ठाण्यात पाण्याच्या कमतरतेमुळे नागरिकांचे हाल, संजय केळकरांनी अधिकाऱ्यांना दिली 'ही' महत्वाची सूचना
आधीच पाण्याची कमतरता असताना नियोजनाअभावी पाण्याचे समतोल वाटप होत नसल्याने अनेक भागात नागरिकांचे हाल होत आहेत. आठवडाभरात नियोजनबद्ध पाणीवाटप करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा स्पष्ट सूचना आमदार संजय केळकर यांनी उपस्थित पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना ‘जनसेवकाचा जनसंवाद’ या उपक्रमात केल्या.
भाजपच्या खोपट येथील पक्ष कार्यालयात आयोजित उपक्रमात आमदार संजय केळकर यांनी पाण्याच्या तक्रारी सोडवण्यासाठी नागरिक आणि पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यावेळी विष्णू नगर, चरई आणि धर्मवीरनगर भागातील अनेक इमारतींचे प्रतिनिधी, माजी नगरसेवक सुनेश जोशी तर ठाणे महानगरपालिकाचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कुलकर्णी, भुवड, पांडे, भाजपाचे राजेश गाडे, सुरज दळवी, सचिन पाटील, ओमकार चव्हाण उपस्थित होते.
आधीच पाण्याची कमतरता असताना पाणी वाटपाच्या योग्य नियोजनाअभावी अनेक भागात पाणी टंचाई भेडसावत आहे. ज्या भागात पुरेसे पाणी मिळत होते, तेथे आता पाणी कमी मिळू लागले आहे. तर जेथे कमी पाणी मिळत होते तेथे पाण्याचे टँकरही वेळेवर येत नसल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले. अनेक भागात पाण्याची पळवापळवी होत असून पाणी वाटपात अन्याय केला जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
कोणत्या राज्यात EV खरेदीवर मिळतेय सर्वाधिक सूट? महाराष्ट्रात ‘या’ बाबतीत 100 टक्के सूट
या आठवड्यात पाण्याचे योग्य नियोजन करण्यात यावे, आवश्यक उपाययोजना करून कोणत्याही विभागावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना केळकर यांनी अधिकाऱ्यांना केल्या. या आठवड्यात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास पुढील भूमिका ठरवू असेही केळकर यांनी सांगितले.
या उपक्रमात न्याय मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा सत्कार केला. केळकर यांच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनातील वाहनचालकांना लिपीक पदावर बढती देण्यात आली. प्रसाविकांच्या अनियमित आणि अन्यायकारक बदल्यांना स्थगिती मिळवून देण्यात आली तर सफाई कामगारांना वारसा हक्काचा लाभ मिळवून देण्यात आला. या सर्व कर्मचाऱ्यांनी आज जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमात उपस्थित राहून आमदार संजय केळकर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा हृदय सत्कार केला.
18 कॅरेट सोन्याने मढवलेल्या ‘या’ कारचा विषयच हार्ड! James Bond च्या चित्रपटाशी आहे खास कनेक्शन
पुनमिया कुटुंबियांच्या स्मरणार्थ जितेंद्र जैन या कुटुंबियांनी ‘संजय फाऊंडेशन’ या संस्थेला दोन तीनचाकी स्कूटर देण्यात आल्या.संजय फाऊंडेशन ही संस्था संपूर्ण कोकण विभागात कार्यरत असून काम नसलेल्या हाताला काम आणि आपत्तीग्रस्त कुटुंबांना मदत करत असते. मानवसेवा हिच ईश्वरसेवा या भावनेने गेली अनेक वर्षे ही संस्था लोकांच्या सहकार्याने काम करत असल्याची माहिती केळकर यांनी दिली.