Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmers Flood Compensation: महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! केंद्र सरकारकडून 1,566 कोटींचा निधी मंजूर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ५ ऑक्टोबरला महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी  राज्याच्या कृषीक्षेत्रासाठी मदत करण्याचे आश्वासनही दिले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 20, 2025 | 04:53 PM
Farmers Flood Compensation:

Farmers Flood Compensation:

Follow Us
Close
Follow Us:

Farmers Flood Compensation in Maharashtra: केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी वित्त वर्ष 2025-26 साठी महाराष्ट्र राज्याला राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची घोषणा केली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) अंतर्गत केंद्राच्या हिस्स्याच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये एकूण 1,566.40 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यंदाच्या मान्सून काळात अतिवृष्टी आणि पूरामुळे राज्यातील मोठ्या प्रमाणात नागरिक बाधित झाले आहेत. या नागरिकांना तात्काळ मदत आणि पुनर्वसनासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, त्यामुळे नुकसानग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Muhurat Trading: मुहूर्त ट्रेडिंगचे काउंटडाउन झाले सुरू, सामान्य गुंतवणूकदारासाठी कसे असते हे ट्रेडिंग सत्र? जाणून घ्या

राज्यात या वर्षी पाावसाळ्यात राज्यभरातील अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली. अनेक जिल्ह्यात पुरस्थिती  निर्णाण झाली होती.  पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे मराठवाडा आणि सोलापूर भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. राज्यातील या नुकसानीची भरपाई करण्यासाठी राज्य सरकारने  २,२१५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती.  राज्य सरकारनंतर आता केंद्र सरकारने मदतीच्या दुसऱ्या हफ्त्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी १,५६६.४० कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. मुख्यमंत्री फडणवीस  म्हणाले की, “मान्सून काळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने एनडीआरएफचा दुसरा अग्रिम हप्ता म्हणून आणखी 1566.40 कोटी रुपये महाराष्ट्रासाठी मंजूर केले आहेत. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मी नितांत आभारी आहे. ही अग्रिम मदत असून अंतिम मदत प्राप्त करण्यासंदर्भातील प्रक्रिया अजून सुरू सुरू आहे.”

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा  ५ ऑक्टोबरला महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी  राज्याच्या कृषीक्षेत्रासाठी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. अमित शाहांनी त्यांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यादरम्यान, गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी व्यापक बैठका घेतल्या.  त्यानंतर,  महाराष्ट्र सरकारने बाधित क्षेत्रांचा सविस्तर अहवाल सादर करावा  त्यातून केंद्र सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करू शकेल, अस पंतप्रधान मोदींनी सांगितलं होतं.

Winter Special : थंडीच्या वातावरणात घरी बनवा पौष्टिक अन् कुरकुरीत ‘पालक वडे’; नोट करा रेसिपी

महाराष्ट्राला १,५६६ कोटी, कर्नाटकला ३८४ कोटी मंजूर

या वर्षी पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने एकूण १,९५०.८० कोटी रुपयांची आपत्कालीन आर्थिक मदत मंजूर केली आहे. यामध्ये महाराष्ट्राला १,५६६.४० कोटी रुपये आणि कर्नाटकला ३८४.४० कोटी रुपये मिळणार आहेत. या निधीचा उपयोग नैऋत्य मान्सूनदरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागांमध्ये तात्काळ मदत पुरविण्यासाठी केला जाणार आहे.

केंद्र सरकारने यावर्षी आपत्ती व्यवस्थापनासाठी आधीच मोठ्या प्रमाणात निधी वितरित केला आहे. एसडीआरएफ (State Disaster Response Fund) अंतर्गत २७ राज्यांना १३,६०३.२० कोटी रुपये, तर एनडीआरएफ (National Disaster Response Fund) अंतर्गत १५ राज्यांना २,१८९.२८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

याशिवाय, राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी (SDMF) मधून २१ राज्यांना ४,५७१.३० कोटी रुपये, आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधी (NDMF) मधून नऊ राज्यांना ३७२.०९ कोटी रुपये केंद्राने वितरित केले आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि प्रभावित भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

Web Title: Farmers flood compensation big news for maharashtra central government approves rs 1566 crore disaster response fund

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 04:04 PM

Topics:  

  • Amit Shah
  • flood
  • maharashtra farmers

संबंधित बातम्या

Naxalists Breaking: छत्तीसगडमध्ये नक्षलवादाला मोठे खिंडार! तब्बल 208 नक्षलवाद्यांनी थेट…
1

Naxalists Breaking: छत्तीसगडमध्ये नक्षलवादाला मोठे खिंडार! तब्बल 208 नक्षलवाद्यांनी थेट…

Amit Shah on Congress: ‘काँग्रेस सरकारच्या काळात दहशतवादी रक्ताची होळी खेळायचे’; गृहमंत्री अमित शहांचा विरोधकांवर हल्लाबोल
2

Amit Shah on Congress: ‘काँग्रेस सरकारच्या काळात दहशतवादी रक्ताची होळी खेळायचे’; गृहमंत्री अमित शहांचा विरोधकांवर हल्लाबोल

Gujarat Cabinet Expansion: गुजरातमध्ये एवढी मोठी राजकीय उलथापालथ का? ‘मिनी-असेंब्ली’साठी ‘ भाजपचा मोदी फॉर्म्युला’
3

Gujarat Cabinet Expansion: गुजरातमध्ये एवढी मोठी राजकीय उलथापालथ का? ‘मिनी-असेंब्ली’साठी ‘ भाजपचा मोदी फॉर्म्युला’

फरार गुन्हेगारांसाठी परत आणण्यासाठी कठोर उपाययोजना! गृहमंत्री अमित शहांचे ‘विशेष तुरुंग’ आणि पासपोर्ट रद्द करण्यावर भर
4

फरार गुन्हेगारांसाठी परत आणण्यासाठी कठोर उपाययोजना! गृहमंत्री अमित शहांचे ‘विशेष तुरुंग’ आणि पासपोर्ट रद्द करण्यावर भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.