Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra politics : 2029 पूर्वी देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होणार? मुख्यमंत्र्यांबाबत बड्या नेत्याचं विधान, राजकीय चर्चांना उधाण

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांदरम्यान शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. 2029 पूर्वी पंतप्रधान होण्याची संधी मिळाली तर त्यांना शुभेच्छा, असे म्हणत राऊत यांनी फडणवीसांच्या केंद्रातील संभाव्य भूमिकेवर भाष्य केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 11, 2026 | 11:40 AM
'2029 पूर्वी देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होणार?' मुख्यमंत्र्‍यांबाबत बड्या नेत्याचं मोठं विधान, राजकीय चर्चांना उधाण

'2029 पूर्वी देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होणार?' मुख्यमंत्र्‍यांबाबत बड्या नेत्याचं मोठं विधान, राजकीय चर्चांना उधाण

Follow Us
Follow Us:
  • 2029 पूर्वी देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होणार?
  • मुख्यमंत्र्यांबाबत बड्या नेत्याचं विधान
  • राजकीय चर्चांना उधाण
Sanjay Raut On Devendra Fadnavis : देशातील राजकारणात आगामी काळात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांनाही वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. फडणवीस यांना 2029 पूर्वी पंतप्रधान होण्याची संधी मिळाली तर त्यांना शुभेच्छा, असे म्हणत राऊत यांनी भाजपच्या भविष्यातील राजकारणावरही भाष्य केले.

राऊत म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याची चर्चा सुरू आहे. अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री तसेच इतर काही वरिष्ठ मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते, अशाही चर्चा रंगल्या आहेत.

एकनाथ शिंदेंचा नवा गेम प्लॅन? ‘Operation Tiger 3’ने ठाकरे गटात पुन्हा राजकीय भूकंपाची चर्चा, 10 आमदार संपर्कात असल्याचा दावा

यावर भाष्य करताना राऊत म्हणाले, “जर 2029 पूर्वी देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली, तर मराठी माणूस देशाचा पंतप्रधान झाल्याचा आनंद महाराष्ट्राला होईल. त्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. उद्धव ठाकरे यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.” यावेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. “2029 नंतर देशात भाजपचे सरकार राहणार नाही. त्यामुळे जे काही राजकीय निर्णय घ्यायचे असतील, ते 2029 पूर्वीच घ्यावेत. त्यानंतर ना नरेंद्र मोदी असतील, ना इतर कोणी,” असे विधान त्यांनी केले.

फुटीर खासदारांवरही टीका

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील काही खासदारांना संधी मिळू शकते, अशी चर्चा सुरू आहे. विशेषतः ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या काही खासदारांची नावे चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी या खासदारांवरही टीका केली.

“20 तारखेपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. आता या देशात गुणवत्ता किंवा मेरिटच्या आधारावर मंत्रीपदे दिली जात नाहीत. ज्यांनी मोदी-शहांशी निष्ठा ठेवली, त्यांनाच पदांची ‘हाडके’ फेकली जातात. यावेळी ती कोणाच्या वाट्याला येतात, शिंदे गटाला की आमच्याकडून गेलेल्या सहा खासदारांना, हे पाहावे लागेल,” असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार, देवेंद्र फडणवीस यांची केंद्रात नियुक्ती किंवा पंतप्रधानपदाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. सध्या सुरू असलेल्या राजकीय चर्चांदरम्यान संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

‘हे दलिंदर सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही’; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर जोरदार पलटवार

Web Title: Sanjay raut on devendra fadnavis pm 2029 central cabinet expansion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Maharashtra Politics
  • sanjay raut

संबंधित बातम्या

तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात, सुटकेसाठी आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत जोरदार आंदोलन
1

तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात, सुटकेसाठी आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत जोरदार आंदोलन

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश
2

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट
3

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Maharashtra Live Breaking News in Marathi: मंगेश चिवटेंची पुणे शिक्षक मतदारसंघातून माघार
4

Maharashtra Live Breaking News in Marathi: मंगेश चिवटेंची पुणे शिक्षक मतदारसंघातून माघार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.