Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेशनवरील तांदूळ घोटाळ्यात सरकारी अधिकारी, राईस मिलचे मालक अडकण्याची शक्यता; बडे मासेही गळाला लागतील

रेशनवरील तांदूळ घोटाळा (the rice scam (ration) case) प्रकरणात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. तांदूळ घोटाळ्याचे धागेदोरे वरपर्यंत गेले आहेत. पूर्व विदर्भातील (East Vidarbha) भंडारा (Bhandara), गोंदिया (Gondia), चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यापर्यंत तांदूळ घोटाळ्याची व्याप्ती

  • By Navarashtra Staff
Updated On: Jul 12, 2021 | 04:34 PM
रेशनवरील तांदूळ घोटाळ्यात सरकारी अधिकारी, राईस मिलचे मालक अडकण्याची शक्यता; बडे मासेही गळाला लागतील
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर (Nagpur).  रेशनवरील तांदूळ घोटाळा (the rice scam (ration) case) प्रकरणात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. तांदूळ घोटाळ्याचे धागेदोरे वरपर्यंत गेले आहेत. पूर्व विदर्भातील (East Vidarbha) भंडारा (Bhandara), गोंदिया (Gondia), चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यापर्यंत तांदूळ घोटाळ्याची व्याप्ती असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय.

[read_also content=”धक्कादायक खुलासा! नागपुरात महिला अत्याचाराची ५ महिन्यांची आकडेवारी शंभरीकडे? पोलिसांनीसाठी आव्हानच! https://www.navarashtra.com/latest-news/shocking-revelation-5-months-statistics-of-atrocities-against-women-in-nagpur-are-around-100-a-challenge-for-the-police-nrat-154369.html”]

या घोटाळ्यात अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी, राईस मिलचे मालक अडकण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या गंभीर आरोपावर सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


पूर्व विदर्भात पंतप्रधान जनकल्याण योजनेतील रेशनवरील तांदूळ घोटाळ्याचे आरोप होत आहेत त्याचे धागेदोरे खूप लांबपर्यंत गेले असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. या तांदूळ घोटाळ्याची अद्याप चौकशी झाली नसल्यानं शंका वाढल्याचंही फडणवीस यांनी म्हटलंय. चौकशी झाल्यास अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता आहे. त्यात अन्न पुरवठा अधिकारी आणि राईस मिलच्या मालकांचा समावेश असण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सहकार खात्याबाबत त्यांनाच भीती- फडणवीस
ज्यांनी सहकार चळवळीत चुकीचं काम केलं. सहकार बुडवला त्यांनाच या नव्या खात्याबाबत भीती आहे. मात्र, ज्यांनी सहकार श्रेत्रात चांगलं काम केलं, त्यांनी या नव्या खात्याचं स्वागतच केल्याचं फडणवीस म्हणाले. केंद्रीय मंत्री अमित शाह हे खूप आधीपासून सहकार क्षेत्रात काम करत आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरुवातच सहकारातून झाल्याचं फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांची काँग्रेसवर खोचक टीका
देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या मुंबईतील आंदोलनात बैलगाडी कोसळल्यावरुन जोरदार टोलेबाजी केली. “काँग्रेसच्या आंदोलनात बैलगाडी कोसळल्याचा व्हिडीओ पाहिला तर राहुल गांधी यांना राष्ट्रीय नेता म्हटल्याचं बैलांनाही आवडलेलं दिसत नाही. त्यामुळे ती बैलगाडी तुटली, असं ते चित्र आहे. पण माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत,” अशी खोचक टीका फडणवीसांनी केलीय.

भास्कर जाधवांनाही शुभेच्छा
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भास्कर जाधव यांना विधानसभा अध्यक्ष पदासाठी शुभेच्छा आहेत. मात्र त्यांनी पदावर गेल्यावर किमान निष्पक्षपणे काम करावे अशी अपेक्षा आहे. तसेच त्या पदाची उंची वाढवण्यासाठी काम करावं. आघाडीच्या तीन पक्षांमध्ये अध्यक्ष पदाबद्दल एकमत नाही. एकमत असतं असते तर आतापर्यंत विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक झाली असती.”

Web Title: Government officials rice mill owners likely to get involved in rice scam on rations big fish are also likely to be strangled if interrogated nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2021 | 04:34 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Maha Vikas Aghadi Government

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
1

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis Live : उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का खेचली टेर?
2

Devendra Fadnavis Live : उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का खेचली टेर?

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय
3

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय

Devendra Fadnavis News: दिल्लीची वाट न पाहता दिवाळीपूर्वी मदत देणार; देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन
4

Devendra Fadnavis News: दिल्लीची वाट न पाहता दिवाळीपूर्वी मदत देणार; देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.