Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Politics: ट्रम्प यांचा जागतिक राजकारणात नवा खेळ; चारपैकी 3 देशांत केला सत्तापालट, आता इस्त्रायलमध्ये काय होणार?

World Politics : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इतर देशांच्या निवडणुकांमधील उमेदवारांना उघडपणे पाठिंबा दिला आहे. आता त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना पाठिंबा दर्शवला आहे. याचा त्यांना निवडणुकीत फायदा होईल का?

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 19, 2026 | 04:31 PM
Donald Trump Israel election endorsement Benjamin Netanyahu Knesset election 2026

Donald Trump Israel election endorsement Benjamin Netanyahu Knesset election 2026

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांचा जागतिक निवडणुकांमध्ये थेट हस्तक्षेप
  • इस्त्रायलच्या पंतप्रधान नेतान्याहूंना ट्रुथ सोशलवरून पाठिंबा
  • हंगेरीतील पराभवामुळे निकालावर प्रश्नचिन्ह

जागतिक राजकारणात (World Politics) अमेरिकेच्या धोरणांचा प्रभाव नेहमीच राहिला आहे, मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रभावाला एका नव्या वळणावर आणून ठेवले आहे. ट्रम्प यांनी आता थेट इतर देशांमधील अंतर्गत निवडणुकांमध्ये उघडपणे हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या आवडत्या नेत्यांना आणि पुराणमतवादी विचारसरणीच्या पक्षांना विजयी करण्यासाठी ट्रम्प सोशल मीडिया, राजकीय वक्तव्ये आणि आर्थिक धमक्यांचा सर्रास वापर करत आहेत. नुकतेच त्यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या बाजूने उघडपणे उतरत २७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या इस्त्रायली संसदीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना नेतान्याहूंच्या मागे उभे राहण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी जगभरातील चार महत्त्वाच्या देशांच्या निवडणुकांमध्ये असाच हस्तक्षेप केला होता, ज्यातील तीन ठिकाणी त्यांच्या समर्थित उमेदवारांनी विजय मिळवला, तर एका ठिकाणी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

ट्रम्प यांच्या या धोरणामुळे जागतिक राजकारणात आणि कूटनीतीत मोठी खळबळ उडाली आहे. दुसऱ्या देशांच्या लोकशाही प्रक्रियेत आणि जनमतावर प्रभाव पाडण्याचा राष्ट्राध्यक्षांचा हा प्रयत्न किती यशस्वी ठरतोय, हे समजून घेण्यासाठी त्यांनी आधी हस्तक्षेप केलेल्या देशांमधील निकालांचा आढावा घेणे अत्यंत गरजेचे ठरते.

१. होंडुरास: आर्थिक मदतीची धमकी आणि निसटता विजय

नोव्हेंबर २०२५ मध्ये झालेल्या होंडुरासच्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांनी पहिल्यांदा आपले राजकीय वजन वापरले. त्यांनी तेथील पुराणमतवादी उमेदवार नसरी अस्फुरा यांना थेट पाठिंबा दिला. इतकेच नाही तर अस्फुरा यांचा पराभव झाल्यास अमेरिका होंडुरासला मिळणारी सर्व आर्थिक मदत रोखले असा उघड इशारा ट्रम्प यांनी दिला. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार साल्वाडोर नसरल्ला यांच्यावरही कडाडून टीका केली. २४ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर झालेल्या अंतिम निकालात ट्रम्प यांच्या पसंतीच्या अस्फुरा यांनी ४०.२७% मते मिळवून निसटता विजय मिळवला, तर नसरल्ला यांना ३९.५३% मते मिळाली. येथे ट्रम्प यांचा उमेदवार जिंकला असला तरी हा विजय अत्यंत अल्प फरकाने मिळाला होता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIDEO VIRAL: कॅमेऱ्यासमोर घडला थरार! ‘एक दिवस सर्वांना जायचे आहे’ असे धर्मगुरूनी सांगताच क्रूस अंगावर पडला आणि…

२. जपान: सनाए ताकाइची यांच्या बाजूने जोरदार लाट

फेब्रुवारी २०२६ मध्ये जपानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी ट्रम्प यांनी पंतप्रधान सनाए ताकाइची आणि त्यांच्या सत्ताधारी आघाडीला पूर्ण पाठिंबा जाहीर केला. ताकाइची यांना एक खंबीर आणि लोकप्रिय नेत्या म्हणून संबोधित करत ट्रम्प यांनी ही निवडणूक जपानच्या सुरक्षेसाठी आणि भविष्यासाठी अत्यंत निर्णायक असल्याचे म्हटले. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या या निवडणुकीत ताकाइची यांच्या आघाडीने ऐतिहासिक आणि प्रचंड बहुमताने विजय मिळवला. येथे ट्रम्प यांचा पाठिंबा ताकाइची यांच्या राजकीय प्रतिमेला अधिक मजबूत करणारा ठरला.

