
कमी खाल्ल्यानंतर सुद्धा पोटात कायमच गॅस होतो? अपचनाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी करा 'हा' घरगुती उपाय
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. शिळ्या अन्नपदार्थांचे सेवन, जंक फूडचे अतिसेवन, पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव, धूम्रपान, शारीरिक हालचाली न करणे इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर होण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात कायमच सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. तसेच नियमित भरपूर पाणी प्यावे. जेवणाची वेळ चुकल्यानंतर शरीराची पचनक्रिया बिघडते. शरीराची पचनक्रिया बिघडल्यानंतर शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात. ज्यामुळे अपचन, पोटात दुखणे, गॅस,ऍसिडिटी, आम्ल्पित्ता वाढणे, उलट्या, मळमळ इत्यादी अनेक गंभीर लक्षणे दिसू लागतात. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक संपूर्ण शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण करतात.(फोटो सौजन्य – istock)
ॲनिमियावाढीची चिंताजनक नोंद! राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये कॅन्सरच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ
आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाणे आवश्यक आहे. अन्यथा शरीराला कोणत्याही आजाराची लागण होऊ शकते. पोटात वाढलेला गॅस, अपचन इत्यादी समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मेडिकलमधील गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. पण सतत पेनकिलरच्या गोळ्या खाल्ल्यामुळे किडनीचे आरोग्य काहीसे बिघडते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पोटात वाढलेला गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहोत. हा घरगुती उपाय केल्यास आतड्यांमध्ये साचलेली घाण बाहेर पडून जाण्यासोबतच संपूर्ण शरीर डिटॉक्स होईल.
पोटात वाढलेला गॅस कमी करण्यासाठी कायमच घरगुती पदार्थांचे सेवन करावे. घरगुती पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्य सुधारते आणि पोटात जमा झालेली सर्व घाण बाहेर पडून जाते.यासाठी वाटीमध्ये गाईचं तूप, सैंधव मीठ आणि चिमूटभर हिंग मिक्स करून पेस्ट तयार करा. सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर जेवण्याच्या आधी चमचाभर खा. त्यानंतर कोमट पाण्याचे सेवन करा. हा उपाय शरीरासाठी अतिशय प्रभावी आणि आरोग्यदायी ठरतो. तुपाच्या सेवनामुळे पचनक्रिया सुधारते.
सर्वच स्वयंपाक घरात तूप असतेच. जेवणातील पदार्थ आणि गोड पदार्थ बनवताना तुपाचा वापर केला जातो. तूप खाल्यामुळे आतड्यांची हालचाल सुलभ होते. याशिवाय पोटात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाते. तुपामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्म आरोग्य सुधारतात. पचनक्रिया बिघडल्यास कोमट पाण्यात चमचाभर तूप मिक्स करून प्यावे. यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेला गॅस बाहेर पडून जातो आणि आतड्या स्वच्छ होतात. तसेच तुपामध्ये ए, डी, ई आणि के सारख्या चरबी-विरघळणारे जीवनसत्त्वे आढळून येतात.
जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना हिंग वापरले जाते. हिंगामुळे पदार्थाची चव वाढते आणि पचनक्रिया सुधारते. गॅस, पोटदुखी, आम्लपित्त आणि बद्धकोष्ठता इत्यादी सर्वच समस्यांवर हिंग प्रभावी ठरते. हिंगाच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे छातीत वाढलेली जळजळ आणि ऍसिडिटी नियंत्रणात राहते. सैंधव मीठ पचनसंस्था मजबूत करते. पचनाच्या समस्या उद्भवू नये म्हणून सैंधव मीठ खावे.
बद्धकोष्ठतेची सामान्य कारणे काय आहेत?
आहारात फायबरची कमतरता, पुरेसे पाणी न पिणे, कमी शारीरिक हालचाल (बैठी जीवनशैली), काही औषधे आणि तणाव ही बद्धकोष्ठतेची काही सामान्य कारणे आहेत.
बद्धकोष्ठतेसाठी काही घरगुती उपाय आहेत का?
दिवसाची सुरुवात कोमट पाणी पिऊन करणे फायदेशीर ठरू शकते, जे आतड्यांची हालचाल सुधारण्यास मदत करते.फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करणे हा एक प्रभावी उपाय आहे.
बद्धकोष्ठता म्हणजे काय?
बद्धकोष्ठता म्हणजे अशी स्थिती जिथे शौचास त्रास होतो, नियमित शौचास होत नाही किंवा शौचात अडचण येते.