Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ई- स्पोर्ट्स भविष्य व्यापणार

२०२४ सालची पहाट सर्वच क्षेत्रात नव्या अमुलाग्र बदलांची नांदी घेऊन येणार आहे. क्रीडाक्षेत्रही यात मागे राहणार नाही. विज्ञान, तंत्रज्ञान किती झपाट्याने प्रगत झाले हे मावळत्या वर्षाने पाहिले. पुढील वर्ष आगळ्या वेगळ्या बदलाचे ठरणार आहे. सिनेमा, थिएटर्स जशी काही शेकड्यांवरून आता दशकांच्या टप्प्यात आली; तसेच काहीसे मोठमोठ्या स्टेडियम्सच्या बाबतीत नजिकच्या काळात घडणार आहे. लाखांच्या प्रेक्षक क्षमतेची स्टेडियम एवढी आकसतील की सध्या जसा 'मल्टी फ्लेक्स'चा सुळसुळाट झाला तसेच काहीसे खेळांच्या स्टेडियमच्या बाबतीतही घडू शकेल.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 31, 2023 | 06:00 AM
ई- स्पोर्ट्स भविष्य व्यापणार
Follow Us
Follow Us:

नवी पिढी म्हणजे २०१० नंतर जन्माला आलेली. या पिढीचे खेळ वेगळे, गरजा, सवयी वेगवेगळ्या. स्वत:चे मनोरंजन करण्याचे मार्गही वेगवेगळे. स्टेडियम्सच्या गर्दीपासून स्वत:ला वेगळे करणारी ही पिढी असेल. काळ्या बाजारात तिकिटे घेणे त्यांना परवडणारही नाही व आवडणारही नाही. तिकिटे मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणेही त्यांच्या रक्तात नाही. एकमेकांमध्ये मिसळण्याऐवजी अंतर ठेऊन क्रीडाक्षेत्रातील सर्वोच्च लढतींचा आनंद लुटण्याची त्यांची वृत्ती कोण जिंकेल किंवा कोण पराभूत होईल यापेक्षाही दोन प्रतिस्पर्धी एकमेकांशी किती त्वेशाने झुंजतानाचा संघर्ष पाहण्याची त्यांची वृत्ती. त्यामुळे कदाचित विजेत्याच्या जर्सीचा रंग किंवा राष्ट्रध्वज यापेक्षाही त्यांनी क्रीडा कौशल्य व निपुणता अधिक आनंद देणारी असेल. अशा या पिढीला अत्याधुनिक तंत्रज्ञान आणखी एकलकोंडे करणारे ठरू शकेल. व्हि आर गॉगल्स लावून खेळ पाहणारे स्वत:ला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातील.
हे विश्व एवढ्या वेगाने पुढे सरकत आहे की हे नवे बदल येत्या ५ ते ७ वर्षातच आपण पाहणार आहोत. मात्र, हे नवे बदल सर्व संबधितांसाठी नवे आव्हान असेल. फुटबॉल, हॉकी, रग्बी, बेसबॉल आदी मैदानी खेळांच्या संघटकांपुढे या बदलाचे मोठे आव्हान असणार आहे. संघटकांप्रमाणेच, खेळांच्या साहित्यांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या, खेळासाठी गणवेष तयार करणाऱ्या कंपन्या, विविध खेळात असलेल्या बेटिंग कंपन्या एवढेच नव्हे तर खेळाशी संबंधित प्रसार माध्यमे आणि पत्रकार यांनाही या बदलांशी स्वत:ला वेगाने जुळवून घ्यावे लागणार आहे. कारण यापुढील खेळांचे स्वरुप हे वेगळे असेल. मैदानावर, स्टेडियमवर न होणाऱ्या या क्षेत्राशी, त्यावरील क्रीडाप्रकारांसोबत राहतानाच सर्व संबंधितांची दमछाक होणार आहे.

