देशात कोरोना व्हायरसने (Coronavirus) पुन्हा डोकं वर काढलं आहे. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ही वाढणारी रुग्णसंख्या आरोग्य मंत्रालयाची चिंत वाढवणारी ठरतेय. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 10,542 रुग्ण आढळले आहेत. तर, 38 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४,४८,४५,४०१ पोहोचली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 5 लाख 31 हजार 190 लोकांनी आपला जीव गमावल आहे.
[read_also content=”पेट्रोल-डिझेलच आजचे दर काय? तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव काय? जाणून घ्या https://www.navarashtra.com/india/what-is-the-price-of-petrol-diesel-today-find-out-what-is-the-petrol-diesel-price-in-your-city-nrps-2-387231.html”]
काल देशभरात झालेल्या मृत्यूमुळे केरळमध्ये सर्वाधिक 11 मृत्यूचा समावेश आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 53,720 वर गेली आहे. शनिवारी 10,753 तर, शुक्रवारी 11,109, गुरुवारी 10,158 रुग्णांची नोंद करण्यात आली आली होती. गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये सुमारे 38 टक्क्यांनी वाढ झाली. बुधवारी सकाळपर्यंत देशात ६३ हजार ५६२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
सध्या देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.67 टक्के आहे. तर, कोरोनामधून बरे होणाऱ्या लोकांची संख्या 4,42,50,649 झाली आहे, तर मृत्यूदर 1.18 टक्के नोंदवला गेला आहे. मंत्रालयानुसार,देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत देशात आतापर्यंत कोविड लसीचे 220.66 कोटी डोस देण्यात आले आहेत.