Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर; एकूण 10 शाळांची नावे समोर

शासनाचे निकष पूर्ण न करणाऱ्या आणि आवश्यक मान्यता नसलेल्या इंग्रजी माध्यमाच्या १० शाळांची यादी पिंपरी- चिंचवड महापालिका प्रशासनाने जाहीर केली आहे

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 07, 2026 | 03:18 PM
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर; एकूण 10 शाळांची नावे समोर

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर; एकूण 10 शाळांची नावे समोर

Follow Us
Follow Us:

पिंपरी : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरातील अनधिकृत शाळांविरुद्ध कडक पाऊल उचलले आहे. शासनाचे निकष पूर्ण न करणाऱ्या आणि आवश्यक मान्यता नसलेल्या इंग्रजी माध्यमाच्या १० शाळांची यादी प्रशासनाने जाहीर केली आहे. या शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश घेऊ नयेत, असे आवाहन महापालिकेच्या शिक्षणाधिकारी संगीता बांगर यांनी केले आहे.

 

महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने संबंधित शाळांना वारंवार नोटिसा बजावून तांत्रिक कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या शाळांनी निकषांचे उल्लंघन कायम ठेवल्याने प्रशासनाने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. विद्यार्थ्यांची आणि पालकांची फसवणूक टाळण्यासाठी १ जूनपासून या सर्व अनधिकृत शाळांच्या मुख्य प्रवेशद्वारावर “ही शाळा अनधिकृत असून येथे प्रवेश घेऊ नये” असे स्पष्ट फलक महापालिकेतर्फे लावले जाणार आहेत.

पालकांनो, सावधान!

अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांना भविष्यात अनेक कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागू शकते. यामध्ये प्रामुख्याने: शाळा सोडल्याचा दाखला (एलसी) मिळण्यात अडचण, बोर्डाच्या परीक्षेसाठी अपात्र ठरणे, पुढील उच्च शिक्षणासाठी प्रवेश नाकारला जाणे, या धोक्यांमुळे पालकांनी केवळ अधिकृत शाळांची खातरजमा करूनच प्रवेश निश्चित करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

‘या’ आहेत ‘त्या’ १० अनधिकृत शाळा

महानगरपालिकेने जाहीर केलेल्या यादीनुसार खालील शाळा अनधिकृत ठरवण्यात आल्या आहेत.

१. ब्लोमिंग बर्ड्स (ताथवडे)

२. लिटील स्टार इंग्लिश स्कूल (चिंचवडेनगर)

३. माऊंट एव्हरेस्ट (कासारवाडी)

४. डी.एम.के. इंटरनॅशनल (कासारवाडी)

५. माने इंग्लिश स्कूल (काळेवाडी)

६. नर्चर इंटरनॅशनल (चऱ्होली)

७. माईंडवर्ल्ड इंटरनॅशनल (चऱ्होली)

८. हेम्स इंटरनॅशनल (वाकड)

९. कॅटलिस्ट इंटरनॅशनल (चऱ्होली फाटा)

१०. गॅलेक्सी इंटरनॅशनल (मोशी)

“या शाळांकडे शासनाची आवश्यक मान्यता नाही. त्यामुळे येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. पालकांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता शाळा अधिकृत असल्याची खात्री करावी आणि मगच प्रवेशाचा निर्णय घ्यावा.” — संगीता बांगर, शिक्षणाधिकारी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.

हे सुद्धा वाचा : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; महापौरांच्या फोटोमुळे सोशल मीडियावर संताप

Web Title: Pimpri chinchwad municipal corporation has announced a list of unauthorized schools

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 03:18 PM

Topics:  

  • Pimpri Chinchwad
  • Ravi Landge
  • School news

संबंधित बातम्या

Pune Crime: नाव सारखं असल्याचा फायदा घेतला, जमीनही परस्पर विकली; 3 कोटींच्या फसवणुकीने पिंपरीत खळबळ
1

Pune Crime: नाव सारखं असल्याचा फायदा घेतला, जमीनही परस्पर विकली; 3 कोटींच्या फसवणुकीने पिंपरीत खळबळ

Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरात पाणी संकट वाढणार; ‘या’ तारखेपासून १० टक्के पाणी कपात
2

Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरात पाणी संकट वाढणार; ‘या’ तारखेपासून १० टक्के पाणी कपात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.