crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
दिल्ली: राजधानी दिल्ली येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पती झोपेत असतांना त्याच्यावर उकळते तेल टाकल्याच्या समोर आले आहे. एवढेच नाही तर जखमांवर मिरची पूड टाकल्याचे देखील समोर आले आहे. या हल्ल्यात 28 वर्षीय दिनेश गंभीरीत्या जखमी झाला आहे. शेजारच्यांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सफदरजंग रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरु आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र आरोपी पत्नीला अटक झालेली नाही आहे.
नेमकं काय घडलं?
दिनेश २ ऑक्टोबर रोजी कामावरून घरी आला. त्याने जेवण केलं आणि झोपायला गेला. पत्नी आणि मुलगी जवळच झोपल्या होत्या. पहाटे ३:१५ च्या सुमारास, अचानक माझ्या संपूर्ण शरीरात तीव्र जळजळ जाणवू लागली. डोळे उघडून पाहिले, तर पत्नी तिथे होती. ती माझ्या अंगावर आणि चेहऱ्यावर उकळते तेल ओतत होती. मी उठण्यापूर्वी किंवा ओरडण्यापूर्वी तिने माझ्या भाजलेल्या जागेवर तिखट टाकले. त्याने विरोध केला, तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, तू आवाज केलास तर मी आणखी गरम तेल ओतेन. जळजळ आणि वेदनेने तो ओरडू लागला. त्याच्या ओरडण्याने शेजारी आणि तळमजल्यावर राहणारे घरमालक धावले.
आरोपी महिलेने दरवाजा आतून बंद केला होता आणि बऱ्याच वेळ तिने दरवाजा उघडला नाही. अखेर दरवाजा उघडल्यावर दिनेश गंभीररीत्या भाजला होता. तर पत्नी घरात लपली होती.ती म्हणाली की तीच पतीला रुग्णालयात नेईल, मात्र शेजाऱ्यांना संशय आल्याने घरमालकाने स्वतः ऑटो बोलावून दिनेशला रुग्णालयात पोहोचवले. प्रथम त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना सफदरजंग रुग्णालयात हलवले. वैद्यकीय अहवालानुसार त्यांच्या भाजण्याच्या जखमा खोलवर झाल्या आहेत. त्याला अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आले आहे. त्याच्या शरीराचा २० टक्के भाग भाजला आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी जोडप्याची आठ वर्षाची मुलगीही घरी होती.
अनेक दिवसांपासून वाद
दिनेश आणि त्याची पत्नी साधना यांचा विवाह आठ वर्षांपूर्वी झाला होता. दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरु होते. दोन वर्षां[उर्वी पत्नीने क्राईम अगेंस्ट वुमन सेल मध्येही तक्रार दिली होती, मात्र नंतर समुपदेशनानंतर वाद काही काळ मिटला होता. या थरारक घटनेच्या दिवशीही या जोडप्यामध्ये भांडण झाले होते.
पोलिस तपास सुरू
पोलिसांनी प्रकरणी कलम 118 (जाणीवपूर्वक दुखापत), 124 (धमकी) आणि 326 (गंभीर दुखापत) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी पत्नी फरार असून पोलिस तिचा शोध घेत आहेत. ह्या संपूर्ण घटनेने मदनगीर परिसरात तसेच दक्षिण दिल्लीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.