सिगारेटच्या व्यसनातून मुक्त व्हायचं असेल तर आजपासूनच 'या' 2 रुपयांच्या पदार्थाचे सेवन सुरु करा
धूम्रपान हे एक असे व्यसन आहे जे एकदा लागले की सहजासहजी सुटत नाही. सिगारेट ओढण्याची ही सवय शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. निकोटिनमुळे लागलेली ही सवय फार वाईट असून ती सोडणे काही सोपे नसते. धूम्रपानामुळे फुफ्फुसांच्या आजारांपासून हृदयविकारांपर्यंत अनेक गंभीर समस्या उद्भवनाचा धोका असतो. यामुळे आपले आयुर्मान देखील कमी होत असते. त्यामुळे तुम्हालाही ही सवय असेल तर त्वरित ती सोडा आणि यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
अनेकांना सिगारेट ओढण्याची सवय सोडावी असे फार वाटते मात्र हे व्यसन त्यांना इतक्या खोलवर जडलेले असते की अथक प्रयत्नानंतरही त्यांना यापासून दूर राहता येत नाही. अधिकतर लोक स्ट्रेस आला की तो दूर करण्यासाठी सिगारेटचा आधार घेतात. मात्र तुमची ही सवय तुमच्यासाठीच नव्हे तर इतरांसाठीही घातक ठरू शकते, याच्या धुरामुळे कर्करोगाचा धोका अनेक पटींनी वाढतो. सिगारेटची सवय सोडण्यासाठीचे काही सोपे आणि घरगुती मार्ग जाणून घेऊयात.
पाण्यात एक चमचा हा पदार्थ मिसळून प्या, झोपेतही वितळेल चरबी; अंथरुणात जाताच येईल शांत झोप
मनाची तयारी करा
सिगारेट सोडण्यासाठीची सर्वात पहिली पायरी म्हणजे आपले मन घट्ट करणे आणि आपल्या मनावर ताबा ठेवणे. सिगारेट सोडण्यासाठी मनाशी ठाम निर्णय घ्या आणि सिगारेट सोडण्याचे एक स्पष्ट कारण शोध. हे कारण काहीही असू शकते जसे की, स्वतःचे आरोग्य, कुटुंबाची काळजी, किंवा दीर्घायुष्य. एकदा का मनाने ठाम निर्णय घेतला की तुमचे पुढचे टप्पे सोपे जातील. यामुळे सिगारेट सोडण्यास मदत होईल.
स्ट्रेस कमी करा
धूम्रपान अधिकतर स्ट्रेस, डिप्रेशन कमी करण्यासाठी केले जाते. यामुळे मनाला शांत करा आणि ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. ताणतणाव व्यवस्थापनासाठी योगा, ध्यानधारणा, आणि श्वसनाचे व्यायाम अशा गोष्टींचा अवलंब करू शकता. याव्यतिरिक्त तुम्ही संगीत, व्यायाम आणि छंद जोपासणे फायदेशीर ठरते. धूम्रपान करण्याची इच्छा झाल्यास तुम्ही या गोष्टींचा अवलंब करू शकता.
दालचिनीचे सेवन
सिगारेटची सवय दूर करण्यासाठी तुम्ही दालनाचीचा वापर करू शकता. यासाठी छोटासा दालचिनीचा तुकडा तोंडात घ्या आणि चघळत रहा. याची तिखट गोड चव सिगारेट ओढण्याच्या इच्छेला कमी करेल. याव्यतीरिक्त दालचिनी हा मसाला वेटलॉससाठी सुद्धा खूप लाभदायक आहे. सिगारेट सोडण्याची प्रक्रिया फार आव्हानात्मक आहे मात्र काहीस सोप्या गोष्टींचा अवलंब करून आणि मनावर ताबा ठेवून तुम्ही यापासून आपली सुटका करू शकता.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.