Karanja Maha Dialysis Scheme Center Closed
वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट आणि कारंजा ग्रामीण रुग्णालयात हे केंद्र उपलब्ध आहे. कारंजा येथे महा डायलिसिस केंद्र फेब्रुवारी २०२५ मध्ये सुरू झाले. या केंद्रात ५४ रुग्ण नोंदणीकृत असून २५ रुग्णांना नियमित डायलिसिस सेवा चालू आहे. आतापर्यंत ३००० डायलिसिस झाल्याचे येथील डायलिसिस केंद्रातील कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.
वरुड, मोर्शी पासूनचे रुग्ण केंद्रामध्ये कारंजा घाडगे येथील डायलिसिसच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी येतात. मात्र केंद्र बंद होणार असल्याच्या सूचना आरोग्य विभागाला आल्याने मंगळवारी जिल्हा शल्य चिकित्सक राजसिंग पवार यांनी कारंजा येथील केंद्राला भेट दिली. सध्या स्थितीत प्रकल्पासाठी आवश्यक निधी शासनाकडून प्राप्त न झाल्यामुळे तसेच देयके थकीत असल्यामुळे हा प्रकल्प सध्या गंभीर आर्थिक स्थितीत सापडला असल्याचे सांगितले जात आहे. निधी अभावी प्रकल्प व्यवस्थापनाला महा डायलिसिस केंद्राचे कामकाज तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे प्रकल्प व्यवस्थापकांनी नियमित रुग्णांना सूचना देऊन कळविले.
माझ्या वडिलांचे आठवड्यातून दोनदा डायलिसिस करावे लागते. शासकीय केंद्रावर अचानक सेवा बंद असल्याचे सांगण्यात आले. ऐनवेळी खासगी रुग्णालयात जाणे आणि एवढा खर्च परवडणारा नाही. प्रशासनाने ही सेवा तत्काळ पूर्ववत करावी, अशी मागणी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर रुग्णाच्या नातेवाईकाने ‘नवराष्ट्र ‘कडे केली आहे.
वर्ध्याचे, जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. राजसिंग पवार म्हणाले की, कारंजा येथील डायलिसिस केंद्र प्रकल्प व्यवस्थापकाकडून काही तांत्रिक व प्रशासकीय अडचणीमुळे बंद होणार असल्याच्या सूचना प्राप्त होताच आपण मंगळवारी या केंद्राला भेट दिली. या डायलिसिस केंद्रामधील डायलिसिस सेवा घेणाऱ्या सर्व २५ रुग्णाची व्यवस्था सेवाग्राम रुग्णालयातील डायलिसिस केंद्रामध्ये केली आहे. यापुढे रुग्णांनी सेवाग्राम येथील रुग्णालयामध्ये असलेल्या डायलिसिस केंद्रामध्ये सेवा घ्यावी.
FDA Raid: ‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहीम, पुण्यातील वानवडीत दोन कराची स्वीट्सवर FDA ची धडक कारवाई
Ans: शासकीय निधी न मिळाल्याने आणि देयके थकीत असल्यामुळे केंद्राची सेवा तात्पुरती बंद करण्यात आली.
Ans: या केंद्रात ५४ रुग्ण नोंदणीकृत असून, त्यापैकी २५ रुग्ण नियमित डायलिसिस घेत होते.
Ans: हे केंद्र फेब्रुवारी २०२५ मध्ये कारंजा ग्रामीण रुग्णालयात सुरू झाले.






