
उन्हाळ्यात कच्च्या कैरीपासून घरच्या घरी बनवा आंबटगोड चवीचे पन्ह
मार्च महिना सुरु झाल्यानंतर सगळ्यात आधी कच्च्या कैरीची आठवण येते. कैरीचे नाव घेतल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. आंबटगोड चवीचा कैरी आहारात असेल तर दोन घास जेवणात जास्त जातात. उन्हाळा सुरु झाल्यानंतर शरीरात जास्त उष्णता वाढू लागते. वाढलेल्या उष्णतेमुळे जेवण देखील जात नाही. कोणताही पदार्थ खाण्याची किंवा पिण्याची इच्छा होत. अशावेळी आहारात शरीराला पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. उन्हाळ्यात दुपारच्या वेळी किंवा उन्हातून बाहेर जाऊन आल्यानंतर कोणत्याही उष्ण पदार्थांचे सेवन करण्याऐवजी सरबत किंवा ताकाचे सेवन करावे. कैरीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. कैरीचा मुरंबा, मेथांबा, रस, कैरीची आंबटगोड भाजी इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कच्च्या कैरीपासून आंबटगोड चवीचे पन्ह बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीमध्ये पन्ह बनवल्यास चव अतिशय सुंदर लागेल आणि शरीराला थंडावा मिळेल.
सकाळच्या नाश्त्याला बनवा चवदार आणि मोकळे कांदेपोहे, लगेच नोट करा रेसिपी