
US Embassy Middle East Security Alert US Iran war tension news
मध्य पूर्वेतील (Middle East) भू-राजकीय वातावरण पुन्हा एकदा अत्यंत स्फोटक वळणावर पोहोचले आहे. इराण आणि अमेरिका (US-Iran War) यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन प्रशासनाने मध्य पूर्व क्षेत्रात राहणाऱ्या आणि प्रवास करणाऱ्या आपल्या सर्व नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण सुरक्षा इशारा जारी केला आहे. १८ ऑक्टोबर रोजी अम्मान (जॉर्डन) येथील अमेरिकन दूतावासासह मध्य पूर्वेतील विविध दूतावासांनी जारी केलेल्या या सूचनेत नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आणि आपत्कालीन प्रवासाचे नियोजन तयार ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
अमेरिकन प्रशासनाच्या सूचनेनुसार, इराण आणि तेहरान-समर्थित गट परदेशात असलेल्या अमेरिकन हितसंबंधांना, जसे की अमेरिकेशी संलग्न व्यापारी संस्था, लष्करी किंवा मुत्सद्दी सुविधा आणि अमेरिकन नागरिकांना थेट लक्ष्य करू शकतात. या तणावामुळे येत्या काही दिवसांत मध्य पूर्वेतील आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्र बंद होणे, अनेक विमान उड्डाणे रद्द होणे आणि वाहतूक व्यवस्थेत मोठा व्यत्यय येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रवाशांनी सातत्याने विमान कंपन्यांच्या संपर्कात राहावे, असा सल्ला दूतावासाने दिला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी वॉशिंग्टन आणि तेहरानमधील राजकीय व लष्करी वाक्युद्धाशी जोडलेली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना जाहीर पाठिंबा दर्शवत इराणला कडक शब्दांत ताकीद दिली होती. जर तेहरानने आपली आक्रमक भूमिका आणि धोरण तात्काळ बदलले नाही, तर अमेरिका आणि त्यांचे मित्र देश लवकरच “काम फत्ते करतील” (Finish the Job), असे वक्तव्य ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर केले होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Elections 2026 : अमेरिकन राजकारणात हायटेक क्रांती! AI जाहिरातींवर तब्बल 1,300 कोटींचा खर्च; 80% वाटा एकट्या रिपब्लिकन्सचा
Security Alert: U.S. Mission Saudi Arabia (October 18, 2026) Americans currently in the Middle East should exercise heightened vigilance due to the complex security environment. Be aware of potential flight cancellations, airspace closures, and travel disruptions.
Check your flight’s departure status with the airline or through:
– Riyadh airport: https://t.co/YWFD0CIFcY
– Jeddah airport: https://t.co/oL1XQMdS4N
– Dhahran airport: https://t.co/tH4mvhGrSq
– https://t.co/9QqKizXztQ
Iranian-supported Houthis have engaged in hostilities against Saudi Arabia, including attacks on civilian airports and other critical infrastructure resulting in civilian casualties and severe travel disruptions. The hostilities have the potential to escalate rapidly beyond that immediate area.
Americans traveling to or from the Middle East should monitor information about airport and airline operations and develop contingency plans in advance.
Iran and groups supportive of Iran may target other U.S. interests overseas or at locations associated with the United States and Americans throughout the world, including U.S. businesses and other institutions. Read more: https://t.co/pRfASzLOd4 — U.S. Embassy Riyadh (@USAinKSA) October 19, 2026
credit – social media and Twitter
अमेरिकन लष्करी सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, पेंटागॉनने इराणवर संभाव्य कारवाईसाठी विविध लष्करी पर्याय तयार ठेवले आहेत, ज्यामध्ये अत्यंत घातक समजल्या जाणाऱ्या ‘GBU-43/B मॅसिव्ह ऑर्डनन्स एअर ब्लास्ट’ (MOAB – Mother of All Bombs) च्या वापराचाही समावेश असू शकतो. अमेरिकेतील निवडणुका आणि इस्रायलमधील राजकीय परिस्थिती यांच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प प्रशासनाकडून हा इशारा अधिक तीव्रतेने देण्यात आला आहे.
ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर इराणने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत अमेरिकेच्या इशाऱ्याचा जोरदार समाचार घेतला. अराघची यांनी लिहिले, “गेल्या वेळी जेव्हा तुम्ही ‘काम फत्ते’ करू इच्छित होता, तेव्हा इराण पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होऊन बाहेर पडला होता. तुम्हाला पुन्हा एकदा तुमचे नशीब आजमावून पाहायचे असेल तर नक्की प्रयत्न करा. पण लक्षात ठेवा, आमचेही काही काम अपूर्ण राहिले आहे!”
यासोबतच अराघची यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यावर गंभीर आरोप केले. नेतान्याहू हे स्वतःला तुरुंगात जाण्यापासून वाचवण्यासाठी आणि स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी अमेरिकेला इराणसोबतच्या आणखी एका विनाशकारी युद्धाच्या खाईत लोटत आहेत, असा दावा इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केला. जर अमेरिकेने कोणताही लष्करी धाडस करण्याचा प्रयत्न केला, तर इराण पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sadhguru: ‘तरुण पिढी द्वेषाने भरलेली, आपल्या संस्कारांमध्ये…’; अमेरिकेतील हिंदू मंदिरावर हल्लाच्या कटावर सद्गुरूंचे भाष्य
अमेरिका आणि इराणमधील या थेट संघर्षाचे सावट आता केवळ दोन्ही देशांपुरते मर्यादित राहिलेले नसून संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायावर पसरले आहे. जॉर्डन, यूएई, सौदी अरेबिया यांसारख्या मध्य पूर्वेतील प्रमुख देशांमधील अमेरिकन दूतावासांनी अलर्ट जारी केल्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
अनेक प्रमुख आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी मध्य पूर्वेतील आपल्या मार्गांची पाहणी सुरू केली आहे. जर परिस्थिती बिघडली तर इंधन पुरवठा, कच्च्या तेलाचे (Crude Oil) दर आणि जागतिक शेअर बाजारावर याचा तीव्र प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. सध्या जगाचे लक्ष वॉशिंग्टन आणि तेहरानकडून येणाऱ्या पुढील अधिकृत पावलांवर आणि विधानांवर लागले आहे.