תודה לנשיא טראמפ על התמיכה האדירה בי בבחירות. יחד עשינו דברים גדולים ויחד – בשנתיים הקרובות – נשלים את המשימה ונחסל את הגרעין האיראני. זה או ימין – או פלסטין.
או ימין – או גרעין.
צאו להצביע מחל! https://t.co/LAE6DoiBWk — Benjamin Netanyahu – בנימין נתניהו (@netanyahu) October 18, 2026

credit – social media and Twitter

३. हंगेरी: ट्रम्प आणि व्हान्स यांच्या प्रचारानंतरही ऑर्बान यांचा दारुण पराभव

अनेक देशांमध्ये यश मिळाल्यानंतर एप्रिल २०२६ मध्ये हंगेरीच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या रणनीतीला मोठा धक्का बसला. ट्रम्प यांनी हंगेरीचे उजव्या विचारसरणीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बान यांना पाठिंबा दिला होता. ट्रम्प यांचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांनी तर थेट बुडापेस्टला भेट देऊन ऑर्बान यांच्या बाजूने जाहीर भाषणे केली. मात्र, हंगेरीतील मतदारांनी स्थानिक प्रश्न, आर्थिक मंदी, भ्रष्टाचार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे झालेले एकाकीपण या मुद्द्यांवर मतदान केले. पीटर मॅग्यार यांच्या नेतृत्वाखालील टिस्झा पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत ऑर्बान यांच्या सत्तेला सुरुंग लावला. या निकालाने हे सिद्ध केले की परदेशी नेत्याचे समर्थन स्थानिक असंतोषापुढे अपुरे पडू शकते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : COP17 Summit: 2030 चे ध्येय निसटले हातातून! अर्मेनियात 200 देशांचे प्रतिनिधी चिंताक्रांत; वाचा येरेवान परिषदेचे थेट वृत्त

४. कोलंबिया: गुस्तावो पेट्रो यांचा विरोध आणि अबेलार्डो यांचा विजय

जून २०२६ मध्ये झालेल्या कोलंबियाच्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांनी अबेलार्डो दे ला एस्प्रीएला यांना पाठिंबा दर्शवला. कोलंबिया-अमेरिका संबंधांच्या भविष्यासाठी हा निकाल महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. प्राथमिक मतमोजणीत दे ला एस्प्रीएला यांनी ४९.६६% मते मिळवून विजय संपादन केला. या हस्तक्षेपावर कोलंबियाचे मावळते अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी अत्यंत कडक शब्दांत टीका केली. एका देशाने दुसऱ्या देशाच्या निवडणुकीत असा हस्तक्षेप करणे म्हणजे लोकशाही आणि स्वातंत्र्यावर थेट गदा आणण्यासारखे आहे, असा आरोप पेट्रो यांनी केला.

💡

Frequently Asked Questions

  • Que: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्या चार देशांच्या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केला होता?

    Ans: ट्रम्प यांनी होंडुरास, जपान, हंगेरी आणि कोलंबिया या चार देशांच्या अध्यक्षीय आणि सार्वत्रिक निवडणुकांमध्ये उघड पाठिंबा दिला होता.

  • Que: ट्रम्प यांनी इस्त्रायलच्या निवडणुकीबाबत आणि नेतान्याहूंबाबत काय विधान केले?

    Ans: ट्रम्प यांनी नेतान्याहूंना धाडसी नेता म्हणत पाठिंबा दिला आणि इस्त्रायलने दुसरा नेता निवडल्यास अमेरिकेला स्वतः कारवाई करावी लागेल असा इशारा दिला.

  • Que: इस्त्रायलमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी किती जागांची आवश्यकता असते?

    Ans: इस्त्रायलच्या संसदेत (Knesset) एकूण १२२० जागा असून सरकार स्थापन करण्यासाठी ६१ खासदारांच्या बहुमताची गरज असते.

Web Title: Donald trump endorses benjamin netanyahu israel elections global impact hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

France Protest: अश्रुधुराने वाचवली मॅक्रॉन यांची खुर्ची; काय घडले आंदोलक एलिसी पॅलेसपासून अवघ्या 300 मीटरवर पोहोचल्यावर?
1

France Protest: अश्रुधुराने वाचवली मॅक्रॉन यांची खुर्ची; काय घडले आंदोलक एलिसी पॅलेसपासून अवघ्या 300 मीटरवर पोहोचल्यावर?

COP17 Summit: 2030 चे ध्येय निसटले हातातून! अर्मेनियात 200 देशांचे प्रतिनिधी चिंताक्रांत; वाचा येरेवान परिषदेचे थेट वृत्त
2

COP17 Summit: 2030 चे ध्येय निसटले हातातून! अर्मेनियात 200 देशांचे प्रतिनिधी चिंताक्रांत; वाचा येरेवान परिषदेचे थेट वृत्त

China : चीनची राजधानी बीजिंग 2035 पर्यंत बनणार ‘अतिवृद्ध’ समाज, काय आहेत यामागील आर्थिक आणि सामाजिक धोके?
3

China : चीनची राजधानी बीजिंग 2035 पर्यंत बनणार ‘अतिवृद्ध’ समाज, काय आहेत यामागील आर्थिक आणि सामाजिक धोके?

US-India Trade Deal: ‘आम्ही कराराच्या अगदी जवळ…’ अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांचे भारताबद्दल मोठे सूचक  विधान
4

US-India Trade Deal: ‘आम्ही कराराच्या अगदी जवळ…’ अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांचे भारताबद्दल मोठे सूचक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.