दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi ) हा चित्रपटाची ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये आलिया भट्ट (Aliya Bhat) अतिशय बोल्ड अंदाजात दिसत आहे. आलियाने या चित्रपटात रेड लाईट एरिया असलेल्या कामाठीपुराच्या गंगूबाईची भूमिका साकारली आहे.
[read_also content=”10 वर्षांनंतर पुन्हा एकदा रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा केमेस्ट्री पाहायला मिळणार https://www.navarashtra.com/latest-news/bollywood/riteish-deshmukh-and-genelia-dsouza-will-be-seen-in-chemistry-again-after-10-years-232451.html”]
हा चित्रपट प्रदर्शनाआधीपासूनच चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट (Aliya Bhat) ‘गंगू’ या महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता अजय देवगण डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. अष्टपैलू अभिनेेता विजय राज एका ट्रान्सजेंडर व्यक्तीच्या भूमिकेत आहे. 1960 च्या दशकावर आधारित हा चित्रपट प्रसिद्ध लेखक हुसैन झैदी, मुंबईची माफिया क्वीन यांच्या पुस्तकावर आधारित आहे.
[read_also content=”वयाच्या ६व्या वर्षीच केलं होतं सिनेसृष्टीत पदार्पण, असा होता अभिनेत्री ते राजकारण प्रवास https://www.navarashtra.com/latest-news/bollywood/happy-birthday-urmila-matondakar-checkout-her-story-nrak-232291.html”]
अनेक दिवसांपासून चाहते चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत होते. कोविडचा चित्रपटाच्या प्रदर्शनावर परिणाम झाला असताना, गंगूबाई काठियावाडी आता या वर्षी २५ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या चित्रपटाला अवघे काही दिवस शिल्लक असताना, आज त्याचा ट्रेलर रिलीज करण्यात आला.
[read_also content=”शबाना आझमीनंतर जया बच्चन यांना कोरोनाची लागण, करण जोहरने थांबवलं ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चं शूटिंग https://www.navarashtra.com/regional-cinema/other-entertainment/after-shabana-azmi-now-jaya-bachchan-tested-covid-positive-nrps-232417.html”]
‘GANGUBAI KATHIAWADI’ TRAILER OUT NOW… Here’s #GangubaiKathiawadiTrailer… #GangubaiKathiawadi stars #AliaBhatt and #AjayDevgn… Directed by #SanjayLeelaBhansali… 25 Feb 2022 release… #PENStudios… Link: https://t.co/vwS9D1Yyy9 pic.twitter.com/EElOyzPloX
— taran adarsh (@taran_adarsh) February 4, 2022