नाही. परिणामी त्वचेवर मुरुमांची समस्या जाणवू लागते.

संवेदनशील त्वचा

टॅल्क फार वेगाने त्वचेतील ओलावा शोषून घेते ज्यामुळे त्वचा कोरडी होऊ लागते. टॅल्कच्या सततच्या वापरामुळे त्वचा संवेदनशील होऊ शकते. त्वचेवरील ओलावा दूर केल्यामुळे टॅल्क त्वचेवरील संरक्षण थर कमकुवत करतो. यामुळे त्वचेला खाज सुटते आणि पुरळ होण्याची समस्या जाणवू लागते.

लहान मुलांसाठी हानिकारक

बालरोगतज्ञ कधीही मुलांवर टॅल्कम पावडरचा वापर न करण्याचा सल्ला देतात. अनेकदा लहान मुलांच्या गुप्तांगावर पावडरचा वापर केला जातो. टॅल्कमुळे त्या भागात खाज सुटु शकते आणि संवेदनशिलता येऊ शकते. तसेच, श्वासावाटे ही पावडर शरीराच्या आत गेल्यास फुफ्फुसांनाही धोका निर्माण होऊ शकतो.

दर आठवड्याला २ ते ३ महिलांमध्ये आढळतात रक्तस्त्रावासंबंधी विकारांची लक्षणे; वेळीच निदान आणि जनजागृतीची अत्यावश्यकता

शरीराला नुकसान

टॅल्कमध्ये ॲस्बेस्टॉस असल्याने जर ते नाकावाटे फुफ्फुसांमध्ये गेले तर यामुळे आजाराचा धोका वाढू शकतो. यामुळे फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचा धोकाही वाढू शकतो. महिलांमध्ये यामुळे ओव्हरीयन कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.

Web Title: Talcum powder health risks experts warn about long term side effects lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • cancer
  • Health Tips
  • lifestyle news
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

Relationship Tips: प्रेम कमी नाही झालंय, पण तरीही नात्यात येतोय दुरावा; 7 सवयींवर द्या लक्ष, नाहीतर तुटेल नातं
1

Relationship Tips: प्रेम कमी नाही झालंय, पण तरीही नात्यात येतोय दुरावा; 7 सवयींवर द्या लक्ष, नाहीतर तुटेल नातं

Teeth Infection: अक्कल दाढेचा त्रास की हिरड्यांमधील इन्फेक्शन? चावताना वेदना होत असतील, वेळीच ओळखा संकेत
2

Teeth Infection: अक्कल दाढेचा त्रास की हिरड्यांमधील इन्फेक्शन? चावताना वेदना होत असतील, वेळीच ओळखा संकेत

World Bamboo Day: जागतिक बांबू दिन का साजरा केला जातो? कधी झाली होती सुरूवात, मनोरंजक तथ्य
3

World Bamboo Day: जागतिक बांबू दिन का साजरा केला जातो? कधी झाली होती सुरूवात, मनोरंजक तथ्य

International Equal Pay Day: पुरुषांपेक्षा अधिक मेहनत, पण तरीही महिलांना वेतन कमी; कधी कमी होणार अंतर
4

International Equal Pay Day: पुरुषांपेक्षा अधिक मेहनत, पण तरीही महिलांना वेतन कमी; कधी कमी होणार अंतर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.