पांढरे केस एका रात्रीत होतील काळे, फक्त 10 रुपयांत तयार करा नॅचरल हेअर पॅक
आजकाल केस पांढरे होणे एक सामान्य समस्या बनली आहे. आता वयात नसणाऱ्यांचेही केस लगेच पांढरे पडतात, ज्यामुळे बहुतेक सर्वांनाच पांढऱ्या केसांची समस्या भेडसावत आहे. याचे मूळ कारण धाकधुकीचे जीवन, चुकीची जीवनशैली, ताणतणाव, चुकीचा आहार तसेच केमिकल्सने भरलेल्या उत्पादनांचा वापर असू शकतो. बाजारातील हेअर कलर हे तात्पुरते केस काळे करतात मात्र याचे परिणाम केसांवर दीर्घकाळ टिकून राहतात, जे केसांसाठी हानिकारक ठरू शकते.
आम्ही तुम्हाला सांगतो की, तुमचे काळे केस केमिकलयुक्त हेअर कलर्सने कलर करण्याऐवजी तुम्ही घरीच केसांसाठी एक नैसर्गिक आणि प्रभावी असा हेअर पॅक तयार करू शकता. हा हेअर पॅक फार स्वस्तात बनून तयार होतो आणि यामुळे तुमचे केस नॅचरली काळे होतात. हा एक नैसर्गिक पॅक असल्याने याचा तुमच्या केसांवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. आज आपण या लेखात पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी दहापासून कशाप्रकारे वेगवगेळे हेअर पॅक तयार केले जाऊ शकतात हे जाणून घेणार आहोत.
आतून बाहेरून किडनी साफ करते ही 20 रुपयांची हिरवी पावडर, अशाप्रकारे करा आहारात समावेश
दही-मेथीचा पॅक
केसांसाठी दही आणि मेथीच्या पावडरचे मिश्रण केसांसाठी एक प्रभावी उपाय आहे. ही पेस्ट केसांना पोषण देण्यसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. मेथीमध्ये लोह आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असल्याने हे केसांच्या मुलांपर्यंत पोषण पोहचवण्यास मदत करते. या पेस्टच्या वापराने केसांची गळती कमी होते आणि केसांचा रंग हळूहळू गडद होऊ लागतो. आठवड्यातून किमान दोन दोनदा तुम्ही याचा वापर करू शकता.
दही-आवळा पॅक
आवळा केसांसाठी एक रामबाण उपाय मानला जातो. आवळा पावडर दह्यात मिसळून तुम्ही याची पेस्ट तयार करू शकता आणि मग ही पेस्ट केसांना लावू शकता. हे मिश्रण केसांना मजबूत करण्यास मदत करते. आवळ्यात नैसर्गिक अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे केसांचा रंग कायम ठेवण्यास मदत करतात. यामुळे केस काळीच नाही होत तर केसांना पोषण देखील मिळते, ज्यामुळे त्यांची योग्य रीतीने वाढ होते.
घरच्या घरी असा करा हायड्रा फेशियल, वयाच्या 40 व्या वर्षीही त्वचा दिसेल 20 वर्ष तरुण
दही-कॉफी पॅक
कॉफी पावडरमध्ये नैसर्गिक रंगद्रव्ये असतात जे केसांचा रंग गडद बनवण्यास मदत करतात. दह्यात कॉफी पावडर मिसळून ही पेस्ट केसांना लावल्याने तुम्ही नैसर्गिक गडद रंग मिळवू शकता. यामुळे हळूहळू केस काळी होऊ लागतात आणि त्यांच्या तजेलाही वाढतो. महिन्यातून तीन ते चार वेळा तुम्ही याचा वापर करू शकता.
दही हा एक बहुगुणी घटक आहे, ज्याचा उपयोग केसांसाठीही करता येतो. यातील नैसर्गिक गुणधर्म पांढऱ्या केसांना काळे करण्यास मदत करते. बाजारतील केमिकलयुक्त पदार्थांचा वापर सोडून असे नैसर्गिक उपाय केल्याने केस निरोगी राहतात आणि त्यांचा रंगही टिकून राहतो. नैसर्गिक घटकांवर आधारित असे उपाय केल्याने पांढऱ्या केसांच्या समस्येपासून सुटका मिळवता येते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.