
लहान मुलं कायमच अशक्त आणि बारीक दिसतात? मग वजन वाढण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
प्रत्येक आईवडिलांना आपले कायमच हेल्दी आणि मजबूत असावे, असे वाटत असते. मुलांच्या वाढीसाठी आहारात अनेक बदल करून त्यांना आवडणारे पदार्थ खाण्यास दिले जातात. आहारात वेगवेगळे पदार्थ, ड्रिंक तर काही लोक सप्लिमेंट्स सुद्धा देतात. पण लहान वयात मुलांना कोणतेही सप्लिमेंट्स पिण्यास देऊ नये. यामुळे मुलांच्या वाढीवर गंभीर परिणाम दिसून येतात. सतत सप्लिमेंटचे सेवन केल्यामुळे किडनीच्या आरोग्यावर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते.त्यामुळे आहारात अन्नपदार्थ, ताजी फळे आणि भरपूर पोषक घटक असलेले पदार्थ खाण्यास द्यावेत.मुलांचा शारीरिक विकास न झाल्यामुळे वजन वाढत नाही. मुलं कायमच अशक्त आणि थकल्यासारखी दिसतात. लागल्यानंतर किंवा कुठेही पडल्यानंतर सहज हाडे मोडू शकतात. (फोटो सौजन्य – istock)
अनेक वेळा पालकांना असे वाटते की आपल्या मुलाचे वजन खूप कमी आहे किंवा त्याच्या वयानुसार योग्य प्रकारे वाढत नाही. यामुळे ते खूप चिंताग्रस्त होतात आणि त्यांना काय खायला द्यावे किंवा कोणते उपाय करावे हे समजत नाही, ज्यामुळे मुलाचे वजन वाढू शकते, अशा उपायांबाबत आज आपणा जाणून घेऊया.
दूध आणि दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये प्रथिने आणि कॅल्शियम जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आहारात दूध आणि पनीर, चीज, दही, ताक यांसारख्या पदार्थांचा अवश्य समावेश असायला हवा. दूधामध्ये असणारे फॅटस, कॅल्शियम, व्हिटॅमिन्स यांमुळे हाडांचे आणि एकूण आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
भाज्यांमधून मुलांना विविध प्रकारची खनिजे आणि विटामिन मिळण्यास मदत होते. त्यामुळे पालेभाज्यांबरोबरच विविध रंगाच्या, चवीच्या भाज्या मुलांच्या आहारात जास्तीत जास्त प्रमाणात असतील याचा प्रयत्न करायला हवा. मुलं अनेकदा भाज्या खाण्यास नखरे करतात अशावेळी पराठा, कटलेट, आप्पे, फ्रैंकी अशा पदार्थांमधून भाज्या मुलांच्या पोटात जातील असे पाहावे.
सुकामेव्यामध्ये विटामिन, प्रोटीन्स, मॅग्नेशियम, हेल्दी फॅटस, स्निग्धता यांसारखे घटक अतिशय मुबलक प्रमाणात असतात. उत्तम आरोग्यासाठी हे सगळे घटक आवश्यक असतात. त्यामुळे मुलांना स्नॅक टाइममध्ये खाण्यासाठी सुकामेवा अवश्य द्यायला हवा. आक्रोड, काजू, बदाम, पिस्ता, सुकं अंजीर, मनुके हे घटक मुलांना शेक, स्मूदी, लाडू अशा कोणत्या ना कोणत्या स्वरुपात द्यायला हवेत.
मुलांचे वजन कमी असेल तर केळ्याने वजन वाढण्यास मदत होते. केळ्यामध्ये फॅटस, फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, ई, के हे घटक चांगल्या प्रमाणात असतात. तसेच यामध्ये असणारे ओमेगा ३ फॅटी अॅसिड मुलांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते तसेच सकाळच्या नाश्त्यात मुलांना नियमित २ केळी खाण्यास द्यावी. केळी खाल्ल्यामुळे झपाट्याने वजन वाढण्यास मदत होते.