Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशासाठी जिंकली ४ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके, आज पोट भरण्यासाठी रस्त्यावर विकतोय भाजी; Video Viral

देशासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर चार सुवर्णपदके जिंकणारा झारखंडचा थ्रोबॉलपटू अमरदीप आज कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी भाजी विकत आहे. सरकारी नोकरी आणि आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या अमरदीपचा संघर्ष खेळाडूंच्या उपेक्षेचा गंभीर प्रश्न समोर आणतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 04, 2026 | 11:36 AM
देशासाठी जिंकली ४ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके, आज पोट भरण्यासाठी रस्त्यावर विकतोय भाजी; Video Viral

देशासाठी जिंकली ४ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके, आज पोट भरण्यासाठी रस्त्यावर विकतोय भाजी; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • अमरदीपने देशासाठी चार गोल्ड मेडल जिंकत भारताचा गौरव वाढवला.
  • उत्तम कामगिरीनंतरही अमरदीपला अद्याप सरकारी नोकरी किंवा अपेक्षित आर्थिक मदत मिळालेली नाही.
  • कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी अमरदीप रांचीमध्ये भाजी विकतो, तसेच कॅबही चालवतो.
झारखंडचा २९ वर्षीय थोब्राॅल खेळाडू अमरदीप सध्या सोशल मिडियावर चांगलाच ट्रेंडिंग होत आहे. अमरदीपने देशासाठी अंतरराष्ट्रीय स्तरावर चार गोल्ड मेडल जिंकले. देशाला मेडल्स मिळवून देणारा खेळाडू आता मात्र कुटुंबाचे पोट भरण्यासाठी भाजी विकण्याचे काम करत आहे. अमरदीपचा आरोप आहे की, राज्याच्या धोरणामुळे आणि सरकारी यंत्रणेच्या क्रीडा प्रतिभेप्रती असलेल्या उदासीनतेमुळे त्याला अद्याप नोकरी किंवा प्रोत्साहन मिळालेले नाही. रांचीतील अरगोड़ा चाैकात अमरदीप दररोज आपले भाज्यांचे दुकान लावतो. एकेकाळी भारताची मान अभिमानाने उंचावणाऱ्या खेळाडूची आज अशी अवस्था पाहणे खेदजनक आहे. अमरदीप फक्त भाजीच विकत नाही तर कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कॅब चालवण्याचेही कामही करतो.

फिरणाऱ्या हेलिकॉप्टरच्या पंख्यावर उभा राहून रशियन तरुणाचा जीवघेणा स्टंट; थरारक VIDEO पाहून अंगावर येईल काटा!

अमरदीपने २०१५ मध्ये मलेशिया येथे झालेल्या आशियाई ज्युनियर थ्रोबॉल चॅम्पियनशिपमध्ये आपले पहिले आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर २०१७ मध्ये काठमांडू येथे झालेल्या इंडो-नेपाळ थ्रोबॉल चॅम्पियनशिपमध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले, २०१९ मध्ये बंगळूरू येथे झालेल्या दक्षिण आशियाई थ्रोबॉल चॅम्पियनशिपमध्ये आणि २०२६ मध्ये रांची येथे झालेल्या स्पर्धेच्या दुसऱ्या आवृत्तीत त्याने सुवर्णपदके जिंकली.

नोकरी मिळाली नाही

आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करुनही अमरदीपला राज्य सरकारकडून सरकारी नोकरी मिळाली नाही. कॅश अवाॅर्ड आणि सरकारी नोकरीसाठीचा त्यांचा अर्ज बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे. त्याने सांगितले की, २०२० पासून तो नोकरीच्या शोधात होता. यादरम्यान कोरोनाचे संकट आले. यानंतर २०२२ मध्ये त्याने पुन्हा नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला पण यातून कोणतेच सकारात्मक यश त्याच्या हाती लागले नाही. अमरदीपच्या मते, त्याने सरकारशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्याने माजी क्रीडा मंत्री हाफिजुल हसन यांचीही भेट घेतली पण काहीच मदत मिळाली नाही.

