Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा! कर्जमाफी योजनेला ब्रेक; पुढील आठवड्यात अंमलबजावणीची शक्यता

Maharashtra Farmer Loan Waiver : राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. केंद्राकडून इन्कम टॅक्ससंबंधित माहिती प्राप्त झाल्यानंतरच पात्र लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण करून पुढील आठवड्यात कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 10, 2026 | 03:50 PM
शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा! कर्जमाफी योजनेला ब्रेक; पुढील आठवड्यात अंमलबजावणीची शक्यता

शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा! कर्जमाफी योजनेला ब्रेक; पुढील आठवड्यात अंमलबजावणीची शक्यता

Follow Us
Follow Us:
  • शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा! कर्जमाफी योजनेला ब्रेक
  • पुढील आठवड्यात अंमलबजावणीची शक्यता
  • पात्रतेची पडताळणी महत्त्वाची
Maharashtra Farmer Loan Waiver News Marathi : राज्यातील लाखो शेतकरी ज्या ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’ची आतुरतेने वाट पाहत आहेत, त्या योजनेच्या अंमलबजावणीला पुन्हा एकदा विलंब होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने यापूर्वी ही योजना ३० जूनपर्यंत लागू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अंमलबजावणीची तारीख ५ जुलै जाहीर करण्यात आली. मात्र, ती मुदतही उलटून गेल्यानंतर अद्याप प्रत्यक्ष कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झालेली नाही.

दरम्यान, या विलंबामागील कारण आता समोर आले आहे. पात्र लाभार्थ्यांची अचूक पडताळणी करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे इन्कम टॅक्सशी संबंधित माहिती मागवली आहे. हा डेटा प्राप्त झाल्यानंतरच कर्जमाफी योजनेची अंतिम अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Dharashiv Farmers : धाराशिवच्या ७,६२९ शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ५३.१६ कोटींच्या कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा

पात्रतेची पडताळणी महत्त्वाची

शासनाकडून कर्जमाफीचा लाभ केवळ पात्र शेतकऱ्यांनाच मिळावा, यासाठी विविध विभागांकडील माहितीची पडताळणी केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्राकडून आयकरविषयक माहिती मागविण्यात आली आहे. संबंधित डेटा मिळाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्यात येणार असून त्यानंतर कर्जमाफीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

पुढील आठवड्यात निर्णयाची शक्यता

सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्राकडून आवश्यक माहिती प्राप्त झाल्यानंतर पुढील आठवड्यात कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये कर्जमाफीचा लाभ जमा करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते.

शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम

कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर अनेक शेतकरी या योजनेच्या अंमलबजावणीकडे डोळे लावून बसले आहेत. मात्र, मुदतीवर मुदती वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. खरीप हंगाम सुरू असताना आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळावा, अशी मागणी विविध शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून आता केंद्राकडील माहिती मिळाल्यानंतर कर्जमाफीची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लाखो शेतकऱ्यांचे लक्ष आता सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.

दरम्यान, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेनुसार शेतकऱ्यांना दोन लाखांची कर्जमाफी आणि नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50 हजार रुपयांची सूट अशी घोषणा करण्यात आली होती. राज्यातील महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफीची योजना जाहीर केली आहे. मात्र, अंमलबजावणी पुन्हा लांबणीवर पडली असल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारने केंद्राकडे इन्कम टॅक्ससंदर्भात माहिती मागवली आहे.

‘सातबारा कोरा करा’; रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाबाहेर शेतकऱ्यांचे आंदोलन, झाडावर चढून कार्यकर्त्यांचा अनोखा विरोध

Web Title: Farmer loan waiver implementation delayed income tax data update maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Farmers
  • maharashtra

संबंधित बातम्या

Mira Bhayandar News : मिरा-भाईंदरच्या विकास आराखड्यात मोठी उलथापालथ; १६४ फेरबदलांचा प्रस्ताव, नागरिकांकडून हरकती-सूचना मागविणार
1

Mira Bhayandar News : मिरा-भाईंदरच्या विकास आराखड्यात मोठी उलथापालथ; १६४ फेरबदलांचा प्रस्ताव, नागरिकांकडून हरकती-सूचना मागविणार

Tuljabhavani Temple : ‘आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड?’ चिनी CCTV प्रकरणावर कैलास पाटील आक्रमक; SIT चौकशीची मागणी
2

Tuljabhavani Temple : ‘आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड?’ चिनी CCTV प्रकरणावर कैलास पाटील आक्रमक; SIT चौकशीची मागणी

Mira Bhayandar News : 450 कोटींचे रस्ते आणि 42 कोटींचे खड्डे; मीरा-भाईंदर महापालिकेचा ‘विकास’ की जनतेच्या पैशांची उधळपट्टी?
3

Mira Bhayandar News : 450 कोटींचे रस्ते आणि 42 कोटींचे खड्डे; मीरा-भाईंदर महापालिकेचा ‘विकास’ की जनतेच्या पैशांची उधळपट्टी?

Harshwardhan Sapkal News: मुख्यमंत्र्यांच्या तोंडी पानटपरीवरील टपोरीची भाषा शोभत नाही; ‘मिसिंग लिंक’वरून सपकाळांचा पलटवार 
4

Harshwardhan Sapkal News: मुख्यमंत्र्यांच्या तोंडी पानटपरीवरील टपोरीची भाषा शोभत नाही; ‘मिसिंग लिंक’वरून सपकाळांचा पलटवार 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.