Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीसाठी केंद्राकडून ४९ कोटींचा निधी

  • By Navarashtra News Network
Updated On: Sep 03, 2021 | 07:31 PM
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीसाठी केंद्राकडून ४९ कोटींचा निधी
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी-चिंचवड : गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय, सरकारच्या वतीने आयोजित स्मार्ट सिटी चॅलेंजच्या तिसऱ्या फेरीमध्ये भारत सरकारने स्मार्ट सिटी मिशन (एससीएम) अंतर्गत पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी स्मार्ट प्रपोजल (एससीपी) ची निवड करून १३ जुलै २०१७ रोजी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची स्थापना करण्यात आली. केंद्र शासन पुरस्कृत स्मार्टसिटी अभियानांतर्गत तिस-या टप्प्यात निवड झालेल्या पिंपरी चिंचवड शहराकरीता केंद्र शासनाकडून स्मार्ट सिटी अंतर्गत येणा-या विविध विकासकामे, प्रशासकीय व कार्यालयीन खर्चाकरिता तिसरा हप्ता म्हणून ४९ कोटी इतका प्रकल्प निधी प्राप्त झाला आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांनी दिली.

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून तीन वर्षाच्या कालावधीसाठी १ हजार कोटी रुपये निधीचा विकास आराखडा मंजूर झाला आहे. त्यापैकी पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीला आतापर्यंत ५८७.८४ कोटी निधी मिळाला आहे. केंद्र शासन ५० टक्के, राज्य शासन २५ टक्के आणि पिंपरी चिंचवड महापालिका २५ टक्के असा एकूण निधी स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या विविध विकासकामांकरीता उपलब्ध केला जातो. त्याअनुषंगाने स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांसाठी केंद्र शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली होती.

शासननिर्णय क्रमांक स्मार्टसि-२०२१/प्र.क्र.१६१/नवि-३३ नुसार केंद्र शासनाकडून तिस-या टप्प्यातील ४६.५० कोटी प्रकल्पनिधी तर प्रशासकीय व कार्यालयीन खर्चाकरिता २.५० कोटी रुपये असे एकूण ४९ कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर राज्य शासनाकडून त्यांच्या हिश्याची २४.५० कोटी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यात आली असून, सदरचा निधी जिल्हाधिकारी पुणे कोषागारातून आहरित करून पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीकडे वर्ग केला जाणार आहे. तसेच, पिंपरी चिंचवड महापालिकेचा स्वहिस्सा २४.५० कोटी वर्ग करण्याची कार्यवाही सुरु असून, आठवडाभराच्या कालावधीत हा निधी स्मार्ट सिटीसाठी उपलब्ध होणार आहे.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत तयार करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी प्रपोजलमध्ये एरिया बेस डेव्हलपमेंट (एबीडी) आणि पॅन सिटी सोल्यूशन (पॅन सिटी) हे दोन घटक असून, त्यामध्ये अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. यामध्ये सिटी नेटवर्क, सिटी वायफाय, स्मार्ट किओक्स आणि व्हीएमडी सोल्युशन, आयसीटी-एलइडी पीसीएससीएल स्मार्ट सिटी सोल्युशन्स, सिलेक्शन ऑफ सिस्टीम इंटेग्रेटर फॉर इंटेग्रेटेड जीआयएस इनॅबल इआरपी सोल्युशन्स, स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर तसेच एबीडी प्रकल्पामध्ये सोलर पॉवर जनरेशन, बायसिकल शेअरिंग, म्युनिसिपल ई-क्लासरुम, स्मार्ट रोड, इन्क्लुडींग फुटपाथ, सायकल जक्शन डिझाईन, स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज, सेव्हर नेटवर्क, टु पार्क अँड पब्लीक टॉयलेटस इंक्लुडिंग स्ट्रीट टॉयलेट या प्रकल्पांचा समावेश असल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

Web Title: Center provides rs 49 crores for pimpri chinchwad smart city nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2021 | 07:31 PM

Topics:  

  • Pimpri Chinchwad
  • Smart City

संबंधित बातम्या

पीएमआरडीएचा ‘अभियांत्रिकी’वर भर; रस्ते, मेट्रो अन् बोगद्यासाठी निधीचे मोठे आव्हान
1

पीएमआरडीएचा ‘अभियांत्रिकी’वर भर; रस्ते, मेट्रो अन् बोगद्यासाठी निधीचे मोठे आव्हान

World Meteorological Day : काँक्रीटच्या जंगलात हरवली हिरवाई; वाढत्या धुलीकणांमुळे पिंपरीत आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
2

World Meteorological Day : काँक्रीटच्या जंगलात हरवली हिरवाई; वाढत्या धुलीकणांमुळे पिंपरीत आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

कडक उन्हात उसाच्या रसाचा ‘थंडावा’; रसवंतीगृहांबाहेर अबालवृद्धांची गर्दी
3

कडक उन्हात उसाच्या रसाचा ‘थंडावा’; रसवंतीगृहांबाहेर अबालवृद्धांची गर्दी

पिंपरी-चिंचवड शहराचा होणार कायापालट; रस्ते रुंदीकरण, मेट्रो मार्गाचे सुशोभीकरण अन्…
4

पिंपरी-चिंचवड शहराचा होणार कायापालट; रस्ते रुंदीकरण, मेट्रो मार्गाचे सुशोभीकरण अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.