Champions Trophy 2025 : अफगाणिस्तान पराभवाच्या छायेत, 315 धावांचे लक्ष्य गाठताना दमछाक
Champions Trophy 2025 South africa vs Afghanistan : अफगाणिस्तान 315 धावांचे विशाल लक्ष्य घेऊन मैदानात उतरले खरे परंतु त्यांना विशेष हे लक्ष्य गाठताना दमछाक झाली. अफगाणिस्तानची सुरुवातच अत्यंत डळमळीत झाली. त्यांच्या पहिल्या दोन विकेट अवघ्या 40 धावांच्या आत पडल्या. त्यानंतर सईदुल्ला अटल हा रनआऊट झाला. यानंतर रेहमत शाह यांनी अफगाणिस्तानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. सध्या तो फलंदाजी करीत आहे. आज कर्णधार हशमुतुल्लाह शाहिदी अवघ्या 0 शून्यावर बाद झाला. त्यानंतर अझमुतुल्लाह ओमराझे याने 18 धावा केल्या.
रेयान रिकल्टनचे शानदार शतक
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 9 मोसमात आजचा सामना अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात खेळवला जात आहे. यामध्ये दक्षिण अफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान समोर 315 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले. यामध्ये रेयान रिकल्टनने शानदार शतक झळकावत दक्षिण अफ्रिकेला एक सन्मानजनक स्कोअरपर्यंत नेऊन ठेवले. यामध्ये कर्णधार बवुमाने 76 चेंडूत 58 धावा केल्या तर वान देर दुसेनने 46 चेंडूत 52 धावा केल्या. तसेच मार्करामने नाबाद 52 धावा ठोकत अफ्रिकेला 300 धावांच्या पार नेले. इतर फलंदाज विशेष कामगिरी करू शकले नाहीत. द. अफ्रिकेने निर्धारित 50 षटकांमध्ये 6 विकेट गमावून 315 धावा केल्या.
अफगाणिस्तानची बिकट अवस्था
21 Overs Completed! 📝@RahmatShah_08 (18*) and @AzmatOmarzay (17*) are in the middle as #AfghanAtalan reach 84/4 after 21 overs in the 2nd inning. 👍
📸: ICC/Getty#ChampionsTrophy | #AFGvSA | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/MrHUYJFlCN
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) February 21, 2025
मोहम्मद नबीचे सर्वाधिक 2 विकेट
अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबीने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. तर फझुल्लाह फारुखी, अढमतुल्लाह, नूर अहमदला प्रत्येकी 1 विकेट मिळाली. यामध्ये सर्वात महागडा गोलंदाज फारुखी ठरला. त्यानंतर स्टार गोलंदाज रशिद खानसुद्धा महागडा ठरला त्याला एकही विकेट मिळाली नाही. नूर अहमदने 9 ओव्हरमध्ये 65 धावा दिल्या.
रायन रिकल्टनने १०६ चेंडूत ७ चौकार आणि एक षटकार
कराचीतील नॅशनल स्टेडियमवर झालेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात रायन रिकल्टनने १०६ चेंडूत ७ चौकार आणि एक षटकार मारला. त्याने कर्णधार टेम्बा बावुमासोबत दुसऱ्या विकेटसाठी १२९ धावांची भागीदारी केली. यानंतर, रिकी पॉन्टिंगने रॅसी व्हॅन डर ड्यूसेनसह तिसऱ्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी केली. या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक करणारा रिकी पाचवा फलंदाज ठरला. याआधी न्यूझीलंडने दोन आणि बांगलादेश आणि भारताने प्रत्येकी एक शतक केले आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात २ शतके झळकावली
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात यजमान पाकिस्तानविरुद्ध न्यूझीलंडचे दोन फलंदाज विल यंग आणि टॉम लॅथम यांनी शतके झळकावली. या सामन्यात किवी संघाने ६० धावांनी विजय मिळवला. तर भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात २ शतके झाली. बांगलादेशकडून तौहीद हृदयॉयने शतक झळकावले तर भारताकडून सलामीवीर शुभमन गिलने शतक झळकावले. भारत विरुद्ध बांगलादेश सामना दुबईमध्ये खेळवण्यात आला तर पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामना कराचीमध्ये खेळवण्यात आला.