Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Court Case on Trump: शपथविधीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका; लैंगिक अत्याचार प्रकरण पडणार महागात

कोर्टाने 1996 च्या या प्रकरणात ट्रम्प यांना दोषी ठरवले आहे. एका उच्चस्तरीय डिपार्टमेंटल स्टोअरच्या ड्रेसिंग रूममध्ये एका स्तंभलेखकाचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी ट्रम्प दोषी आढळले आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 31, 2024 | 05:07 PM
Court Case on Trump: शपथविधीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका; लैंगिक अत्याचार प्रकरण पडणार महागात
Follow Us
Close
Follow Us:

अमेरिका:  अमेरिकेत 20 जानेवारीला सत्तापरिवर्तन होणार आहे. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पदाची शपथ घेणार आहेत. पण त्याआधीच त्याला फेडरल अपील कोर्टाकडून मोठा धक्का बसला. लैंगिक अत्याचार प्रकरणात ट्रम्प यांनी कोर्टात माफीसाठी अर्ज केला होता, तो कोर्टाने फेटाळला आहे. तसेच ट्रम्प यांना दोषी ठरवून त्यांच्यावर दंड ठोठावण्याचा निर्णयही कायम आहे. आता मानहानी आणि लैंगिक गैरवर्तन प्रकरणी ट्रम्प यांना 5 दशलक्ष डॉलर्सचा दंड भरावा लागणार आहे.

एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार, कोर्टाने 1996 च्या या प्रकरणात ट्रम्प यांना दोषी ठरवले आहे. एका उच्चस्तरीय डिपार्टमेंटल स्टोअरच्या ड्रेसिंग रूममध्ये एका स्तंभलेखकाचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी ट्रम्प दोषी आढळले आहेत. दुसऱ्या यूएस सर्किट कोर्ट ऑफ अपीलने सांगितले की मॅनहॅटन ज्युरीचा निकाल रद्द केला जाणार नाही. ई. जीन कॅरोल यांची बदनामी आणि लैंगिक अत्याचार केल्याबद्दल ट्रम्प यांना $5 दशलक्ष दंड भरावा लागेल.

Future Of Maharashtra Govenrnment: राज्य आणि केंद्र सरकारचे सूर बिघडणार?; कसे आहे 2025चे महाराष्ट्राचे भविष्य?

 शपथ घेण्यापूर्वी न्यायालयाचा आदेश

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात न्यायालयाचा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा ते दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेण्याची तयारी करत आहेत. आपल्या आदेशात, यूएस सर्किट कोर्टाने जीन कॅरोलची बदनामी आणि लैंगिक शोषण केल्याबद्दल ट्रम्प यांच्यावर मॅनहॅटन ज्युरीने लादलेली US $ 5 दशलक्ष नुकसान भरपाई कायम ठेवली आहे. जीन कॅरोलने 2023 मध्ये एका चाचणीत साक्ष दिली होती की 1996 मध्ये एका मैत्रीपूर्ण बैठकीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक स्टोअरच्या ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश केला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आरोप फेटाळले

डोनाल्ड ट्रम्प यांनी अशी कोणतीही घटना घडल्याचा वारंवार इन्कार केला आहे परंतु त्यांना न्यायालयाकडून वारंवार दणकेच मिळत आहेत. जीन कॅरोल या एले मासिकासाठी स्तंभलेखक आहेत. न्यायालयाने ट्रम्प यांना त्यांच्या लैंगिक शोषणासाठी US $ 2 दशलक्ष आणि मानहानीसाठी US $ 3 दशलक्ष नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

‘जर रोहित शर्मा कर्णधार नसता तर बहुतेक प्लेईंग इलेव्हनमध्ये जागादेखील मिळाली नसती

 

काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्पचे प्रवक्ते ?

डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रवक्ते स्टीव्हन च्युंग यांनी सांगितले की, या प्रकरणात देण्यात आलेल्या 5 दशलक्ष डॉलर्सच्या नुकसानीच्या विरोधात ते अपील करणार आहेत.

1996 च्या घटनेत ट्रम्प दोषी

पीडितेने 2023 मध्ये एका खटल्यादरम्यान साक्ष दिली होती. 1996 मध्ये एका बैठकीत ट्रम्प हिंसक झाले होते, असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते. या घटनेशिवाय, न्यायालयाने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना प्रौढ चित्रपट स्टार स्टॉर्मी डेनियलशी संबंधित प्रकरणात दोषी ठरवले होते. आता ट्रम्प 2025 मध्ये दुसऱ्यांदा शपथ घेण्याची तयारी करत आहेत. यापूर्वी त्याचे अपील अमेरिकेच्या फेडरल अपील कोर्टाने फेटाळले होते.

Web Title: Donald trump suffers major blow before inauguration in sexual assault case nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2024 | 05:07 PM

Topics:  

  • Donald Trump
  • US President

संबंधित बातम्या

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
1

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या
2

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या

White House Gossip: ट्रम्पसोबत मेलोनीचा हॉट माइक VIDEO VIRAL; झेलेन्स्कीवरील टिप्पणी चर्चेत
3

White House Gossip: ट्रम्पसोबत मेलोनीचा हॉट माइक VIDEO VIRAL; झेलेन्स्कीवरील टिप्पणी चर्चेत

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण
4

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.