Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs SA W Final Match Live : जेतेपद एक पाऊल दूर! भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचे लक्ष्य; शेफाली-दीप्ती चमकली

आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चा अंतिम सामन्यात भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ आमनेसामने आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर २९९ धावांचे लक्ष ठेवले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 02, 2025 | 08:36 PM
IND W vs SA W Final Match Live: One step away from the title! India set a target of 299 runs for South Africa; Shefali-Deepti shine

IND W vs SA W Final Match Live: One step away from the title! India set a target of 299 runs for South Africa; Shefali-Deepti shine

Follow Us
Close
Follow Us:
  • महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचे दक्षिण आफ्रिकेचे २९९ धावांचे लक्ष 
  • शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा यांचे शानदार अर्धशतक 
  • दक्षिण आफ्रिकच्या अयाबोंगा खाकाने सर्वाधिक ३ विकेट्स

IND W vs SA W, ICC Women’s ODI World Cup 2025 :  आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चा अंतिम सामना भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात खेळला जात आहे. हा सामना नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे खेळला जात आहे.  या सामन्यात नाणेफेक गमावणाऱ्या भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर २९९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्माच्या अर्धशतकांच्या जोरावर ७ बाद २९८ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून अयाबोंगा खाकाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा : IND W vs SA W Final Match Live : स्मृती मानधनाची जेतेपदाच्या सामन्यात इतिहासाला गवसणी! ‘या’ माजी कर्णधाराला दिला धोबीपछाड

नवी मुंबईमध्ये पावसामुळे सामना एक तास उशिराने सुरू झाला. सामन्याआधी दक्षिण आफ्रिकेची कर्णधार  लॉरा वोल्वार्डने जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन भारताल प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केले. भारतीय डावाची सुरवात शफाली वर्मा आणि  स्मृती मानधना या सलामीवीर जोडीने केली. दोन्ही खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये दिसून आल्या. वर्मा आणि  स्मृती यांनी १७.४ ओव्हरमध्ये पहिल्या विकेट्ससाठी १०४ धावांची भागीदारी रचून संघाचा पाया रचला. यानंतर स्मृती ४५ धावा काढून बाद झाली. तीला क्लो ट्रायॉनने बाद केले. यानंतर मैदानात आली सेमीफायनल सामन्यातील शतकवीर जेमिमाह रॉड्रिग्स. मैदानावर शानदार खेळत असल्याचे ती दिसून आली मात्र सेट झाल्यावर ती बाद झाली. ती २४ धावांवर बाद झाली. तीला अयाबोंगा खाकाने बाद केले.

Innings Break! A flourish from Deepti Sharma and Richa Ghosh propels #TeamIndia to 2⃣9⃣8⃣/7 after 50 overs 🤜🤛 Over to our bowlers now! 👍 Scorecard ▶ https://t.co/TIbbeE4ViO#WomenInBlue | #CWC25 | #INDvSA | #Final pic.twitter.com/eFNztfR0xQ — BCCI Women (@BCCIWomen) November 2, 2025

जेमिमा नंतर मैदानात आलेल्या कर्णधार हरमनप्रीत कौर मात्र संघर्ष करताना दिसून आली आणि ती २० धावांवर मलबाची शिकार ठरली. या दरम्यान सलामीवीर शेफाली वर्माने आपले शतक पूर्ण केले. नंतर तीला शतकाने हुलकावणी दिली आणि ती ७८ चेंडूत ८७ धावा काढून  बाद झाली. तिने आपल्या खेळीत ७ चौकार आणि २ षटकार लगावले. त्यानंतर दीप्ती शर्माने एक बाजू धरून लावली आणि शानदार फटकेबाजी करत संघाला सावरले. ती शेवटच्या ओव्हरमध्ये धावबाद झाली. तिने ५८ चेंडूत ५८ धावा केल्या. यामध्ये तिने ३ चौकार आणि १ षटकार लगावला.  ऋचा घोष ३४ धावांची महत्वपूर्ण खेळी करून बाद झाली. तसेच अमनजोत कौर १२ धावा करून बाद झाली तर राधा यादव ३ धावा करून नाबाद राहिली. दक्षिण आफ्रिकेकडून अयाबोंगा खाकाने ९ ओव्हरमध्ये ५८ धावा देऊन सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर नॉनकुलुलेको म्लाबा क्लो ट्रायॉन आणि नादिन डी क्लर्क यांनी प्रत्येकी एक विकेट्स  घेतली.

भारताची प्लेइंग इलेव्हन

शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, राधा यादव, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर.

हेही वाचा : IND vs AUS 3rd T20 : टिम डेव्हिडचा भारताविरुद्ध चमत्कार! टी-२० सामन्यात लगावला सर्वात लांब षटकार; पहा Video

दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन

लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), ताजमिन ब्रिट्स, अनेके बॉश, सुने लुस, मारिझान कॅप, सिनालो जाफ्ता (यष्टीरक्षक), अनेरी डेर्कसेन, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको म्लाबा.

Web Title: Ind w vs sa w final match india set south africa a target of 299 runs to win womens odi world cup 2025 marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 08:25 PM

Topics:  

  • Harmanpreet Kaur
  • ICC Women Cricket World Cup 2025
  • IND W vs SA W
  • Smriti Mandhana

संबंधित बातम्या

IND W vs SA W Final Match Live : स्मृती मानधनाची जेतेपदाच्या सामन्यात इतिहासाला गवसणी! ‘या’ माजी कर्णधाराला दिला धोबीपछाड 
1

IND W vs SA W Final Match Live : स्मृती मानधनाची जेतेपदाच्या सामन्यात इतिहासाला गवसणी! ‘या’ माजी कर्णधाराला दिला धोबीपछाड 

IND W vs SA W : Women’s ODI World Cup च्या अंतिम सामन्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था; नवी मुंबईमध्ये वाहतूक मार्गदर्शक तत्त्वे जारी
2

IND W vs SA W : Women’s ODI World Cup च्या अंतिम सामन्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था; नवी मुंबईमध्ये वाहतूक मार्गदर्शक तत्त्वे जारी

Jio Recharge Plan: फ्रीमध्ये पाहा IND W vs SA W फायनल! जियो यूजर्ससाठी हा आहे बेस्ट रिचार्ज प्लॅन
3

Jio Recharge Plan: फ्रीमध्ये पाहा IND W vs SA W फायनल! जियो यूजर्ससाठी हा आहे बेस्ट रिचार्ज प्लॅन

IND W vs SA W Final Match Live :गंभीर आणि सूर्याकडून भारतीय महिला संघावर शुभेच्छांचा वर्षाव; दिला खास मंत्र; पाहा Video
4

IND W vs SA W Final Match Live :गंभीर आणि सूर्याकडून भारतीय महिला संघावर शुभेच्छांचा वर्षाव; दिला खास मंत्र; पाहा Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.