म्हणजे यापूर्वी क्रीडासंघटक, खेळाडू, खेळच क्रीडारसिकांच्या पुढे असायचे ते देतील ते पहायचे, त्यातच आनंद मानायचे. यापुढे हे चालणार नाही. नवी पिढी या शर्यतीत पुढे असेल. स्टार्टींग लाईनच्या पुढेच त्यांचे पाऊल पडलेले असेल. त्यांना त्या खेळांशी संबंधित अधिक गोष्टी ज्ञात असतील आणि त्या आधीपासूनच ज्ञात असतील. त्यामुळेच खेळाडू, संघटक आणि अन्य संबंधितात मोठ्या स्पर्धेशी सामना करावा लागणार आहे. नव्या पिढीचे खेळ पाहणारा प्रेक्षकवर्ग समालोचकांच्या माहितीवर अवलंबून नसेल. त्याच्याकडे आधीपासूनच सर्वच माहिती, त्याच्या फोनवर एका बोटाच्या स्पर्शाच्या अंतरावर असेल. हे आव्हान ‘बेटिंग’ घेणाऱ्या कंपन्यांसाठी अधिक खडतर असेल. कारण त्याच्या प्रत्येक ग्राहकाकडे क्षणार्धात उपलब्ध होणारी माहिती असेल, ज्यायोगे तो बेटिंग कंपन्यासाठी डोकेदुखीही ठरू शकेल.

हे आव्हान प्रत्यक्ष विविध खेळांनाही पेलवावे लागेल. स्टेडियमवर जाणे जसे भावी पिढीला आवडणारे नसेल तसेच मैदानावरील खेळ पाहणेही ती पिढी पसंत करणार नाही. फार तर घरात बसून एखाद्या मोठ्या हॉलमध्ये, किंवा शांत ठिकाणी ‘व्हि आर गॉगल्स’ लावून खेळ पाहणे ते पसंत करतील एवढेच नव्हे तर नव्या पिढीच्या अभिरुचीला अनुरूप असे, काल्पनिक, आभासी व्हिडियो गेम्स तयार करण्यात येतील. त्या खेळांमध्ये त्यांना आवडणाऱ्या व्यक्तीरेखा चितारण्यात येतील. त्याचे हिरो उभे करण्यात येतील. प्रत्यक्षात मैदानात खेळल्या गेलेल्या सामन्यांपेक्षाही अधिक आकर्षक, अधिक रोमांचक, अधिक सनसनाटी निर्माण करणारे सामने या पिढीच्या समोर उभे करण्यात येतील.

नव्या पिढीची आणखी एक अभिरुची असेल. ‘ई स्पोर्ट्स’च्या माध्यमाद्वारे नवनव्या कल्पनांना जन्म देणारी ही काल्पनिक शक्तीचे पारंपारिक खेळांना आव्हानात्मक ठरणार आहे. त्यामुळे एकिकडे प्रत्यक्षात मैदानावर खेळले जाणारे खेळ असतील तर त्यांच्यासमोर ‘ई स्पोर्ट्स’चे खेळ असतील. पहिल्या, म्हणजे प्रत्यक्षात मैदानावर खेळल्या जाणाऱ्या प्रकारामध्ये खेळाडूंचाच सहभाग असेल. ते मैदानात आपल्या क्रीडाकौशल्याची उंची दाखवतील, जे आपण सध्या पाहतो.

दुसऱ्या प्रकारामध्ये ‘ई स्पोर्ट्स’चे बदललेले स्वरूप आपण पाहणार आहोत. लोकप्रिय खेळांचा आधार घेऊन किंवा काल्पनिक खेळाचा प्रकार विकसित करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार करण्यात आलेले हे खेळ आपल्या मेंदूचा ‘भुगा’ करणारे असतील. पण असा मेंदूचा खुराक नव्या पिढीला हवा आहे. कठिण आव्हाने, टास्क पार करणे याची नशा त्यांना हवी आहे.

या नशेची एकदा का चटक लागली की भावी पिढी पारंपारिक खेळापेक्षाही नव्या ई स्पोर्ट्सच्या आहारी जाण्याची अधिक शक्यता आहे.

