Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सूर्यकुमार यादवमुळे भंगले हार्दिकचे स्वप्न; जाणून घ्या कर्णधारपदापासून दूर होण्याची ही 4 कारणे

विश्वचॅम्पियन बनलेल्या भारतीय संघाचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू असलेल्या हार्दिक पांड्याला, श्रीलंका दौऱ्यात टी-20 कर्णधारपदापासून दूर जावे लागले आहे. त्याची अनेक कारणे आहेत. तसेच, टी-20 चा कर्णधारसुद्धा घोषित करण्यात आला आहे. यामध्ये श्रीलंका दौऱ्यासाठी सूर्याने बाजी मारली आहे. आपण जाणून घेणार आहोत हार्दिक कोणत्या कारणाने मागे पडला.

  • By युवराज भगत
Updated On: Jul 18, 2024 | 09:22 PM
फोटो सौजन्य - hardik pandya X अकाउंट

फोटो सौजन्य - hardik pandya X अकाउंट

Follow Us
Close
Follow Us:

Hardik Pandya and Suryakumar Yadav : श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय आणि तितक्याच टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवला T20 संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. रोहित शर्मा वन-डेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्याला T20 मध्ये कर्णधार का करण्यात आले नाही हे जाणून घेऊया.

हार्दिकचे स्वप्न भंगले

गेल्या महिन्यात जेव्हा रोहित शर्माने टीम इंडियाला टी-२० विश्वचषकात चॅम्पियन बनवल्यानंतर या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे. तेव्हा त्याचा उत्तराधिकारी कोण असेल यावर बरीच चर्चा रंगली होती. हार्दिक पांड्या या स्पर्धेत उपकर्णधार होता. अशा परिस्थितीत, टी-20 फॉरमॅटमध्ये तो टीम इंडियाचा पुढचा कर्णधार असणार आहे, आता हे जवळपास स्पष्ट झाले होते, परंतु गौतम गंभीरच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्तीमुळे सर्वकाही बदलले. विशेषत: हार्दिक पांड्याचे स्वप्न भंगले. हार्दिक पंड्याच्या जागी सूर्यकुमार यादव या फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा नवा कर्णधार बनला आहे. अशा परिस्थितीत हार्दिककडे टीम इंडियाची कमान न सोपवण्याची कोणती कारणे होती ते जाणून घेऊया.

हार्दिकचा फिटनेस

वर्षभरापूर्वीपर्यंत हार्दिक पांड्याला मर्यादित षटकांमध्ये टीम इंडियाचा भावी कर्णधार मानले जात होते. हार्दिकला अनेक मोठ्या मालिकांमध्ये संघाचे नेतृत्व करण्याची संधीही मिळाली, मात्र आता त्याची अवस्था अशी झाली आहे की त्याला संघात स्थान मिळणे कठीण झाले आहे. मात्र, टी-२० विश्वचषकानंतर श्रीलंका दौऱ्यात त्याला संघात स्थान निश्चितच मिळाले, पण केवळ एक खेळाडू म्हणून. संघाची कमान सूर्यकुमार यादव यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. याचे एक मोठे कारण म्हणजे हार्दिक पांड्याचा फिटनेस. हार्दिक सतत अनफिट आहे. अशा परिस्थितीत संघ व्यवस्थापन आता एका कर्णधाराच्या शोधात आहे जो दीर्घकाळ नेतृत्व करू शकेल. यामुळेच हार्दिकला कर्णधारपदाच्या शर्यतीतून वगळण्यात आले.

हार्दिकची बाजू सरस

हार्दिक पांड्याला T20 मध्ये कर्णधारपद न देण्यामागचे एक मोठे कारण म्हणजे तो त्याच्या वचनबद्धतेची पूर्तता करू शकत नाही. हार्दिक संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळतो. अशा परिस्थितीत त्याला फलंदाजीबरोबरच चार षटकेही टाकावी लागणार आहेत. त्याची फिटनेसची समस्या अजूनही कायम आहे. अशा स्थितीत त्याला दोन्ही गोष्टी सतत करता येत नाहीत. दुसरीकडे, सूर्यकुमार यादव निःसंशयपणे फलंदाज म्हणून खेळतो, परंतु तो सातत्यपूर्ण आहे आणि मजबूत क्षेत्ररक्षणही करतो. यामुळेच कर्णधारपदाच्या शर्यतीत सूर्या हार्दिकच्या पुढे गेला आहे.

भारताला पुढील भविष्यासाठी नवीन चेहऱ्याचा शोध

हार्दिक पांड्याने यापूर्वीही टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. अशा स्थितीत भारतीय संघ भविष्याकडे पाहताना नव्या दृष्टीनं पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. सपोर्ट स्टाफ बदलला आहे. नवीन प्रशिक्षक गौतम गंभीरची टीम इंडियात एन्ट्री झाली आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघ नवी सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळेच हार्दिकच्या जागी सूर्यकुमार यादवला नवा कर्णधार बनवण्यात आले आहे.

Web Title: How hardik pandyas dream was shattered because of suryakumar yadav read these 4 reasons

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2024 | 09:21 PM

Topics:  

  • Suryakumar Yadav
  • T20 World Cup 2024
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Photo : कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकणारे खेळाडू कोणते? कोहली किंवा पॉन्टिंग नाही तर हा भारतीय नंबर 1
1

Photo : कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकणारे खेळाडू कोणते? कोहली किंवा पॉन्टिंग नाही तर हा भारतीय नंबर 1

The Hundred : इंग्लिश खेळाडूने मोडला फाफ डूप्लेसीचा रेकाॅर्ड! धोनी – कोहलीने टाकलं मागे
2

The Hundred : इंग्लिश खेळाडूने मोडला फाफ डूप्लेसीचा रेकाॅर्ड! धोनी – कोहलीने टाकलं मागे

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?
3

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?

Asia cup 2025 : ‘हे एक मोठे आश्चर्य..’ श्रेयस अय्यरला डावलल्याने भारताचा माजी कर्णधार नाराज.. 
4

Asia cup 2025 : ‘हे एक मोठे आश्चर्य..’ श्रेयस अय्यरला डावलल्याने भारताचा माजी कर्णधार नाराज.. 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.