नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात (Maharashtra Temperature) मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक नागरिक दुपारच्या वेळेत बाहेर पडताना कमी प्रमाणात दिसत आहेत. त्यात आता हवामान विभागाने महत्त्वपूर्ण अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार, 24 एप्रिल ते 27 एप्रिलपर्यंत या भागांत विजांच्या गडगडाटांसह, वादळी मध्यम हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
23/4, 850hpa IMD GFS model guidance indicate,Trough/wind discontinuity frm MP to int Chennai at lower levels.Cycir also as indicated.
विदर्भात मेघ गर्जना, विजार, जोरदार वारे सह हलका ते मध्यम पावसाची शक्यता येत्या २,३ दिवसात. विदर्भात उद्या तुऱ़ळक ठिकाणी गारपीटीची शक्यता. TC
-IMD pic.twitter.com/4JdNLz4uyA— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 23, 2023
हवामान विभागाकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना पुढील 4 ते 5 दिवस ‘येलो अलर्ट’ (Yellow Aleart) देण्यात आला आहे. यामध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला अलर्ट आहे. तसेच 24 ते 27 एप्रिल या कालावधीत या भागांत विजांच्या गडगडाटांसह, वादळी मध्यम हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
विदर्भात गारपीटीची शक्यता
विदर्भात येत्या 2 ते 3 दिवसांत मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाट, जोरदार वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर उद्या (दि.24) विदर्भात काही ठिकाणी गारपीटीचा अंदाज व्यक्त केला जात आहे, याबाबतची माहिती आयएमडी पुणेचे (IMD Pune) प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून दिली.