‘या’ ७ लोकांनी अवश्य प्यावा ‘पायनॅप्पल ज्यूस’, जाणून घ्या काय आहे कारण
१. पोटाचे आजार
हा ज्यूस घेतल्याने पोटाचे आजार बरे होतात. पोट फुगण्याचा त्रासही बरा होतो. प्रोटीन डायजेस्ट होण्यास मदत होते.
२. लठ्ठपणा
कॅलरीज कमी असल्याने याच्या नियमित सेवनाने वजन नियंत्रणात राहते.
३. डोळ्यांचे आजार
अननसातील व्हिटॅमिन अँटीऑक्सीडेंट आणि व्हिटॅमिन ए डोळ्यासाठी फायदेशीर असते. हे ज्युस नियमित पिल्याने डोळ्यांचे अनेक आजार दुर होतात.
४. त्वचेच्या समस्या
यातील व्हिटॅमिन सी आणि पोटॅशिअम त्वचेसाठी लाभदायक आहे. पुरळ, पिंपल्स तसेच काळेडागही कमी होतात.
५. अस्थमा
यात बीटा-कॅरोटिन आणि व्हिटॅमिन ए भरपूर असते. अस्थमाचा धोकाही कमी होतो.
६. अर्थाइटिस
याच्या अँटी-इंफ्लेमेट्री गुणांमुळे अर्थराटिसच्या वेदना आणि सूजपासून आराम मिळतो.
७. हृदयरोग
यातील व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीनमुळे ब्लड प्रेशर आणि ह्रदयविकाराचा धोकाही कमी होतो.






