Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टोमणेसम्राटांची नव्हे तर हिंदुह्रदयसम्राटांची शिवसेना ! एकनाथ शिंदेंची उबाठावर खरमरीत टीका

सांगली जिल्ह्यातील उबाठाचे पदाधिकारी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jun 09, 2025 | 11:59 PM
टोमणेसम्राटांची नव्हे तर हिंदुह्रदयसम्राटांची शिवसेना ! एकनाथ शिंदेंची उबाठावर खरमरीत टीका

टोमणेसम्राटांची नव्हे तर हिंदुह्रदयसम्राटांची शिवसेना ! एकनाथ शिंदेंची उबाठावर खरमरीत टीका

Follow Us
Close
Follow Us:

तीन वर्षांपूर्वी उठाव झाल्यानंतर आपल्यावर दररोज आरोप झाले, पण मुख्यमंत्री असताना आरोपाने नाही तर कामातून उत्तर दिले. त्यामुळेच महाराष्ट्रातील जनतेने या कामांना ऐतिहासिक प्रतिसाद दिला आणि महायुतीच्या २३२ जागा निवडून आल्या. ही शिवसेना हिंदुह्रदयसम्राटांची शिवसेना आहे टोमणेसम्राटांची नाही, अशी खरमरीत टीका शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली. सांगली जिल्ह्यातील उबाठाचे पदाधिकारी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी मंत्री उदय सामंत, आमदार सुहास बाबर, शिवसेना सचिव राम रेपाळे, दिपाली सय्यद उपस्थित होते.

Monsoon Update: IMD शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! हवामान विभागाच्या इशाऱ्याने चिंता वाढली; आता पाऊस थेट….

चंद्रहार पाटील यांचे पक्षात स्वागत करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की नकली आखाड्यातून आज खऱ्या आखाड्यात आलात. पैलवान पाटील हे कुटील माणसाकडून स्वच्छ मनाच्या माणसाकडे आले आहेत. चंद्रहार पाटील यांनी मराठी मातीचा खेळ असलेल्या कुस्तीला लौकिक मिळवून दिला. पैलवान हे महाराष्ट्राचे वैभव आहे. मी जरी पैलवान नसलो तरी २०२२ मध्ये समोरच्या लोकांना चारीमुंड्या चीत केले. तेव्हा असे डावपेच टाकले की ते अद्याप उठले नाहीत. पैलवानांना डावपेच माहित असतात. कुस्तीला बळ देण्यासाठी त्याला राजकीय पाठिंबा आवश्यक आहे. चंद्रहार पाटील यांचा आखाडा मंत्री उदय सामंत यांनी बघितला आहे. चंद्रहार पाटील यांचा संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी शिवसेनेची आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली. महाराष्ट्रातील प्रत्येक तालीम आपल्याला जोडायची आहे, असे ते म्हणाले. मी देखील शेतकऱ्याचा मुलगा शाखाप्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री झालो. पण अजूनही काहीजणांना पचनी प़डत नाही. त्यांची पोटदुखी दूर करण्यासाठी राज्यात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु केलाय. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, इथं कोणी मालक नाही. बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे मात्र त्यांच्यानंतर काही लोक अहंकारामुळे सहकाऱ्यांना घरगडी समजू लागले, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली.

ते पुढे म्हणाले की, पहलगामध्ये आपल्या लाडक्या बहिणींचे कुंकू पुसण्याचे काम पाकिस्तानने केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपण ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला धडा शिकवला. सरकारची सात शिष्टमंडळे जगभरात गेली आणि त्यातील एका शिष्टमंडळाचे नेतृत्व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. सीमेवरील जवानांसाठी दिल्लीत रक्तदान शिबीर घेण्याचा संकल्प चंद्रहार पाटील यांनी केलाय. त्यांची देशभक्ती पाहता दिल्लीत काय काश्मीरमध्ये रक्तदान शिबीर घेऊ, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ज्या विश्वासाने तुम्ही शिवसेनेत आला आहात तुमची जबाबदारी वाढली आहे. घराघरात शिवसेना पोहोचवायची आहे, असे ते म्हणाले.

ठाण्यात पाण्याच्या कमतरतेमुळे नागरिकांचे हाल, संजय केळकरांनी अधिकाऱ्यांना दिली ‘ही’ महत्वाची सूचना

पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासोबत सातारा जिल्ह्यातील पहिला हिंद केसरी संतोष आबा वेताळ, पैलवान विकास पाटील, सायगावचे उरसरपंच सागर वंजारी, सुरलीचे उपसरपंच कृष्णात भादणे, अमोल घोगे, सुशांत जाधव, संजय कांबळे, लक्ष्मण मंडळे यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

ते पुढे म्हणाले की, दिलेला शब्द पाळणारा जेव्हा लोकांना भेटतो तेव्हा राजकारण- समाजकारण बदलते. जेव्हा उठाव झाला त्यानंतर राज्यात सर्वसामान्यांचे सरकार आणले. दिलेला शब्द पाळतो आणि कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याचे काम गेली अनेक वर्ष करतोय, त्यामुळे लोकांचा शिवसेनेकडे ओढा वाढतोय, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. अनिल बाबर हे सुरुवातीपासून सोबत होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलो तरी तिथे अनिल बाबर यांची माणसे आहेत. पूर्ण देश व्यापून टाकलेले अनिल बाबर आज आपल्यात नाहीत मात्र त्यांचे काम पुढे नेण्याचे काम आमदार सुहास बाबर करत आहेत, असे ते म्हणाले.

Web Title: Eknath shinde critisizes uddhav thackeray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2025 | 11:59 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Marathi News
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: राजकारण खालच्या थराला! एकनाथ शिंदेंच्या उमेदवारावर हल्ला; चाकू भोकसला अन् थेट…
1

Maharashtra Politics: राजकारण खालच्या थराला! एकनाथ शिंदेंच्या उमेदवारावर हल्ला; चाकू भोकसला अन् थेट…

Ahilyanagar News: उंबरे परिसरात रिक्षा-मिनीबसचा अपघात! 3 जणांचा जागीच मृत्यू
2

Ahilyanagar News: उंबरे परिसरात रिक्षा-मिनीबसचा अपघात! 3 जणांचा जागीच मृत्यू

Shivsena Vachannama: AIIMS च्या धर्तीवर केईएम रुग्णालय अद्ययावत करणार! बाळासाहेबांच्या नावाने खुले करणार विद्यापीठ
3

Shivsena Vachannama: AIIMS च्या धर्तीवर केईएम रुग्णालय अद्ययावत करणार! बाळासाहेबांच्या नावाने खुले करणार विद्यापीठ

संभाजी-शितलच्या पहिल्या प्रेमाची झलक! ‘रुबाब’मधील ‘कसं तरी होतंया रं’ प्रेमगीत प्रदर्शित
4

संभाजी-शितलच्या पहिल्या प्रेमाची झलक! ‘रुबाब’मधील ‘कसं तरी होतंया रं’ प्रेमगीत प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.