Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धोकादायक इमारतींचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी क्लस्टर योजना राबवा, नगरविकास मंत्र्यांचे निर्देश

मुंबई(Mumbai) महानगर क्षेत्रातील प्रत्येक महानगरपालिकेला आपल्या हद्दीत क्लस्टर योजना(Cluster Scheme) राबवण्याचा विचार करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी दिले आहेत.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jun 15, 2021 | 04:37 PM
eknath shinde

eknath shinde

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील सर्वच मनपा आयुक्तांनी धोकादायक इमारतींचा पुनर्विकास(Redevelopment Of Dangerous Buildings) रखडण्यामागे मालक, भाडेकरू यांच्यातील वाद, कायदेशीर प्रक्रियेत स्थगिती मिळाल्याने रखडलेला पुनर्विकास आणि पुनर्वसनातील अडचणी कारणीभूत असल्याचे मत व्यक्त केले आहे. याबाबत मुंबई(Mumbai) महानगर क्षेत्रातील प्रत्येक महानगरपालिकेला आपल्या हद्दीत क्लस्टर योजना राबवण्याचा विचार करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी दिले आहेत.

काय बदल करता येतील ते सुचवण्याचे निर्देश

ज्या इमारती क्लस्टर योजनेत समाविष्ट होऊ शकत नाहीत त्याच्या पुनर्विकासासाठी शासनाकडून काय उपाययोजना करता येतील किंवा सद्यस्थितीत केलेल्या उपाययोजनामध्ये नक्की काय बदल करता येतील ते सुचवण्याचे निर्देशही शिंदे यांनी संबंधित पालिका आयुक्तांना दिले.

धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनाला गती मिळावी यासाठी  न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणांमध्ये जलद निकाल देण्याबाबत न्यायालयाला विनंती करण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.

[read_also content=”औद्योगिक वसाहतीतील कारखान्याचे नसते उद्योग भोवले, प्रदूषित पाण्याने सावित्री नदीतील पाणी झाले लाल https://www.navarashtra.com/latest-news/savitri-river-water-became-red-after-chemical-left-from-midc-at-mahad-nrsr-142651.html”]

याबाबत नगरविकास मंत्र्यानी सर्व पालिका आयुक्त जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत शिंदे यांच्यासह नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, महेश पाठक आणि एमएमआर क्षेत्रातील सर्व महानगरपालिकांचे आयुक्त आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी आणि ठाणे आणि रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.

पावसाळ्यात धोकादायक इमारतीचा प्रश्न
प्रत्येक पावसाळ्यात धोकादायक इमारतीचा प्रश्न भेडसावत असल्याने अशा इमारतीत राहणाऱ्या नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्यासाठी  प्रत्येक मनपा हद्दीत ट्रान्झिट कॅम्प उभे करावेत, त्यासाठी निधीची तरतूद करावी, असेही शिंदे यांनी सांगितले.

धोकादायक इमारत कोसळल्यास तातडीने मदत करण्यासाठी एनडीआरएफला पाचारण करण्यात येते. या पथकाच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिकेने टीडीआरएफ पथक तयार केले आहे. या पथकाने उल्हासनगर इमारत दुर्घटना आणि महाड इमारत दुर्घटनेवेळी उल्लेखनीय काम केले होते. त्यामुळे प्रत्येक महानगरपालिकेने असे तातडीने मदत देऊ शकणारे पथक निर्माण करावे, जेणेकरून अशी दुर्घटना घडल्यास वेळ न घालवता तातडीने मदतकार्य सुरू करून जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचवता येईल, असेही शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Eknath shindes order to use cluster scheme for redevelopment of dangerous buildings nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2021 | 04:34 PM

Topics:  

  • Dangerous Building
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेत इन्कमिंग सुरूच; ‘या’ बड्या नेत्यांनी केला प्रवेश
1

पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेत इन्कमिंग सुरूच; ‘या’ बड्या नेत्यांनी केला प्रवेश

Eknath Shinde On Rahul Gandhi: “मनमोहन सिंग PM असताना ईव्हीएम…”; शिंदेंचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
2

Eknath Shinde On Rahul Gandhi: “मनमोहन सिंग PM असताना ईव्हीएम…”; शिंदेंचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर

Sanjay Raut : “आनंद दिघे नेते, उपनेते नाही, तर….”, संजय राऊतांविरोधात ठाण्यात आंदोलन
3

Sanjay Raut : “आनंद दिघे नेते, उपनेते नाही, तर….”, संजय राऊतांविरोधात ठाण्यात आंदोलन

Thane News : वाहतूक कोंडीवर काढला तोडगा? घोडबंदर रहिवाशांना मिळणार दिलासा; एकनाथ शिंदे यांनी दिले आदेश
4

Thane News : वाहतूक कोंडीवर काढला तोडगा? घोडबंदर रहिवाशांना मिळणार दिलासा; एकनाथ शिंदे यांनी दिले आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.