आजकाल लोक आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी पार्लरमध्ये तासनतास बसून आपला पैसा आणि वेळ खर्च करतात. अनेक लोक यासाठी फेशियल आणि इतर अनेक प्रकारच्या ट्रीटमेंट्स देखील करत असतात. मात्र प्रत्येकाला असे महागडे ट्रीटमेंट्स परवडू शकत नाही . वाढत्या वयाबरोबर चेहऱ्यावर वृद्धत्व सहज दिसू लागते. चेहऱ्यावर डाग पडतात आणि सुरकुत्या येऊ लागतात. अशा परिस्थितीत, ही समस्या तुम्ही घरबसल्याही दूर करू शकता. आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगत आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही घरबसल्या तुमची त्वचा सुंदर आणि निरोगी बनवू शकता.
काही सोपे उपाय करून तुम्ही तुमच्या चेहऱ्याची चमक वाढवू शकता आणि वाढणारे वृद्धत्व देखील कमी करू शकता. आपण काही गोष्टींनी घरच्या घरी हायड्रा फेशियल (Hydra Facial) करू शकतो. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक टिकून राहते आणि त्वचा आतून हायड्रेट होण्यास मदत मिळते. चला तर मग घेऊया नैसर्गिक गोष्टींनी हायड्रा फेशियल कसे तयार करायचे ते जाणून घेऊयात.
या भाज्या खाल्ल्यामुळे झटपट कमी होईल वजन, आजच आहारात करा समावेश, टॉयलेटमध्ये बसताच पोट होईल साफ
फेस क्लिनिंग
सर्व प्रथम, एका भांड्यात 2 चमचे ओट्स पावडर, 3 चमचे दूध आणि 1 चमचा ग्लिसरीन घ्या. सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर चेहऱ्यावर लावा आणि 5 मिनिटे मसाज करा. यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यावरील घाण दूर होईल आणि मृत त्वचा स्वच्छ होईल.
मसाज क्रीम
यानंतर वेळ आहे मसाज करण्याची, यासाठी एका भांड्यात 2 चमचे दही, थोडा बीटरूटचा रस मिक्स करून मसाज करा. तुम्हाला हवे असल्यास तुमच्या कोणत्याही सामान्य क्रीममध्ये ग्लिसरीन मिसळा आणि मसाज करा. सुमारे 10 मिनिटे मसाज केल्यानंतर चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसायला लागते. यामुळे तुमची त्वचा चमकदार आणि मुलायम होण्यास मदत होईल.
अशाप्रकारे बनवा फेस पॅक
आता फेसपॅक बनवण्यासाठी मुलतानी माती, बेसन आणि कच्च्या बटाट्याचा रस मिक्स करा. त्यात अर्धा चमचा ग्लिसरीन मिसळा आणि थोडे दूध घालून मिक्स करा. चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटे राहू द्या. तुम्हाला हवे असल्यास चिया बिया, बीटरूटचा रस आणि दूध मिक्सरमध्ये बारीक करून फेस पॅक बनवू शकता. या पॅकमध्ये 1 चमचे ग्लिसरीन मिसळा आणि लावा. यामुळे चेहऱ्यावरील डाग आणि मुरूम दूर होऊन चेहरा उजळ होईल.
आठवड्यातून एकदा हे या तीन स्टेप्स फॉलो करा. याच्या नियमित वापराने तुम्हाला तुमच्या त्वचेवर नक्कीच प्रभावी परिणाम दिसू लागतील. तसेच यामुळे हिवाळ्यात त्वचा खूप हायड्रेटेड राहील. ज्यांची त्वचा सतत कोरडी राहते त्यांनी हे फेशियल जरूर ट्राय करावे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.