जळगाव : विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर एकनाथ खडसे (Eknath Khadase) हे पहिल्यांदाच आज मुक्ताईनगरच्या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. ‘राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या त्यांनी भेटीगाठी घेतल्या आहेत, सध्या सरकार मध्ये ज्या घडामोडी घडत आहेत त्या घडामोडीमुळे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये खूप चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे, नेमकी उत्सुकता आहे की उद्या किंवा आज काय घडणार आहे ते, आता फक्त वेट आणि वॉच एवढीच भूमिका आमच्याकडे आहे’ अशी प्रतिक्रिया एकनाथराव खडसे यांनी दिली आहे.
[read_also content=”एकनाथ शिंदेंकडे मोठं संख्याबळ, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत केलं ‘हे’ भाष्य https://www.navarashtra.com/maharashtra/eknath-shinde-statement-about-mla-with-with-him-nrsr-295642.html”]
सध्या महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही आमदारांसह बंड पुकारला आणि शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत बोलताना एकनाथ खडसे यांनी मोठ वक्तव्य केलं आहे. आता फक्त वेट आणि वॉच एवढीच भूमिका आमच्याकडे आहे अशी प्रतिक्रिया देता एकनाथ खडसे यांनी संमिश्र प्रतिक्रीया दिली आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे विधानसभा बरखास्तीच्या दिशेने जात असल्याचे संकेत शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिले आहे. “महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने,” असं ट्विट संजय राऊतांनी केलं आहे.एकनाथ शिंदेंनी आपल्यासोबत ४० आमदार असून त्यापैकी ३३ आमदार हे शिवसेनेचे असल्याचं आज सकाळी सुरतमधून गुवहाटीमध्ये पोहोचल्यानंतर जाहीर केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रातील सरकार अल्पमतात असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. आज संध्याकाळी एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेणार? ते पक्ष सोडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.