Fake Eyelashes डोळ्यांसाठी हानिकारक ठरतात, लांब-जाड पापण्यांसाठी हे नैसर्गिक उपाय करा; महिन्याभरात फरक जाणवेल
प्रत्येक स्त्रीला आपण सुंदर दिसावं असं वाटत असत. आपल्या चेहरा हा आपल्या सौंदर्याचे मूळ प्रतीक असतो. येत डोळ्यांच्या पापण्या देखील महत्त्वाच्या भूमिका बजावत असतात. अनेक महिलांना लांब आणि जाड पापण्यांची इच्छा असते. पण प्रत्येकाला जाड पापण्या असतातच असे नाही, त्यामुळे स्त्रिया त्यांच्या डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी फेक पापण्यांचा वापर करतात. यामुळे डोळे सुंदर दिसतात पण तुम्हाला माहित आहे का की बनावट पापण्यांमुळे डोळ्यांना आणि आपल्या नैसर्गिक पापण्यांना खूप नुकसान होत असते.
बनावट गोष्टी या काही काळापुरत्या आपल्याला आनंद जरी देत असल्या तरी याचे अनेक वाईट परिणाम आपल्याला पुढे जाऊन भोगावे लागू शकतात. पापण्यांचेही असेच आहे. तुम्हाला सुंदर वाटणाऱ्या या पापण्या काही वेळासाठी तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य तर वाढवतील मात्र आयुष्यभरासाठी तुमच्या पापण्यांचे आणि डोळ्यांचे नुकसान करतील. बनावट पापण्यांचा वापर केल्याने कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते आणि ते नैसर्गिक पद्धतीने त्यांना कसे वाढवायचे याविषयी काही सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
खोट्या आयलॅशेसमुळे डोळ्यांना होऊ शकते नुकसान
डोळ्यांची जळजळ आणि संक्रमण (Eye Irritation & Infections)
बनावट पापण्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या गोंदमध्ये कठोर रसायने वापरली असतात ज्यामुळे तुमच्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो किंवा संसर्ग देखील होऊ शकतो.
नैसर्गिक लॅशचे नुकसान (Eye Irritation & Infections)
बनावट पापण्यांचा सतत वापर केल्याने नैसर्गिक पापण्या कमकुवत होतात. यामुळे पापण्या हळूहळू पातळ होतात आणि यावरील गोंदमुळे त्या काढताना आपल्या खऱ्या पापण्याही तुटायला लागतात.
केमिकल एक्सपोजर (Chemical Exposure)
अनेक चिकट पदार्थांमध्ये फॉर्मल्डिहाइडसारखे विषारी पदार्थ असतात, जे डोळ्यांना तसेच त्वचेला हानी पोहोचवू शकतात.
चिकन-मटण-मासे कशात आहे सर्वाधिक प्रोटीन? काय खाऊन जगता येईल 100 वर्ष? योग्य पर्याय जाणून घ्या
डोळ्याच्या पापण्या जाड करण्यासाठी नॅचरल उपाय करा
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.