Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालिकेच्या आरोग्य विभागात वाढता गृहकलह; विभागप्रमुखाच्या खुर्चीत बसायचे कोणी?

कोरोना संक्रमणाचा संसर्ग शहरात वाढत असताना पालिकेच्या आरोग्य विभागात मुख्याधिकारी विरुद्ध आरोग्य निरीक्षक असे शीतयुद्ध किरकोळ कारणावरून सुरु झाले आहे. पाणीपुरवठा विभागाचे शहाजी वाठारे यांच्याकडे आरोग्य विभागाचा चार्ज देण्यात आला तरी त्यांनी तो स्वीकारलेला नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 07, 2022 | 07:00 PM
पालिकेच्या आरोग्य विभागात वाढता गृहकलह; विभागप्रमुखाच्या खुर्चीत बसायचे कोणी?
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : कोरोना संक्रमणाचा संसर्ग (Coronavirus) शहरात वाढत असताना पालिकेच्या आरोग्य विभागात मुख्याधिकारी विरुद्ध आरोग्य निरीक्षक असे शीतयुद्ध किरकोळ कारणावरून सुरु झाले आहे. पाणीपुरवठा विभागाचे शहाजी वाठारे यांच्याकडे आरोग्य विभागाचा चार्ज देण्यात आला तरी त्यांनी तो स्वीकारलेला नाही.

आरोग्य विभागाचा कारभारी म्हणून प्रकाश राठोड यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली असताना मुख्याधिकारी अभिजीत बापट व प्रकाश राठोड यांच्यात सातत्याने खटके उडत आहेत. एका प्रकरणामध्ये वार्षिक दरापेक्षा जास्त दराचे एस्टिमेट बनविल्याने राठोड यांना चांगलेच बोल ऐकून घ्यावे लागले होते. या लुटपुटीच्या वादाचा वसुली विभागाच्या बैठकीदरम्यान जोरदार भडका उडाला. काही कारणावरून मुख्याधिकाऱ्यांनी तिन्ही आरोग्य निरीक्षक काहीच कामाचे नाही, अशी शेलकी कमेंट केल्याने राठोड रागाने उसळले आणि उभयतांमध्ये जोरदार वादावादी झाली. अगदी डीएमए ऑफिसपर्यंत एकमेकांचे अहवाल पाठविण्याचे वाद प्रतिवाद झाले. या प्रकरणाचा प्रत्यक्ष परिणाम लगेच दिसून आला.

मुख्याधिकाऱ्यांनी तत्काळ आरोग्य विभागाचा चार्ज पाणीपुरवठा अभियंता शहाजी वाठारे यांच्याकडे सोपवला. आता वाठारे पाणीपुरवठा विभागात हजर होऊन काहीच महिने झाले आहेत. अचानक आरोग्य विभागाची दुहेरी जबाबदारी आल्याने त्यांनी सुद्धा हे प्रकरण अधांतरीच ठेवले आहे. येत्या सोमवारपासून मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करून या विभागाचा चार्ज घेण्याचा निर्णय घेऊ असे वाठारे यांनी सांगितले.

Web Title: Dispute in health department of satara municipality nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2022 | 07:00 PM

Topics:  

  • coronavirus
  • Satara Municipality

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.