कारण, या ई स्पोर्ट्समध्ये प्रेक्षकही त्या त्या खेळात सहभागी होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात पाहू शकतो. त्या आभासी विश्वात तो स्वत:लाच एखाद्या अॅथलिटमध्ये परावर्तीत करू शकतो. आपल्याला आवडणाऱ्या क्रीडाप्रकारात तो युवक थेट सहभागी होऊ शकतो. उदाहरणच द्यायचे झाल्यास सध्या आपण प्रत्यक्ष सामना पाहताना जे समालोचन ऐकतो आणि क्रीडातज्ज्ञ खेळाडूंच्या खेळाचे आणि चांगल्या-वाईट गोष्टींचे वर्णन करीत असतात. त्याऐवजी भावी युवा क्रीडारसिक स्वत:च त्या खेळात थेट सहभागी होऊन त्या खेळाडूच्या त्याला उमगलेल्या चुका दुरुस्त करू शकेल. व्हि.आर गॉगल्स हे याचे एक माध्यम असेल. मैदानावरील खेळात जेवढे प्रेक्षक रममाण होतात, त्यापेक्षाही वरच्या पातळीवर युवा प्रेक्षक त्या खेळात अधिक समरस होऊ शकेल. त्या योगे त्याला अधिक समाधानपूर्तीचा आनंद मिळू शकेल.

अनेक नव्या बदलांची शक्यता घेऊन २०२४ हे वर्ष सुरू होत आहे. भारतासारख्या विकसनशील देशात या स्वरुपाच्या ‘ई स्पोर्ट्स’साठी पोषक वातावरण आहे का? हे अत्याधुनिक क्रीडाप्रकार उपलब्ध होण्यासाठी आपल्या देशात त्या दर्जाची इंटरनेट सेवा आहे का? हेही पडताळून पहावे लागेल. मात्र नजिकच्या काळात ही ‘ई स्पोर्ट्स इंडस्ट्री’ क्रीडा क्षेत्र काही प्रमाणात का होईना हे निश्चित आहे.

सध्या अॅथलिट या सेवा प्रणालीचा वापर करीत आहेत. व्हि आर गॉगल्सचा वापर करून प्रत्यक्ष सरावाच्या ठिकाणी अॅथलिट आपल्या मार्गदर्शकांच्या सूचना अमलात आणताना दिसत आहेत. म्हणजे कार्यग्रस्त असलेल्या प्रशिक्षकाला दूरवरूनही आपल्या शिष्याला प्रशिक्षित करता येते.

सध्या ई स्पोर्ट्सच्या आहारी गेलेल्या युवा पिढीला जर ‘ई गेम्स’ जर अशा प्रत्यक्ष अॅक्शन पॅक वातावरणात पहायला मिळाले तर ते सध्या क्रीडांगणावर सुरू असलेल्या खेळांसाठी मोठाच धोका ठरेल. मात्र ई गेम्सवरून प्रत्यक्ष स्पोर्ट्स पाहण्यासाठी सज्ज रहा. हा प्रयोग देखील यशस्वी झाला आहे.

ई स्पोर्ट्स किंवा ई गेम्स खेळणाऱ्या स्पर्धकांचे मोठ्या स्क्रीनवर प्रत्यक्ष खेळताना सामने पाहणे हा ट्रेंड ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अमेरिका आणि युरोपमध्ये सुरू झालाय. ई गेम्स खेळून जिंकणाऱ्यांसाठी रोख पुरस्कार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या स्पर्धा प्रत्यक्ष स्टेडियम किंवा ऑडिटोरियममध्ये प्रेक्षकांसमोर होतात. त्यामुळे आभासी विश्वापेक्षाही अशा खेळांना जिवंतपणाचा ‘फिल’ यायला लागला आहे. या संकल्पनेलाही प्रेक्षक लाभले आहेत.

– विनायक दळवी

Web Title: E sports will dominate the future athlete sports update navarashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2023 | 06:00 AM

Topics:  

  • Athlete
  • cricket

संबंधित बातम्या

देशासाठी जिंकली ४ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके, आज पोट भरण्यासाठी रस्त्यावर विकतोय भाजी; Video Viral
1

देशासाठी जिंकली ४ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके, आज पोट भरण्यासाठी रस्त्यावर विकतोय भाजी; Video Viral

श्रृती गितेची धडाकेबाज फिफ्टी, कल्याणी कुटेची भेदक गोलंदाजी; रॉयल स्ट्रायकर्स शि वॉरियर्सचा दणदणीत विजय
2

श्रृती गितेची धडाकेबाज फिफ्टी, कल्याणी कुटेची भेदक गोलंदाजी; रॉयल स्ट्रायकर्स शि वॉरियर्सचा दणदणीत विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.