लिव्हरमध्ये उष्णता वाढल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' महाभयंकर लक्षणे
शरीरातील सर्वच लहान मोठे अवयव दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी वेगवेगळी कामे करतात. त्यामुळे आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. बऱ्याचदा धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सतत जंक फूडचे सेवन, पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव, शारीरिक हालचाल, तणावपूर्ण जीवनशैली जगल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे खराब होऊन जाते. लिव्हर शरीरातील ५० पेक्षा जास्त काम करते. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी लिव्हर मदत करते. त्यामुळे लिव्हरच्या कार्यात निर्माण झालेले अडथळे शरीरासाठी घातक ठरतात. लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीरातील विषारी घटक लिव्हरमध्ये तसेच साचून राहतात. ज्यामुळे शरीराला वेगवेगळ्या गंभीर आजारांची लागण होते.(फोटो सौजन्य – istock)
आहारात अतितिखट, मसालेदार, तेलकट किंवा मद्यसेवन केल्यामुळे लिव्हरचे आरोग्य बिघडते. लिव्हरचे कार्य बिघडल्यानंतर फॅटी लिव्हर, लिव्हर सोरायसिस किंवा लिव्हरसबंधित गंभीर आजार होतात. लिव्हरमध्ये वाढलेल्या उष्णतेचा शरीरावर लगेच परिणाम दिसून येतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लिव्हरमध्ये उष्णता वाढल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. शरीरात ही लक्षणे दिसतातच तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
लिव्हरमध्ये वाढलेल्या उष्णतेचा थेट परिणाम तोंडावर दिसून येतो./ चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स येणे, फोड, तोंडात सतत फोड येणे, जिभेवर फोड किंवा तोंडात जळजळ, खाज, चेहऱ्यावर पुरळ आल्यासारखे वाटणे, सतत चिडचिड, पचनाच्या समस्या इत्यादी अनेक लक्षण शरीरात दिसून येतात. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता तातडीने उपचार करून आरोग्याची काळजी घ्यावी. लिव्हरच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांच्या तोंडात वारंवार फोड येऊन लाल किंवा पांढरे चट्टे तयार होतात. याशिवाय आतड्या आणि हिरड्यांना सूज येण्याची जास्त शक्यता असते.
लिव्हरमध्ये वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी दातांच्या हिरड्या स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्याआधी दात स्वच्छ करावेत. यामुळे दातांमध्ये अडकलेले अन्नपदार्थांचे कण बाहेर निघून येतात आणि दात स्वच्छ राहतात. हिरड्यांमध्ये सूज, रक्त येणे किंवा वेदना जाणवू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.
लिव्हरचे कार्य सुधारण्यासाठी कायमच आहारात पालेभाज्या, फळे आणि इतर पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. पौष्टिक पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. याशिवाय भरपूर पाणी प्यायल्यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाते आणि शरीर स्वच्छ होते. दिवसभर भरपूर पाण्याचे सेवन केल्यास लिव्हरमध्ये वाढलेली उष्णता कमी होईल.
लिव्हरमध्ये उष्णता वाढण्याची मुख्य कारणे काय आहेत?
जास्त तेलकट, मसालेदार आणि तळलेले पदार्थ खाणे.अति प्रमाणात दारू पिणे हे यकृताच्या समस्यांचे एक मुख्य कारण आहे.काही औषधांच्या अतिसेवनामुळे यकृतावर ताण येतो.
लिव्हरमध्ये उष्णता/समस्या झाल्यास कोणती लक्षणे दिसतात?
तोंडात किंवा जिभेवर छाले येणे किंवा कोरडेपणा जाणवणे.त्वचेवर पुरळ, खाज सुटणे किंवा त्वचेचा रंग पिवळा पडणे (कावीळ). डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसणे आणि डोळे थकल्यासारखे वाटणे.
यकृताच्या आरोग्यासाठी कोणते पदार्थ टाळावेत?
तळलेले पदार्थ, चिप्स, आणि प्रक्रिया केलेले स्नॅक्स टाळा. सॉफ्ट ड्रिंक्स, कृत्रिम रस आणि जास्त गोड पदार्थ टाळा. लाल मांसाचे सेवन मर्यादित करा.






