इस्लामाबाद : पाकिस्तानात (Pakistan Financial Crisis) परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. तिथल्या लोकांना दोन वेळचे जेवण करणेही कठीण झाले आहे. दैनंदिन वस्तू इतक्या महाग झाल्या आहेत की आता त्या गरिब लोकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. प्रत्येक भाजीत वापरल्या जाणार्या कांद्याचे (Onion price) भाव 500 टक्क्यांनी वाढले आहेत. दुसरीकडे, चिकनच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे मांसाहारही त्यांच्या अवाक्याबाहेर गेला आहे.
[read_also content=”चहात नशेच्या गोळ्या टाकून १२० महिलांवर बलात्कार, नंतर ब्लॅकमेल…जलेबी बाबाला १४ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा! https://www.navarashtra.com/crime/jalebi-baba-imprisoned-for-14-years-for-rape-and-blackmail-sex-scandle-case-in-haryana-nrps-360894.html”]
पाकिस्तानची परिस्थिती पाहता पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासह लष्करप्रमुख असीम मुनीर यांनाही दुसऱ्या देशाकडे हात पसरावे लागत आहे. दरम्यान, वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. केवळ मैदा आणि गॅसच नाही तर चिकनचेही भाव गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानी लोकांची आवडती खाद्य चिकन बिर्याणी हे आता स्वप्नवत वाटू लागले आहे. चिकन बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या मोहरीचे तेल आणि कांद्याच्या किमती अव्वाच्या सव्वा झाल्या आहेत.
पाकिस्तानमध्ये सध्या चिकनचा भाव ३८३ रुपये किलो आहे. गेल्या वर्षी म्हणजेच जानेवारी 2022 मध्ये चिकनची किंमत 210 रुपये होती. अशा स्थितीत अवघ्या वर्षभरात चिकनच्या दरात १७३ रुपयांनी वाढ झाली आहे. एवढेच नाही तर चिकन बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कांदा आणि मोहरीच्या तेलाचे भावही भडकले आहेत. पाकिस्तानमध्ये सध्या 220 रुपये किलोने कांदा विकला जात आहे. वर्षभरापूर्वी जानेवारी २०२२ मध्ये ३६ रुपये किलोने कांदा उपलब्ध होता. अशा स्थितीत वर्षभरात कांद्यामध्ये 184 रुपयांनी वाढ झाली आहे. मोहरीच्या तेलाला पाकिस्तानमध्ये ५३२ रुपये प्रति लिटर भाव मिळत आहे, जो गेल्या वर्षी जानेवारी २०२२ मध्ये ३७४ रुपये होता. अशा परिस्थितीत 2022 च्या तुलनेत मोहरीचे तेल 158 रुपयांनी महागले आहे. डाळ, मीठ, भात, केळी, भाकरी, दूधही महागले डाळी, मीठ, तांदूळ, केळी, ब्रेड, दूधही पाकिस्तानात सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. पाकिस्तानमध्ये 1 किलो तूर डाळ 228 रुपये किलो, सामान्य मीठाचे 800 ग्रॅम पॅकेट 48 रुपये, बासमती तांदूळ 146 रुपये, केळी 119 रुपये डझन, ब्रेडचे पॅकेट 89 रुपये आणि 1 लिटर दूध १४९ रुपये. अशा परिस्थितीत पाकिस्तानमध्ये या वस्तू खरेदी करणे सर्वसामान्यांच्या हाताबाहेर गेले आहे. पाकिस्तानातील बहुतांश लोक दारिद्र्यरेषेखाली राहतात. दरम्यान, अर्थव्यवस्था कोलमडल्याने खासगी नोकरी करणाऱ्या लाखो लोकांना बेरोजगार व्हावे लागले.