Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramdas Kadam : ‘मला तुम्ही 500 कोटी दिले का?’ मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंना सवाल; रामदास कदमांचं प्रत्युत्तर

Ramdas Kadam : नारायणगडावरील दसरा मेळाव्यात मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत 500 कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराचा सवाल उपस्थित केला. या वक्तव्यावर शिवसेना नेते रामदास कदम यांनी प्रतिक्रिया देत शिंदेंच्या पाठीशी आमदार खंबीरपणे उभे असल्याचं सांगितलं.

  • By विवेक
Updated On: Oct 20, 2026 | 07:00 PM
ramdas kadam on jarange patil

ramdas kadam on jarange patil

Follow Us
Follow Us:
  • मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंना थेट सवाल
  • 500 कोटींच्या चर्चेने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
  • रामदास कदमांचं जरांगेंना प्रत्युत्तर
 

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगडावरील दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्याबाबत 500 कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराचा मुद्दा उपस्थित केला. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत 500 कोटी रुपये पोहोचल्याचं एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या नेत्यांना सांगितलं होतं का, असा थेट सवाल जरांगे यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Ramdas Kadam)

मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंना थेट सवाल

नारायणगडावरील मेळाव्यात बोलताना मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडून या कथित चर्चेबाबत स्पष्टीकरण मागितलं. भाजपमधील काही नेते आपल्याला 500 कोटी रुपये मिळाल्याची कुजबुज करत असल्याचा दावा त्यांनी केला.

‘शिंदेसाहेब, तुम्ही मला 500 कोटी रुपये दिलेत का? श्रीकांत भैय्या शिंदे यांच्या माध्यमातून पैसे पोहोचल्याचं तुम्ही भाजपच्या नेत्यांना सांगितलं का?’ असे सवाल जरांगे यांनी उपस्थित केले.

Manoj Jarange Patil News: ‘मला ५०० कोटी दिल्याचे भाजपला का सांगितले? मनोज जरांगे पाटलांचे एकनाथ शिंदेंना असं का म्हणाले

या प्रकरणावर शिंदे यांनी दसरा मेळाव्यात किंवा संध्याकाळपर्यंत उत्तर द्यावं, अशी मागणीही त्यांनी केली. आपल्याला संपवण्याचा प्रयत्न नेमका भाजपकडून होतोय की एकनाथ शिंदे यांच्याकडून, याचा छडा लावल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचंही जरांगे म्हणाले.

रामदास कदम काय म्हणाले?

मनोज जरांगे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्या राजकीय पाठिंब्याचा उल्लेख केला. ते म्हणाले, ” मला जरांगे पाटलांना सांगायचंय एकनाथ शिंदे यांच्यासोबत पूर्वी 40 आमदार होते, तर आता 65 आमदार त्यांच्या पाठीशी आहेत. 65 आमदार शिंदे यांच्यासोबत ठामपणे उभे असल्याने काळजी कसली आहे. आपल्याला कोण संपवणार? जर का कोणी आपल्याला संपवायचा प्रयत्न केला तर आपण राजकारणात नवीन आहात का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शिवसेना-भाजपमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न?

तसेच, जरांगेंनी आपली भूमिका उघडपणे मांडल्याबद्दल त्यांनी प्रतिक्रिया दिली. रामदास कदम यांनी काही लोकांना शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद निर्माण करायचे असल्याचा आरोप केला. दोन्ही पक्षांमध्ये भांडण लावण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

रामदास कदम म्हणाले, “जरंगे पाटलांनी काही मनात ठेवलं नाही याबाबत मी त्यांचे आभार मानतो. ते उघडपणे आणि स्पष्टपणे बोललेत. त्यांनी काही मनात ठेवलं नसल्यामुळं अधिक स्पष्टता येईल. शिंदे साहेबानासुद्धा कळेल कि हि कोण माणसं आहेत. काही लोकांना शिवसेना – भाजपमध्ये तेढ निर्माण करायची आहे का? जे लोक आंदोलन करायला युतीसमोर उतरले आहेत त्यांना आमच्यात भांडण लावून द्यायची आहेत पण तसं होणार नाही,” असं ते म्हणाले.

दरम्यान, मनोज जरांगे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया काय असणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. या कथित व्यवहाराबाबत कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी संबंधित नेत्यांची अधिकृत भूमिका आणि दाव्यांची पडताळणी महत्त्वाची ठरणार आहे.

Manoj Jarange Patil Dasara Melava : नारायणगडावरून जरांगे पाटलांचा एल्गार! शेतकऱ्यांसाठी सरकारकडे 5 मोठ्या मागण्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदेंना काय सवाल केला?

    Ans: श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आपल्याला 500 कोटी रुपये दिल्याचं एकनाथ शिंदे यांनी भाजप नेत्यांना सांगितलं होतं का, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला.

  • Que: रामदास कदम यांनी मनोज जरांगेंच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार खंबीरपणे उभे असल्याचं सांगत रामदास कदम यांनी त्यांच्या राजकीय पाठिंब्याचा उल्लेख केला. तसेच, शिवसेना आणि भाजपमध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप केला.

  • Que: मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदेंकडे काय मागणी केली?

    Ans: 500 कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराबाबत एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात किंवा संध्याकाळपर्यंत उत्तर द्यावं, अशी मागणी जरांगे यांनी केली.

Web Title: Ramdas kadam reply manoj jarange patil allegations on eknath shinde vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 06:52 PM

Topics:  

  • Dasara Melava
  • Eknath Shinde
  • Manoj Jarange Patil
  • Ramdas Kadam

संबंधित बातम्या

Pankaja Munde Bhagwangad Dasara Melava : भगवान गडावर पंकजा मुंडेंचं Gen Z वर भाष्य, नेमकं काय म्हणाल्या?
1

Pankaja Munde Bhagwangad Dasara Melava : भगवान गडावर पंकजा मुंडेंचं Gen Z वर भाष्य, नेमकं काय म्हणाल्या?

Manoj Jarange Patil News: ‘मला ५०० कोटी दिल्याचे भाजपला का सांगितले? मनोज जरांगे पाटलांचे एकनाथ शिंदेंना असं का म्हणाले
2

Manoj Jarange Patil News: ‘मला ५०० कोटी दिल्याचे भाजपला का सांगितले? मनोज जरांगे पाटलांचे एकनाथ शिंदेंना असं का म्हणाले

Uddhav Thackeray : शेतकरी संकटात, पण उद्धव ठाकरे सत्ताबदलाच्या घोषणांत व्यस्त, दसरा मेळाव्याआधी ज्योती वाघमारेंची टीका
3

Uddhav Thackeray : शेतकरी संकटात, पण उद्धव ठाकरे सत्ताबदलाच्या घोषणांत व्यस्त, दसरा मेळाव्याआधी ज्योती वाघमारेंची टीका

Manoj Jarange Patil Dasara Melava : नारायणगडावरून जरांगे पाटलांचा एल्गार! शेतकऱ्यांसाठी सरकारकडे 5 मोठ्या मागण्या
4

Manoj Jarange Patil Dasara Melava : नारायणगडावरून जरांगे पाटलांचा एल्गार! शेतकऱ्यांसाठी सरकारकडे 5 मोठ्या मागण्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.