
कालांतराने लोकरीच्या कपड्यांवरील धागे निघायला लागलेत? मग या ट्रिकचा वापर करा; जुना स्वेटर दिसेल नव्यासारखा
एकदा का लोकरीच्या कापडावरील धागा दिसायला लागला की, कपडे कितीही नवे असले तरी ते जुने असल्यासारखेच वाटू लागतात. आज आपण या लेखात लोकरीच्या कपड्यांवरील धागा निघायला लागताच यावर कोणता घरगुती उपाय प्रभावी ठरेल याची एक सोपी ट्रि्क सांगणार आहोत. थंडीच्या दिवसांत ही ट्रिक तुमच्या भरपूर कामी येईल. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या कपड्यांना जुनाट दिसण्यापासून वाचवू शकतात.
मेडिकल टेपचा वापर करा
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण लोकरीच्या कापडावरुन निघत असलेले धागे किंवा लिंट हे सामान्य मेडिकल टेपच्या मदतीने काढता येऊ शकतात. यासाठी प्रथम स्वेटरवर लिंट पडलेल्या भागात मेडिकल टेप लावून ठेवा. टेपला लिंट चिपकताच त्यांना हलकी थाप द्या आणि मग नंतर टेप ओढून काढून टाका. थोड्या प्रमाणात लिंट काढण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.
लिंट रोलरचा वापर करा
लिंट रोलर स्टोअरमध्ये किंवा ऑनलाइन सहज उपलब्ध आहेत. लिंट रोलरमुळे लिंट काढणे सोपे होते. कपडे सपाट पृष्ठभागावर ठेवा आणि लिंट रोलरचा वापर करुन सर्व लिंट सहजपणे काढा. काही मिनिटांतच, तुमचा जुना दिसणारा स्वेटर अगदी नवीन दिसेल.
तुम्ही वेल्क्रो स्ट्रिप्स वापरू शकता
जर तुम्हाला लोकरीचे कपडे, पिशव्या किंवा शूज नवीनसारखे दिसावे असे वाटत असेल तर तुम्ही वेल्क्रो स्ट्रिप्सची मदत घेऊ शकता. त्यांचा चिकटपण सहजपणे लिंट काढून टाकण्यास मदत करते. यासाठी एक वेल्क्रो स्ट्रिप घ्या आणि ती लिंटवरील भागात लावा. आता, वेल्क्रो स्ट्रिप दाबून थोडा दाब द्या जेणेकरून लिंट त्यावर चिकटेल. नंतर, स्वेटरमधून लिंट काढण्यासाठी वेल्क्रो स्ट्रिपला झटक्याने ओढा.
लोकरीचे कपडे धुण्यासाठी टिप्स