
नवी दिल्ली : गेल्या दीड वर्षापासून जगभरात धुमाकूळ घालत असलेला कोरोना विषाणू सातत्याने आपले रूप बदलून अधिकाधिक धोकादायक होत चालला आहे. या विषाणूने नवनवे व्हेरियंट समोर येत आहेत. (Coronavirus in India) भारतात कोरोना विषाणूच्या एका व्हेरियंटने आधीच धुमाकूळ घातला असताना आता देशात या विषाणूचा अजून एक व्हेरिएंट सापडला आहे. आता या व्हेरियंटबाबत अजून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
भारतात सापडलेला हा दुसरा व्हेरियंट खूप धोकादायक आहे. या व्हेरियंटचा संसर्ग झाल्यास सात दिवसांच्या आत रुग्णाचे वजन कमी होऊ शकते. यापूर्वी हा व्हेरियंट ब्राझीलमध्ये सापडला होता. तेथून हा व्हेरियंट भारतात आल्याच्या माहितीस दुजोरा दिला गेला होता. मात्र आता तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ब्राझीलमधून कोरोना विषाणूचे दोन व्हेरियंट भारतात आले आहेत. त्यातील दुसऱ्या व्हेरियंटचे नाव बी.१.१.२८.२ असे आहे.
[read_also content=”वर्क फ्रॉम होम हवंय! ऑफिसला जाण्याऐवजी कर्मचारीच कंपनीला देत आहेत असा ऑप्शन की, त्यांच्यावरही आलीये अशी वेळ; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/latest-news/instead-of-going-to-the-office-the-employees-wants-work-from-home-as-they-are-giving-the-company-the-option-that-to-resign-or-not-nrvb-138641.html”]
माध्यमांमधील वृत्तानुसार तज्ज्ञांनी या व्हेरियंटची चाचणी एका उंदरावर केली. त्याचे परिणाम धक्कादायक होते. तज्ज्ञांना या संशोधनामधून दिसून आले की, संसर्ग झाल्यानंतर सात दिवसांच्या आत याची ओळख पटवता येऊ शकते. हा व्हेरियंट एवढा धोकादायक आहे की, तो रुग्णाच्या शरीराचे वजन ७ दिवसांमध्ये कमी करू शकतो. डेल्टा व्हेरियंटप्रमाणेच हा विषाणूसुद्धा अँटीबॉडी कमी करू शकतो.
पुण्यातील नॅशन इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) च्या तज्ज्ञांनी सांगितले की, बी.१.१.२८२ व्हेरियंट परदेशातून आलेल्या दोन लोकांमध्ये मिळाला होता. या व्हेरियंटची जिनोम सिक्वेंसिंग करण्यात आली आहे. तसेच त्याचे परीक्षण करण्यात आले आहे. सध्या भारतात याचे अधिक रुग्ण सापडलेले नाहीत. मात्र डेल्टा व्हेरियंट सर्वाधिक सापडला आहे.
[read_also content=”त्या स्कुटीवर फिरायला गेल्या असताना त्यांचं झालं अपहरण; त्यांना अज्ञातस्थळी नेऊन त्या नराधमांनी केला सामूहिक बलात्कार,पुढे झालं असं की… वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/latest-news/she-was-abducted-while-riding-a-scooter-they-took-her-to-an-unknown-place-and-gang-raped-her-nrvb-138630.html”]
परदेशातून आलेल्या दोन जणांची सॅम्पल सिक्वेंसिंग करण्यात आली होती. कोरोनामधून रिकव्हर होईपर्यंत दोघांमध्येही लक्षणे दिसून येत नव्हती. मात्र याची सॅम्पल सिक्वेंसिंग केल्यानंतर जेव्हा बी.१.१.२८.२ व्हेरियंटची माहिती मिळाली तेव्हा त्याची नऊ सिरीयन हेमस्टर उंदरांवर चाचणी घेण्यात आली. यामधील तीन उंदरांचा मृत्यू हा शरीरातील अंतर्गत भागात संसर्ग वाढल्याने झाला.
Corona Update coronavirus another dangerous variant found in india you are affected by this then take care otherwise