आई-वडिलांचा भाजी विक्रिचा व्यावसाय

अमरदीपच्या कुटुंबाची परिस्थिती बिकट होती. कुटुंबात त्याचे आई-वडिल आणि मोठा भाऊ होता. वडिल भाजी विकतात आणि यातच अमरदीप त्यांची मदत करतो. आई गृहीणी आहे पण कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी तीसुद्धा घरोघरी जाऊन अंदाजे ३५ किलो भाजीपाला विकते. त्याचा मोठा भाऊ घरखर्च भागवण्यासाठी एक छोटा फास्ट फूडचा स्टॉल चालवतो.

कर्ज घेऊन इंटरनेशनल स्पर्धांमध्ये घेतला होता भाग

अमरदीपसाठी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचणे काही सोपे नव्हते. अनेकदा स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्याला कर्ज करावे् लागले होते. तथापि, यावेळी झारखंडच्या थ्रोबॉल असोसीएशनची त्याची मदत केली होती. त्याने सांगितले की, आर्थिक संघर्षानंतरही त्याने खेळापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला नाही पण कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी उपजीविका आणि खेळ यांच्यात संतुलित साधणे त्याला पुढे कठीण जाऊ लागले. अमरदीपने करियरच्या सुरुवातीला कॅब ड्रायव्हिंग करत आपली प्रॅक्टीस सुरु ठेवली होती. तो रात्री उशारापर्यंत कॅब चालवायचा आणि मग सकाळी मैदानावर प्रॅक्टिससाठी पोहचायचा.

Indian athlete Amardeep Kumar, who won four international gold medals for the country, is now selling vegetables and driving a cab in Ranchi to survive 🥺💔 pic.twitter.com/wjm6R0yeTd — Lakshay Mehta (@lakshaymehta08) September 3, 2026

२०० वर्षांनंतर कुटुंबात जन्माला आली ‘लक्ष्मी’! कुटुंबाने रथ-ढोल-ताशांच्या गजरात लेकीचे केले ग्रँड वेलकम; Video Viral

अमरदीपने अजूनही आपल्या स्वप्नांचे दार बंद केले नसून तो २०२६ मध्ये श्रीलंकेत होणाऱ्या टूर्नामेंटमध्ये भाग घेण्यासाठी तयारी करत आहे. चार इंटरनेशनल गोल्ड मेडल जिंकणारा खेळाडू आज उदरनिर्वाहासाठी भाजी विकण्याचे काम करत आहे ही गोष्ट अत्यंत खेदजनक आहे. अमरदीपची कहाणी केवळ त्याचा संघर्ष अधोरेखित करत नाही, तर देशातील खेळाडूंच्या योगदानाची आणि त्यांच्या कष्टांची कशी उपेक्षा केली जाते, हेही दाखवून देते.

 

Web Title: Amardeep jharkhand throwball player four gold medals vegetable selling

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • Athlete
  • indore
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

पीडितेला जबरदस्ती गाडीत बसवण्याचा प्रयत्न; आरडाओरडा करताच लोकांनी घेतली धाव, रस्त्यातच आरोपीची केली धुलाई; Video Viral
1

पीडितेला जबरदस्ती गाडीत बसवण्याचा प्रयत्न; आरडाओरडा करताच लोकांनी घेतली धाव, रस्त्यातच आरोपीची केली धुलाई; Video Viral

फिरणाऱ्या हेलिकॉप्टरच्या पंख्यावर उभा राहून रशियन तरुणाचा जीवघेणा स्टंट; थरारक VIDEO पाहून अंगावर येईल काटा!
2

फिरणाऱ्या हेलिकॉप्टरच्या पंख्यावर उभा राहून रशियन तरुणाचा जीवघेणा स्टंट; थरारक VIDEO पाहून अंगावर येईल काटा!

२०० वर्षांनंतर कुटुंबात जन्माला आली ‘लक्ष्मी’! कुटुंबाने रथ-ढोल-ताशांच्या गजरात लेकीचे केले ग्रँड वेलकम; Video Viral
3

२०० वर्षांनंतर कुटुंबात जन्माला आली ‘लक्ष्मी’! कुटुंबाने रथ-ढोल-ताशांच्या गजरात लेकीचे केले ग्रँड वेलकम; Video Viral

कलियुगातील ‘श्रावणबाळ’! आईला घमेल्यात बसवून अन् डोक्यावर उचलून पोहोचला बांके बिहारीच्या दरबारी; Video Viral
4

कलियुगातील ‘श्रावणबाळ’! आईला घमेल्यात बसवून अन् डोक्यावर उचलून पोहोचला बांके बिहारीच्या दरबारी; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.